|
thank you very much Karadkar
|
Sms
| |
| Tuesday, July 03, 2007 - 9:12 pm: |
| 
|
Eggless cake chi recipe kuthe milel?
|
Disha013
| |
| Tuesday, July 03, 2007 - 9:47 pm: |
| 
|
मिनोती,मस्त आहे गं तुझा ब्लॉग.मी बराचसा वाचला पण. कराडच्या आठवणीनी मन भरुन गेले...
|
Sayuri
| |
| Wednesday, July 04, 2007 - 4:14 am: |
| 
|
okk. Thank you Mrinmayee for suggestion
|
सायुरी, जर अंड चालत असेल तर, मी सुचवु का? एक टिन मिल्कमेड ला २ अंडि फ़ेसुन घ्यावी त्यात हे मिल्कमेड ओतुन पुन्हा नीट मिक्स करुन त्यात हवे असल्यास dry fruits किंवा आवडिचा इसेंस घालावा. ज्या भांड्यात करणार असाल त्यात चमचाभर साखर टाकुन प्रखर आचेवर जाळुन घ्या ते भांड कुकर मधे पाणि ताकुन त्यात ठेवा म्हणजे साखरेचा थर घट्ट होईल. मग मिल्कमेडच मिश्रण त्यावर ओता. कुकर बंद करुन Gas वर प्रखर आचेवर ठेवा, पहिली शिट्टि झाल्यावर gas अगदि बारिक करुन १५ मिनिटे ठेवुन मग बंद करावा. कुकर पुर्ण थड़अ झाल्यावरच उघडावा.
|
Psg
| |
| Wednesday, July 04, 2007 - 6:09 am: |
| 
|
लीना, बेरीचे विविध उपयोग म्हणजे काय हवय? वेगवेगळ्या रेसिपी हव्या आहेत का बेरीच्या? बेरीत भरपूर calcium असतं, गूळ घालून जरूर खावी- हा सर्वात बेस्ट उपयोग
|
Leenas
| |
| Wednesday, July 04, 2007 - 8:39 am: |
| 
|
थॉन्क्यु psg. मला बेरीच्या रेसीपीज ह्व्या आहेत. म्हणजे लाडु, वड्या ई.
|
Psg
| |
| Wednesday, July 04, 2007 - 11:43 am: |
| 
|
लीना, बेरीचे लाडू, बेरीच्या खवा घालून साटोर्या वगैरे पदार्थ आहेत. १-२ दिवसात देते कृति. पण या सगळ्याला किमान २ वाट्या बेरी हवी. एकदम ५ किलो लोणी कढवलेस की काय?
|
Sayuri
| |
| Thursday, July 05, 2007 - 4:57 am: |
| 
|
Anjalisavio, Receipe is very interesting. Thanks for tht
|
Ksmita
| |
| Thursday, July 05, 2007 - 7:20 pm: |
| 
|
मला मस्का पाव बद्दल माहीती हवी आहे इराण्याच्या हॉटेलमधे किंवा मुंबईत टपरीवर प्रसिद्ध असल्याचे बरेचदा वाचले आहे. हा पाव पावभाजीच्या पाव सारखा खूप लोणी लावलेला असतो का आणि कशाबरोबर खायचा असतो की नुसताच ???
|
Dineshvs
| |
| Friday, July 06, 2007 - 5:42 pm: |
| 
|
हा पाव पावभाजीच्या पावापेक्षा थोडा मोठा असायचा. त्याला आडवे कापुन भरपुर मस्का लावत असत. मग त्याचे उभे तीन तुकडे करत असत. तो चहाबरोबर खात असत. आता इराण्याची हॉटेल्सच दुर्मिळ झालीत. पुण्यात भंडारकर रोड जिथे संपतो, तिथे एक इराण्याचे हॉटेल अजुन तग धरुन आहे. हा मस्का म्हणजे बीफ़ फ़ॅट असते, असा एक समज होता, म्हणुन मी तो खात नसे. तसेच इराण्याकडच्या चहातही ते लोक अंड्याचा बलक घालतात, म्हणुन तो दाट होतो, अश्याही वंदता होत्या. खरेखोटे मला माहित नाही.
|
परवा एका thai restaurant मध्ये Pineapple Fried Rice खाल्ला. अप्रतिम होता.कुणाला recipeमाहित असेल तर द्या. Plzzzzzzzzz
|
Slarti
| |
| Friday, July 06, 2007 - 10:02 pm: |
| 
|
भांडारकर रस्त्याच्या टोकाला आहे ते गुडलक. शिवाय कॅम्पात खासम् खास दोराबजी (बिर्यानी हो तिथली... अहाहाहाहा...) आहे, जॉर्ज आहे, जंगली महाराजवरसुद्धा एक आहे, त्याचे नाव विसरलो. नाझ गेले, लकी गेले... ही दिव्य परंपरा लोप पावण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सामिष खाणार्यांनी इथे कोठेही अवश्य व त्वरित भेट द्यावी. गुडलक तर केवळच आहे !! खिमा, भेजा फ्राय, चिकन मसाला, कोल्हापुरी चिकन (जे सर्व पूर्वजांची आठवण करुन देते), ब्रेड पुडींग.... तोंडात आणि डोळ्यांमध्ये पाणी उभे राहिले आहे...
