|
Ravisha
| |
| Wednesday, July 25, 2007 - 10:41 pm: |
| 
|
सोयाबिनच्या डाळीची आमटी कशी करतात?
|
Princess
| |
| Thursday, July 26, 2007 - 2:14 am: |
| 
|
धन्यवाद मिनोती. पण शेंगदाण्याच्या लाडवाना पाक कुठला लागतो तेच मला महिती नाही... एकतारी की दोनतारी की कसाही चालेल ?
|
Karadkar
| |
| Thursday, July 26, 2007 - 4:43 am: |
| 
|
अग, मला पाकातल्या तारा कळत नाहीत. पण पाक व्यवस्थीत झालाय की नाही ते मी पाकाचा थेंब गार पाण्यात टाकते तो जर चिक्कीसारखा कडक झाला तर गॅस बंद करुन त्यात शेंगदाणे घालायचे. US मधे गुळाचा कडक पाक नेहेमीच जमतो असे नाही. मी केलेली चिक्कि भारतात कधीही बिघडल्याचे आठवत नाही पण इथे ५०% टक्के वेळा मऊ झाली.
|
Princess
| |
| Thursday, July 26, 2007 - 5:59 am: |
| 
|
धन्यवाद मिनोती... तुझी टिप वापरुन करुन बघते या वीकेंडला. मग कळवते.
|
सावनी धन्यवाद. दिनेश तुमच्या क्रुतींची वाट पहाते. मेघा
|
Ami79
| |
| Thursday, July 26, 2007 - 8:06 am: |
| 
|
मला अळुचं फदफदे कसे करतात हे कृपया सांगाल का?
|
Alpana
| |
| Thursday, July 26, 2007 - 8:54 am: |
| 
|
खुप शोधला..पन बीबी नाही सापडला म्हणुन ईथे विचारते... हिन्दी मध्ये ज्याला अरबी म्हनतात त्याल मराठी नावे काय आहे...मी त्याची भाजी एकदा खाल्ली पण कळाले नाही.. आणी भगरीला आणी शिंगाड्याल कय म्हणतात हिंदीत आज डब्ब्यात उपासाचे थालपीठ आणी भगर नेली होती, आणी सगळे विचारायला लागले कि हे तर धान्य आहे मग तु उपासाला कशी खातेस?
|
Amruta
| |
| Thursday, July 26, 2007 - 12:01 pm: |
| 
|
हिंदीतली अरवी म्हणजे मराठी मधली अळकुडी. ह्या अळकुड्या आपल्या अळुची मुळ असतात.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 26, 2007 - 3:15 pm: |
| 
|
रविशा, सोयाबीनची डाळ कुठे मिळाली ? सोयाबीनची आमटीच करायची असेल तर ते भिजत घालुन वाटुन त्याचा रस काढावा. त्या रसात चिंचेचा कोळ, हिरव्या मिरच्या, हिंग घालुन भरपुर उकळावे. मग वरुन फ़ोडणी द्यावी. हि आमटी वा सार भरपुर उकळणे जरुरीचे आहे. सोयाबीनचे मिन्स व चन्क्स बाजारात मिळतात. सोयाबीनमधले पचायला आणि शिजायला कठिण असणारे घटक काढुन ते बनवलेले असतात, नुसत्या सोयाबीनपेक्षा ते वापरणे कधीही चांगले. अमि७९ अळुची भाजी इथे आहे /hitguj/messages/103383/114540.html?1155550308
|
Ravisha
| |
| Thursday, July 26, 2007 - 6:42 pm: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा,सोयाबीनमध्ये तर खूपच प्रथिने असतात ना!!!
|
Bee
| |
| Friday, July 27, 2007 - 1:41 am: |
| 
|
कुणी पोहे भरून केलेल्या सामोस्याची कृती लिहाल का.. हा सामोसा पार्ल्यात मिळतो असे पार्लेकर म्हणताहेत.
