|
Dineshvs
| |
| Friday, July 13, 2007 - 4:45 pm: |
| 
|
सुपरमॉम, पनीरचा साखरभात चांगला होतो. केशरी रंगाच्या साखरभातात, पांढरे पनीरचे क्युब्ज छान दिसतात. पनीर तळायचे वैगरे नाही, तसेच वापरायचे. इतरप्रकारच्या मसालेभातावरही तसेच क्युब्ज पसरवता येतात. किंवा पनीर लांबट किसुनही सजावट करता येते. पनीरमधे थोडा मैदा घालुन मळुन त्याचे गोळे करुन, रसगुल्ले करता येतात, व तेही साखरभातावर पसरुन देता येतात. स्नेहा, जर फ़्रीजचे तपमान नीट असेल तर वरणाची डाळ आठवडाभर सहज राहते. त्यात पाणी कमी असावे. झाकण नाही ठेवले तर डाळ सुकत जाते. पण वाया जात नाही. भाज्या किंआ इतर कुठलाही पदार्थ पुर्ण थंड करुनच फ़्रीजमधे ठेवावा. नुसत्या भाज्या शिजवल्या असतील, तर दोन तीन दिवस टिकतात. तयार भाज्या, ग्रेव्हीवाल्या वैगरे असतील, तर थंड करुन फ़्रीजरमधे ठेवाव्यात. त्याही आठवडाभर राहतील. पण अगदीच निकड असल्याशिवाय अश्या तयार भाज्या ठेवु नयेत. फ़्रीजमधेही पदार्थ आंबु शकतो, वा त्याला बुरशी येऊ शकते. त्यामूळे वापरण्यापुर्वी, नीट बघुन, वास घेऊन पहावा.
|
Sneha1
| |
| Friday, July 13, 2007 - 5:26 pm: |
| 
|
thanx , दिनेशदा.. आठवडाभरासाठीच करून ठेवायचे आहे...
|
Leenas
| |
| Monday, July 16, 2007 - 10:59 am: |
| 
|
रवा उत्तप्प्याची रेसिपी आहे का ऑलरेडी कुठे इथे?
|
Prachee
| |
| Tuesday, July 17, 2007 - 2:50 pm: |
| 
|
ragada pattisechi recepie havi hoti.... kuni madat karu shakel ka???
|
Ksmita
| |
| Tuesday, July 17, 2007 - 11:38 pm: |
| 
|
prachee ,इथे पहा रगडा पटीस रेसिपी /hitguj/messages/103383/79976.html?1078514770
|
Ksha
| |
| Wednesday, July 18, 2007 - 12:14 am: |
| 
|
दिल्लीला गोलगप्पे देताना ते एक प्रकारचं वेगळं मिश्रण घालतात त्यांत. गरम गरम असतात एकदम आणि थोडेसे गोडसर. कुणाला माहिती आहे का ते मिश्रण कसं तयार करायचं ते?
|
Supermom
| |
| Wednesday, July 18, 2007 - 3:44 pm: |
| 
|
thanks नलिनी, दिनेश. प्रचंड घाई झाली या वेळेस. मग साधा भाज्यांचा पुलावच नेला करून. पण पनीरचा साखरभात अन नलिनीने लिहिलेला बटाटा भात बेहद्द आवडला. दर शुक्रवारी असतेच पार्टी.त्यामुळे माझं पाककौशल्य दाखवायला भरपूर वाव आहे.
|
Akshitija
| |
| Wednesday, July 18, 2007 - 6:20 pm: |
| 
|
ksha u will get same gol gappas in Pune too.Its basically ragada from ragada pattice. I have tried this couple of times & tastes exactly like the one you mentioned.
|
Shmt
| |
| Thursday, July 19, 2007 - 6:59 pm: |
| 
|
माझ्याकडे थोडासा इडली रवा उरला आहे. त्याचे मी काय करु शकते इडली सोडुन. त्याचा ढोकला करता येइल का? धन्यवाद
|
Malavika
| |
| Friday, July 20, 2007 - 4:13 pm: |
| 
|
इडली रव्याचा उपमा करत येईल. नेहमीसारखाच करायचा. फ़क्त रवा भाजुन घ्यायचा नाही.
|
चॉकलेट बनवायची रेसिपी मिळेल का? मेघा
|
क्ष यू पी दिल्लीत त्या चटणीला सौंठ म्हणतात. आपण भेळेसाठी जी खजुराची चटणी करतो तशीच असते ती. मी आमचूर जीरा पावडर चाट मसाला साखर थोडं तिखट अशी केली होती.. मेघा
|
Dineshvs
| |
| Monday, July 23, 2007 - 3:45 pm: |
| 
|
मेधा बाजारात मिळते तसे चॉकलेट घरी करता येत नाही. कारण त्यात काहि खास पदार्थ घातलेले असतात. पण बेसिक कृति म्हणुन अनसॉल्टेड बटर, पिठीसाखर आणि अर्थातच कोको पावडर वापरुन चॉकलेट्स करता येतात. सर्व घटक आपल्या आवडीप्रमाणे. बटर सॉफ़्ट करुन त्यात साखर व कोको मिसळायची. हवा तो इसेन्स घालायचा, साधारण मऊसर मिश्रण झाले कि त्याची चॉकलेट्स करुन फ़्रीजमधे ठेवायची. हि अगदी बेसिक कृति, वेळ मिळाला कि खास कृति लिहीनच.
|
Savani
| |
| Monday, July 23, 2007 - 4:03 pm: |
| 
|
मेघधारा, ही लिंक बघ. इथे मूडीने बरेच चॉकलेट्स चे प्रकार दिलेत. /hitguj/messages/103383/115705.html?1157550791
|
पाउंड केकची रेसिपी कोणाला माहित आहे का?
|
Zakki
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:40 pm: |
| 
|
होऽऽऽऽ. अग्गदी सोप्प्पी आहे. आम्ही घरी बरेचदा करून पाहिली, पण खालील रेसिपि सर्वात बेष्ट. जवळच्या ग्रोसरीच्या दुकानात जा. तिथून पैसे देऊन घेऊन या. स्वस्त नि मस्त.

|
Shonoo
| |
| Tuesday, July 24, 2007 - 4:24 pm: |
| 
|
मी जॉय ऑफ़ कूकिंग मधली Pound Cake रेसिपी वापरलीये. चांगले होतात. पण सर्व साधारण ग्रोसरी मधे सहज मिळतात पाउँड केक त्यामुळे झक्कींची रेसिपीच जास्त वापरली जाते आमच्याकडे :-)
|
थ्यांक यु शुनु. तुझी रेसिपी क्रुपया देशिल का?
|
Princess
| |
| Wednesday, July 25, 2007 - 4:01 am: |
| 
|
शेंगदाण्याचे पाकातले लाडु कसे करायचे?
|
Karadkar
| |
| Wednesday, July 25, 2007 - 6:24 pm: |
| 
|
Princess, you can get some info here .... /hitguj/messages/103383/46717.html?1139308770
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|