|
Ksha
| |
| Saturday, July 07, 2007 - 7:47 pm: |
| 
|
"गुडलक" कॉलेजमध्ये असताना आमचा अड्डा असायचा. टिपिकल अड्डा स्टाईलमध्ये तिथे १ चहा घेऊन तुम्ही कितीही वेळ टवाळक्या करत बसला तरी काही कोणी बोलत नसे. किंबहुना बहुतेक इराणी हॉटेलची ती खासियतच होती. कॉलेज क्राऊडला आकर्षून घेण्यासाठी! डेक्कनचं हॉट लोकेशन आणि कितीही वेळ बसण्याची मुभा... अजून काय पाहिजे? त्या पावाला "बनपाव" म्हणतात. थोडासा गोडसर असलेला हा पाव टिपिकल इराणी आहे. त्याला फक्त मस्का लावून आणि वर थोडीशी साखर भुरभरून तो इराण्याच्या चहाबरोबर खाणे म्हणजे "केवळ सुख"
|
Ksmita
| |
| Saturday, July 07, 2007 - 11:06 pm: |
| 
|
अच्छा असे आहे का हे मस्का प्रकरण खरेच त्यात बीफ़ फ़ट असेल तर मग कटापचं आपला bread-butter च मस्का पाव समजून खायचा मस्क्याची चव लोण्यासारखीच असते कि काही वेगळी असते ?
|
Deepa_s
| |
| Monday, July 09, 2007 - 7:40 am: |
| 
|
कोणी वांगी पोह्याची रेसिपी देईल का?
|
Dineshvs
| |
| Monday, July 09, 2007 - 6:12 pm: |
| 
|
दीपा, वांगी पोहे /hitguj/messages/103383/127959.html?1184004679 इथे आहेत
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 10, 2007 - 5:14 pm: |
| 
|
क्ष, मुंबईत त्याला ब्रुन मस्का असा शब्द होता वाटतं. आमच्या पोद्दार कॉलेजच्या बाजुलाच कॅफ़े गुलशन होते. पण गेल्या अनेक वर्षांपासुन त्याचे फ़ास्ट फ़ुड जॉईंट झालेय. मेट्रो जवळ कयानी होते ( अजुन असेल ) तिथे केक छान मिळायचे. ग्रांट रोड चे मेरवानजी अजुन आहे, तिथले ते सुप्रसिद्ध मावा केक अजुनही मिळतात. पण तिथे सकाळीच जावे लागते. ते केक असण्यापेक्षा संपलेलेच असतात नेहमी. दादरला अग्निशमन दला समोर, सिग्नलजवळ एक ईराण्याचे हॉटेल होते, पण त्याची पार रया गेलीय. संगमरवरी गोल टॉप असलेली टेबले. काळ्या उंच पाठीच्या खुर्च्या, भिंतीवर ईराणच्या राजाची आणि राणीची तसबीर, गल्ल्यावर बसलेला स्थुल गोरापान ईराणी, त्याच्या काऊंटरवर सिगरेट, रुमाल, बॅटरी, सेल, कंगवे अश्या अठरापगड गोष्टी विकायला, भिंतीवर उंच आरसे, टाईम्स ऑफ़ इंडिया, ज्युक बॉक्स आणि निवांतपणा, मिळणार्या पदार्थात, चहा, ब्रुन मस्का, केक, खारी, ऑम्लेट, सामोसा, कष्टर्ड, खिमा पॅटिस असे मोजकेच पदार्थ. क्वचित फ़ॅमिली रुम ---
|
Sayuri
| |
| Tuesday, July 10, 2007 - 7:35 pm: |
| 
|
लग्नामध्ये लोणची-चटण्या-चटपटा चना-रायते इत्यादिंच्या समुदायात तळलेल्या गवारी म्हणून प्रकार असतो. कुरकुरीत असा. (त्या गवारीच्या शेंगा असतात असं मला कोणीतरी सांगितलं..की ते कारलं असतं?) ते नक्की काय आहे आणि कसं करायचं कोणी सांगू शकेल का?
|
Deepa_s
| |
| Wednesday, July 11, 2007 - 7:04 am: |
| 
|
माझ्या माहिती प्रमाणे काही भाज्या उदा. गवार (अख्खी), कारली (बारीक काचर्या करून) मीठ लावून उन्हात वाळवतात आणि मग हव्या तेव्हा तळून खातात. छान कुरकुरीत लागतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|