Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » इतर माहिती » Archive through May 23, 2007 « Previous Next »

Chioo
Friday, September 29, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रव्याच्या केकमधे बेकिंग पावडर आणि खायचा सोडा दोन्ही सांगितले आहे. माझ्याकडे सोडा नाही. फ़क्त बेकिंग पावडर चालेल का? सोड्याच्याऐवजी काय घालू? BTW खायच्या सोड्याला इंग्लिशमधे काय म्हणतात?

Moodi
Friday, September 29, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ त्याला Bicarbonate of soda च म्हणतात.

Bee
Friday, September 29, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ त्याला Soda Bicorbonate म्हणतात.

Chioo
Friday, September 29, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मूडी आणि बी. :-)
पण खायचा सोडा नाही घातला तर चालेल का?


Moodi
Friday, September 29, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चालेल गं, बेकिंग पावडर पण चालू शकते. जर मैद्याचा केक असेल(म्हणजे दुसरी रेसेपी, ही रव्याची नाही) तर त्या मैद्याबरोबरच ती पावडर चाळावी म्हणजे छान एकजीव होते आणि केक पण हलका स्पॉंजी होतो.

Chetu08
Wednesday, December 24, 2003 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

War dilelya cake chya recepies try karnyamadhe ek problem aahe maza. ithe dilele sahitya gram madhe kase mojayche. gram into cup che conversion koni sangu shakel ka?

Supermom
Thursday, December 08, 2005 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेकिंग पावडर व बेकिंग सोडा यापैकी केक साठी काय वापरावे? दोन्हीत काय फ़रक आहे?

Seema_
Friday, December 09, 2005 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baking powder वापरतात . मी नेहमी cake करते . baking soda मी तरी कधी वापरला नाही

Chioo
Tuesday, September 05, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ DL च्या कपाच्या मापाने १२५ gm म्हणजे किती होतील? किंवा १ DL म्हणजे किती gm ? मी अजून केक केलेला नाही. प्रथमच करते आहे. पण वजनाने घेताना नेहमी गोंधळ होतो. तर या कपाच्या मापाने सधारण किती घ्यावे लागेल?

Moodi
Monday, September 11, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए चिऊ इथे बघ. रेसेपी तर आहेतच आणि एकदम आधी मोजमाप दिलयं DL चे.

http://virtual.finland.fi/netcomm/news/showarticle.asp?intNWSAID=26069

Moodi
Monday, September 11, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केकसाठी काही टिप्स.

कॅस्टर शुगर ही केव्हाही चांगली कारण ती चटकन विरघळते. क्रिमीश केकसाठी हीच चांगली. जिंजरब्रेड / केक साठी ब्राऊन शुगर चांगली. आइसींग शुगर मात्र नेहेमी चाळुनच घ्यावी.

अंडी वापरतांना फ्रिझमध्ये ठेवलेल्या अंड्यापेक्षा रुम टेंपरेचरला असलेली अंडी वापरावीत. किंवा फ्रिझमधली अंडी रुम टेंपरेचरला आल्यावर मग वापरावीत.

पेस्ट्रीकरता थंडगार पाणी चांगले.

बटरपेक्षा मार्गारीन / मार्जारीन जास्त चांगले कारण त्याने क्रीम केक जास्त चांगला बनतो.


Dineshvs
Monday, September 18, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोडा बाय कार्ब म्हणजेच खायचा सोडा तोच घालायचा असतो. पण बेकिंग पावडरपेक्षा अर्ध्या प्रमाणात. आणि अगदी शेवटी घालायचा. त्याशिवाय केकला जाळी पडणार नाही. त्याशिवाय केला तर खांडवीसारखा प्रकार होईल.

Manuruchi
Thursday, January 11, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi, mi ethe navin ahe, mala cake vishayee thodi mahiti havi hoti, me All in One Cake Var dilelya mojmapane kela pan to hava tasa sponjy zala nahi . Ani mi margarine vaparle hote .

Me_mastani
Tuesday, April 24, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेपर कप मधे केक बनवताना कोणती काळजी घ्यावी? किती तापमान ठेवावे? ओवन मधे ठेवताना कोणत्या लेवल वर ठेवावे? ट्रे मधे अरेंज करून ठेवावे का?

Me_mastani
Monday, May 21, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ुगलेला केक ओवनच्या बाहेर काढल्यावर खाली बसतो. याचे काय कारण असावे?

Dineshvs
Monday, May 21, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा केक खाली बसण्याचे कारण म्हणजे सोडा जास्त झाला, मैदा चिवट नव्हता आणि हे दोन्ही नीट मिसळले नव्हते.
मैदा व बेकिंग पावडर चाळणी जरा उंचावर धरुन दोनतीनवेळा चाळायचे असते. त्याने ते नीट मिसळले जाते. तसेच फ़ेटतानाही नीट म्हणजे सांगितले असेल तसे ( एकाच दिशेने, कट आणि फ़ोल्ड पद्धत वैगरे ) फ़ेटावे लागते.
असे नीट मिसळले की बेकिंग पावडर मैद्याच्या कणात नीट मिसळली जाते. त्यापासुन जो वायु मुक्त होतो, त्याचे बुडबुडे सगळ्या केकमधे समान आकाराचे होतात. मैदा चिवट असल्याने, आलेला फुगवटा तोलला जातो. जर मैदा पुरेसा चिकट नसेल, आणि आतले वायुचे बुडबुडे मोठे आणि असमान असले तर केक कोलॅप्स होतो.


Alpana
Tuesday, May 22, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कट आणि फ़ोल्ड पद्धत काय असते ?

Me_mastani
Tuesday, May 22, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदादा. मी मावा केक साठी खालील प्रमाण घेतले होते-१ कप मैदा, १ कप मावा पावडर, १ कप बटर, ३ अंडी, १ कप साखर, १ टि. स्पून बेकिंग पावडर, अर्धा टि. स्पून सोडा.
हे प्रमाण बरोबर आहे का?


Dineshvs
Tuesday, May 22, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना, गोल भांड्यात मिश्रण घेऊन मधोमध कापल्यासारखे करायचे. मग तो भाग उरलेल्या भागावर घडी घातल्यासारखा घालायचा. मग भांडे ९० अंशात फ़िरवुन परत तसेच करायचे. याला कट & फ़ोल्ड पद्धत म्हणतात.
मस्तानी प्रमाण बरोबर आहे, पण मावा मात्र नीट मोडुन नीट मिसळुन घ्यायला हवा. जर पावडर वापरली तरी नीट मिसळुन घ्यायला हवी.


Me_mastani
Wednesday, May 23, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you again Dineshdada.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators