अहह!!!! नका रे त्या आठवणी जागृत करून मनाचा तडफडाट करू!सालं या बीबी वर जेऊन आलं तरी पुन्हा भूक लागते हो ! त्यात तो दिनेश असला म्हणजे मेलोच. नुसत्या वर्णनावरच खल्लास!!
|
परवाच मी आणि माझा बॉस कयानी मधे जाऊन मावाकेक खाऊन आलो. अप्रतिम... बॉसने मला मुंबईमधल्या एकसोएक "खादंतीच्या" जागा फ़िरवल्या आहेत. त्यामधे सुलेमान उस्मानची नानकटाई.. अहाहा.. तिथेच मिळणारी फ़िरनी.. आणि सरदारजीची पाव भाजी. अजून आठवलं की लिहीन..
|
Alpana
| |
| Wednesday, July 11, 2007 - 10:51 am: |
| 
|
नन्दिनी तुझ्या बॉसचे नाव काय आहे? तु १-२ वेळा केलेल्या वर्णनावरुन मला माझ्या मामाची आठ्वण झाली... तो पण तुझ्याच फिल्डमध्ये आहे...महाराष्ट्र टाइम्स मध्ये
|
Manjud
| |
| Wednesday, July 11, 2007 - 11:21 am: |
| 
|
नंदिनी, ग्रांट रोड चे मेरवानचे मावा केक लाजवाब. एल्कोची पाणीपुरी सहीच. ठाण्याची मामलेदाराची मिसळ एकदम ठसकेदार. दादरच्या किर्ती कॉलेजजवळचा वडा पाव केवळ अप्रतिम. विठ्ठलची भेळ तर वाह वाह. व्हि. टी. ला सुविधा नावाचे एक हॉटेल आहे तिथली कांचीपुरम इडली आणि माटुंग्याला पोदारजवळ मणिज लंच होम तर हम्म....... मी नॉन्-वेज खात नाही पण संध्याकाळी ७.३० नंतर गेट वे ऑफ ईंडिया जवळ बडे मियाकडे तंदूरी तर केवळ अशक्य........ असे ऐकून नवर्याला मुद्दाम तिकडे घेऊन गेले होते तंदूरी खायला. च्यायला लाळ टपकायला लागेल ....... ह्या विषयावर एक नविन BB चालू करायला हरकत नाही खादाड लोकानी
|
या सगळ्याच्या रेसिप्या पण लिहीणार आहे का कुणी? या सगळ्यासाठी एक " मला आवडनारे पदार्थ मला असे आवडतात " नावाचा बीबी होता ना? बरेच लोक नाक, तोंड, डोळे यातून गळणारे पाणी आवरत, जिभल्या चाटत या बिबीवर लिहीत वाचत असत. तिथे लिहू शकता हे सगळे.
|
Shonoo
| |
| Wednesday, July 11, 2007 - 12:16 pm: |
| 
|
एस्प्लनेड मॅंशन नावाची एक भिकार बिल्डिंग होती युनिव्हर्सिटीपासून काला घोडा ला जायच्या वाटेवर त्या बिल्डिंगच्या कोपर्यावर एक इराणी होता आणि मागे फूटपाथवर एक वडापाव वाला. त्याच्या कडचे वडापाव खायचे डोहाळे होते मला दोन्ही वेळी. आणि सुदैवाने दोन्ही वेळा कोणी ना कोणी ते इथ पर्यंत आणून पोचवलेत! सकाळी चर्चगेट स्टेशन वरून आर्मी नेव्ही मधे कामाला जाताना रोज त्या बटाटे वड्याच्या मिश्रणाचा वास घेतला आहे. तसे वडे करायला जमले पाहिजेत :-( त्या इराण्या कडे खिमा अगदी मस्त असायचा. ऑफ़िसमधली veg लोकं त्या खिम्यामधे बेवारशी कुत्र्याचं मास असतं वगैरे रेवड्या उठवायची. पण तरिही आम्ही खिमा पाव किंवा खिमा पॅटिस वर ताव मरत असू. गेले ते दिन गेले :-(
|
अरे गप्प बसा .........
|
त्या पावाला "बनपाव" म्हणतात. थोडासा गोडसर असलेला हा पाव टिपिकल इराणी आहे. त्याला फक्त मस्का लावून आणि वर थोडीशी साखर भुरभरून तो इराण्याच्या चहाबरोबर खाणे म्हणजे "केवळ सुख>>>>>>>> गुडलक पाडल म्हणे. ह्या बनपावा साठी काय काय सहन केलय. तो चहा फार काही चांगला नसायचा पण त्यात बुडवन खाल्या शिवाय तो आनंद काय हे कळायचे नाही. मागच्या मे मध्ये गुडलक ला जाउन आलो. लकी मला फार आवडायचे नाही. नाझ महानाझ पण पाडले असे ऐकले. खर आहे का ते. पुणेकरांन्नी रामनाथ चे नाव अजुन कसे लिहीले नाही. ज्याने रामनाथ ची मिसळ खाल्ली नाही त्याने मिसळ खाल्ली नाही. ठाण्यातल्या मामि (मामलेदार) पे़षा लय भारी. कयानी (पुण्याची) पण जबरी बेकरी होती. तिथली खारी. आहाहा ज्याच नाव ते. पेठेत बाकरवडी साठी जशा रांगा लागायचा तशाच क्म्पात खारी साठी. अल्पना समोर (टॊकीज) एक पराठ्याच दुकान आहे. तिथे एकदम जबरी प्राठे (त्याचा भाषेत) मिळतात. टिळक (गुरुप्रसाद) चे ब्रेड पकोड केवळ अप्रतीम.
