|
Nalini
| |
| Friday, July 13, 2007 - 2:17 pm: |
|
|
बटाटा भात: Potato Rice तांदुळ जरावेळ भिजू द्यावेत. जास्त पाणी, मीठ घालून भात अर्धवट शिजवून घ्यायचा. हा भात गाळणीतुन गाळायचा. त्यावर गार पाणी घातले तरी चालते. एका जाड बुडाच्या पातेल्यात बटर घालायचे त्यावर नुकत्याच पाण्यातुन काढलेल्या बटाट्याच्या चकल्या बुडाशी पसरावायच्या. वरुन भाताचा एक थर द्यायचा. केशराच्या १०-१२ काड्या पसरवून टाकायच्या. त्यावर परत भाताचा थर घालायचा. ह्यावर आणखी थर घालायचा असेल तर त्या भातात शेपू कापुन घालता येइल. गॅस मंद आचेवर ठेवायचा. वरुन परत थोडे बटर टाकुन पातेले कापडाने झाकायचे व त्यावर झाकणी घालायची. आता ह्याकडे सधारण २० मि. लक्ष द्यायची गरज नाही. पातेले घेताना नॉनस्टिक न घेता स्टिलचे घ्यावे. भात काढताना पातेल्यावर एक प्लेट पालथी घालावी. पातेले कापडाने व्यवस्थित पकडून ते उपडे करावे. बटाट्याचा भाग वरती येतो. ह्याला वेगळ्या डेकोरेशनची गरजच उरत नाही. बटाट्यांचा बदलेला रंग खुपच छान दिसतो. हा भात बघता बघता संपुन जातो. फोटोसहच कृती टाकायला हवी होती पण दरवेळेस फोटो काढायचा राहुन जातो.
|
Sonchafa
| |
| Sunday, August 19, 2007 - 2:52 pm: |
|
|
बटाट्याचा चकल्या कि चकत्या अन हे शिळ्या भाताचे बनवले तर चालेल का?
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|