|
Ami79
| |
| Friday, July 27, 2007 - 5:22 am: |
| 
|
दिनेशदा, तुम्ही लिहिले आहे की डाळ आणि दाणे भिजत घालावे. किती वेळ भिजत घालावे ते सांगाल का? यात फोडणीत लसूण सुद्धा घालतात का?
|
Dineshvs
| |
| Friday, July 27, 2007 - 6:25 am: |
| 
|
रविशा सोयाबीनमधे प्रथिने असतात, पण सगळी प्रथिने पचायला जड असतात. आपल्या डाळीतही प्रथिने असतात, पण आपण त्याबरोबर तेल, हिंग, हळद, लसुण, मोहरी अशी योजना करुन, ती पचायला सोपी करतो. अमि७९, डाळ दाणे तीन चार तास भिजवले तरी चालतील. यात लसुण घालत नाहीत, पण घातला तरी चालेल. बी, मुंबईत काहि ठिकाणी पोहे भरलेले सामोसे, देसी सामोसे म्हणुन विकतात. यात कांदेपोहेच भरलेले असतात.
|
Ami79
| |
| Friday, July 27, 2007 - 7:29 am: |
| 
|
धन्यवाद, मी नक्की करुन पाहिन
|
अल्पना भगरीला शामक के चावल आणि शिंगाड्याला कुटू म्हणतात. नवरात्रीच्या दिवसात शामक के चावल आणि कुटूका आटा कुठल्याही जनरल स्टोरमधे मिळतो. आम्ही इथे नवीन आलो तेव्हा गमतीने शामक के दावर म्हणायचो.. दिनेश कधी टाकताय क्रुती? वाट पहातेय. माझी एक मैत्रीण बीटर चॉकलेट आणि एक चॉकलेट बार आणून दाणे/ काजू/ बदाम वापरून चॉकलेट करते पण पट्ठी पक्की क्रुतीही सांगत नाही नी साहित्याची पूर्ण यादीही देत नाही. मेघा
|
Manjud
| |
| Monday, July 30, 2007 - 6:29 am: |
| 
|
बी, पट्टी सामोसा किंवा साधा सामोसा म्हणतात त्याला. त्यात बटाटे आणि वाटाणे पण असतात पण main ingredient पोहेच असतात. मुंबईत बर्याच ठिकाणी मिळातो, दादरला मंजू वडेवाला आहे ना त्याच्याकडे पण छान मिळतो
|
भगरीला मोरधन व शिन्गाड्याला सिन्घाडे असही म्हणतात
|
Dineshvs
| |
| Monday, July 30, 2007 - 4:58 pm: |
| 
|
मेघा, काय मजा आहे पहा, माझ्या संग्रहातल्या सगळ्या चॉकलेट्सची कृती कुकिंग चॉकलेट पासुनच सुरवात करतात. आज नायजेला नावाच्या एका सुंदर स्त्रीचा प्रोग्रॅम बघितला तिनेही तसेच केले. म्हणजे कुकिंग चॉकलेट डबल बॉयलरमधे वितळवायचे त्यात हवे ते नट्स घालायचे. बटर घालायचे इसेन्स घालायचा, आणि मोल्ड मधे घालुन थंड करायचे. हवे तर व्हाईट चॉकलेट आणि नेहमीचे चॉकलेट एकतर करुन मार्बल इफ़ेक्ट द्यायचा. कोको पावडर अनेक वेळा चाळुन घेऊन त्यात व्हाईट बटर आणि पिठीसाखर घालुन मी चॉकलेट्स केली होती. त्यात मधे घालण्यासाठी ऑरेंज पील्स, आणि हॅझेल नट्स घेतले होते, वरच्या मिश्रणात थोडी रम घातली होती, छान झाली होती. अर्थात हि फक्त एक कृति. यात कल्पनाशक्तीला भरपुर वाव आहे.
|
थॅंक यू दिनेश. आधी बेसीक क्रुती जमली की मग कल्पनाशक्तीला वाव मिळेल. करून सांगतेच. मेघा
|
मार्केट मधे मिळतात तसे मेथीचे थेपले कसे करायचे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|