|
Sayuri
| |
| Wednesday, July 11, 2007 - 5:37 pm: |
| 
|
या सर्वांसाठी एक मस्त साईट आहे. http://sigfood.org/taxonomy_dhtml आणि त्यातली सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे http://sigfood.org/Specials/Ukadiche_Modak

|
Ksha
| |
| Thursday, July 12, 2007 - 3:59 am: |
| 
|
पाडलं??!!! असं कसं पाडतील? दोन वर्षांपूर्वी त्यांना पहाटदिवाळीचा पुरस्कार वगैरे मिळाला होता! आणि चांगलं चालत होतं पण काही सांगता येत नाही. फारच मोक्याची जागा होती ती! असो. टिळक रोडवरचं रामनाथ. त्यांची ती तर्री आठवली तरी अजून ठसका लागतो! पण मध्यंतरी काही वावड्या उठल्या होत्या त्यांच्या अस्वच्छतेबद्दल. त्यामुळे जाणं सोडलं होतं सायुरी, साईट छानच आहे!
|
Psg
| |
| Thursday, July 12, 2007 - 5:14 am: |
| 
|
केदार, गुडलक नाही पाडलं रे बाबा अजून! लकी पाडलं. आणि नाझ बेकरी, कयानी बेकरी अगदी जोरात चालू आहेत. कल्पनेतही पाडू नका त्यांना तसंच, श्रीकृष्ण मिसळ, रामनाथ ही दुकानंही धडाक्यात चालू आहेत. सर्वात कमाल श्रीकृष्णचीच वाटते मला. तुळशीबागेत बायकांच्या लोंढ्यांना, अनेक प्रकारच्या प्रसाधनसाहित्याला समर्थपणे तोंड देत उभ आहे बिचारं
|
Milindaa
| |
| Thursday, July 12, 2007 - 9:57 am: |
| 
|
बरं. आता ही चर्चा जर योग्य बीबी वर झाली तर अजुन बरं होईल.
|
Manjud
| |
| Friday, July 13, 2007 - 6:41 am: |
| 
|
मिलिंदा, खरंय तुझं. " माझी खाद्ययात्रा " अश्या नावाचा thread ओपन करून तिथे ह्या सर्व पोस्ट्स हलवल्या पाहिजेत.
|
Milindaa
| |
| Friday, July 13, 2007 - 7:27 am: |
| 
|
नको नको, नवीन बीबी नको. आहेत तेच वापरा उदरभरण नोहे.. माझे आवडते पदार्थ..
|
Manjud
| |
| Friday, July 13, 2007 - 7:39 am: |
| 
|
धन्स मिलिंदा, मी हे BB पाहिलेच नव्हते
|
Bee
| |
| Friday, July 13, 2007 - 9:47 am: |
| 
|
नविन बीबीचे नाव काढले की मिलिंदा घाबरतो
|
Supermom
| |
| Friday, July 13, 2007 - 12:29 pm: |
| 
|
दिनेश व इतर पाककलानिपुण लोकांची हेल्प हवीय परत. मला आज potluck साठी भाताचा प्रकार न्यायचाय. घरी भरपूर पनीर आहे. त्याचे तुकडे घालून करता येईल का भात? तसे केल्यास पनीर तळून घ्यावे लागेल की नुसतेच परतून घ्यावे तेलावर? मागे एकदा माझे पनीर चिवट्ट झाले होते तेव्हापासून जरा धसकाच घेतलाय. एखादी वेगळी रेसिपी सुचवेल का कोणी? भाताच्या बी बी वरच्या बहुतेक रेसिपीज जसे मसालेभात, पुलाव बरेचदा खिलवून झाल्यात.
|
Nalini
| |
| Friday, July 13, 2007 - 2:22 pm: |
| 
|
सु. मॉ., ईथे बटाटा भात बघ.
|
Sneha1
| |
| Friday, July 13, 2007 - 2:28 pm: |
| 
|
भाज्या आणि वरण शिजवून फ़्रीजर मधे ठेवले तर किति दिवस चांगले राहिल?
|
Ravisha
| |
| Friday, July 13, 2007 - 4:43 pm: |
| 
|
Sayuri,tks for d link.Very informative for all epicures 
|