|
Ami79
| |
| Tuesday, July 31, 2007 - 7:37 am: |
| 
|
/hitguj/messages/103383/90962.html?1163397649 ही लिंक पहा. यात दिल्या प्रमाणे मी ठेपले करते. खुप छान होतात
|
Sayuri
| |
| Tuesday, July 31, 2007 - 11:37 pm: |
| 
|
पालक्-चीज टोस्टची कृती आहे का इथे? (भारतात सीसीडी- cafe coffee dayमध्ये एकदा सुंदर टोस्ट खाल्ला होता..)
|
अमि धन्स. अग मी हे ट्राय केले होते पण तसे नव्हते झाले. मार्केट मधले छोटे आणि थोडेसे जाडे असतात.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 11:33 am: |
| 
|
विद्या, माझ्या कृतिने तसेच व्हायला हवेत. जाड लाटले कि झाले. बाजारात जे थेपले मिळतात, त्यात मेथी खुपच कमी असते.
|
Ami79
| |
| Wednesday, August 01, 2007 - 1:13 pm: |
| 
|
कुर्डूची भाजी नावाची पालेभाजी असते का? पाने लाल रंगाची असतात
|
Swati
| |
| Wednesday, August 01, 2007 - 11:26 pm: |
| 
|
dinkache laadoo kase kartat? ladwa chya recipes madhe nahi ahet.
|
Meghdhara
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:39 am: |
| 
|
दिनेश कुकरमधे पाणी उकळवून त्यात दुसर्या भंड्यात चॉकलेट बार वितळवले तर तुम्ही म्हणाताय त्या प्रकारे डबल बॉयलर मधे वितळवल्यासारखे होईल का? मेघा
|
अमि कुर्डूचि भाजी फ़क्त पावसाळ्यातच मिळते. पाने आणि देठ थोडे लालसर रंगचे असतात. ही भाजि नुसती कांदा, मिरची, खोबरे घालुन छान होते किंवा ह्याचि पालकचि आमटी करतो तशी केली तरी चांगली होते भातावर आणि चपतीबरोबर पण.
|
अमि, विद्या, आमच्याकडे शेतात तुम्ही म्हणताय तसले पाने आणि देठ लालसर असणारे कुर्डू भरपूर उगवते. पण त्याची भाजी केली जाते हे माहीत नव्हते. शेतातील तण म्हणून ते समूळ काढून टाकले जाते. पुढे जून झाल्यावर त्याला पांढर्या रंगाची छोटी छोटी बोटांसारखी लांबुडकी फुले येतात, आणि आत काळ्या बिया असतात. (या बिया शेतात झडल्यावर पुढच्या लागवडीत त्यांचं अफाट तण उगवतं. म्हणून ही फुले लागण्याआधीच ते काढून टाकलं जातं.) तुम्ही म्हणताय ती कुर्डूची भाजी म्हणजे हीच की दुसरी आहे?
|
Surabhi
| |
| Thursday, August 02, 2007 - 2:39 pm: |
| 
|
मुंबई-मसाला डॉट कॉम वर असलेली "मोकळ भाजणी" कशी करतात ते इथे कोणाला माहीत आहे का? असल्यास कृपया रेसिपी मिळेल का?... धन्यवाद!
|
Dineshvs
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:07 pm: |
| 
|
मेघा, तसे केले तरी चालेल पण शक्यतो दोन भांड्याचा एकमेकना स्पर्ष होणार नाही याची काळजी घ्यावी. आतल्या भांड्याला लांब दांडा असावा. ( ते सॉसपॅन असावे. ) काहि मायक्रोवेव्ह ओव्हनमधे अगदी कमी वेळात चॉकलेट मेल्ट करता येते.
|
Dineshvs
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:10 pm: |
| 
|
माझ्या मते तेच कुर्डु. गोव्यात ऋषिपंचमीच्या भाजीतही ती वापरतात. पुर्वीच्या श्रावणमासाच्या कथेत, केनी कुर्डुची भाजी, असा उल्लेख असायचा.
|
मला शिर्याच्या पोळ्या कश्या करायच्या हे कोणी सांगेल का pls
|
Pls mala Butter chicken chi recipe milel ka
|
दिनेशदा आणी बाकी सुगरणिंनो, मला शिर्याच्या (सांज्याच्या?) पोळ्या करायचे प्रमाण, टिप्स द्या नं please!
|
Ksmita
| |
| Friday, August 03, 2007 - 11:25 pm: |
| 
|
mepunekar, /hitguj/messages/103383/91367.html?1186183244 इथे पहा पण प्रमाणात नाही लिहायला जमले . sorry
|
Mepunekar
| |
| Saturday, August 04, 2007 - 4:45 am: |
| 
|
दिनेशदा, स्मिता खुप खुप धन्यवाद! विकेंड ला करायच्या आहेत. दिनेशदांनी दिलेल्या प्रमाणानुसार केलं की पदार्थाला perfect चव येतेच
|
Ami79
| |
| Monday, August 06, 2007 - 6:55 am: |
| 
|
मी ती भाजी पाहिली नाही. ऐकले आहे फक्त. मी तयार कांदा लसूण मसाला आणला आहे.तो भाजीत वगैरे कसा वापरावा?
|
Dineshvs
| |
| Monday, August 06, 2007 - 11:35 am: |
| 
|
अमि, कांदे लसुण मसाल्यातले बहुतेक जिन्नस भाजुन वा तळुन घेतलेले असतात. त्यामुळी भाजी आमटीत उकळताना तो घालायचा. तयार मसाला खुपदा जास्त तिखट असतो, त्यामुळे अंदाजापेक्षा जरा कमीच घालावा. त्याशिवाय वेगळे खोबरे वैगरे घालायची गरज नसते. मीठ मात्र घालावे लागते. या मसाल्याचे प्रमाण उत्पादकाप्रमाणे बदलते त्यामुळे एकदा वापरुन चव घेऊन बघावी. हा मसाला तेलात परतुन घ्यायचीही गरज नसते. एकदा पाकिट उघडले कि घट्ट झाकणाच्या डब्यात भरुन, फ़्रीजरमधे ठेवला तर स्वाद टिकुन राहतो.
|
Ami79
| |
| Tuesday, August 07, 2007 - 6:14 am: |
| 
|
मी बेडेकरांचा आणला आहे. खरोखरच तो खुप तिखट आहे. त्यात मिठाचे प्रमाणही कमी नसावे असे वाटते. धन्यवाद दिनेशदा
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|