Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 05, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through July 05, 2007 « Previous Next »

Vrushs
Sunday, January 21, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalu मला Olive oil dip ची
recipe milel ka pls?

Megha16
Thursday, March 15, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय,
मला थोडी मदत हवी आहे मेनु ठरवण्या साठी.माझ्या कडे येत्या मंगळवारी एक लंच पार्टी आहे Baby Shower च्या निमित्ताने.
मला सगळा चाट चा मेनु करायचा आहे. मला काही मेनु सुचवा ना जरा. please आणी Advance मध्ये thanks


Chinnu
Thursday, March 15, 2007 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा आलु टिक्की नाहीतर समोसा / कचोरी चाट ठेव. सोबत रसगुल्ले / गुलाबजाम आणि icecreme . एखादा रेडिमेड चिवडा नाहीतर भेळपुरी आणि cut fruits ठेवलीस तर बच्चे पार्टी खुश! हे सर्व Dry वाटत असेल तर मात्र दहीवडा चाट ठेवता येईल.

Lalu
Thursday, March 15, 2007 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vrushs तुझे पोस्ट मी आज पाहिले. नेमकं काय हवं आहे? ब्रेड डिप करण्यासाठी का?

मेघा,

>>मला सगळा चाट चा मेनु करायचा आहे
तिला acidity होईल की गं. :-) ~D
तिनेच सांगितलं असेल तर ठीक. किंवा मग सरप्राईज नसेल तर तिलाच विचार. लहान मुले पण आहेत?



Prady
Thursday, March 15, 2007 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा माझ्या कडे चाट पार्टीला मी रगडा पॅटीस, भेल, शेवपुरी असा बेत ठेवला होता. रगडा आधी करून ठेवता येतो. चटण्या पण करता येतात. शेव बटाटा पुरीला चपट्या नेहेमीच्या पुर्‍या न वापरता पाणीपुरीच्या पुर्या वापरल्या तर लगे हातो पाणी पुरी पण करता येईल. चटण्या कॉमन असतात. बटाटे जवळ जवळ सगळ्यातच लागतात. आणी फार मेहेनत पण नाही. गोडाला तुला जे सोईचं वाटेल ते ठेव. मी मँगो पाय केला होता. अगदी सोपा आणी झटपट.

Lajo
Thursday, March 15, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, चाट ची थीम असेल तर गोड म्हणुन 'फ्रुट चाट' पण ठेवता येईल.
आवडीची फळं चिरुन त्यावर थोडा लिंबाचा रस घालुन ठेवायचा (म्हणजे फळं काळी पडत नाहीत) बोल मधे चिरलेली फळ, तोडा सुकामेवा घालायचा आणि वरून चाट मसाला पेरायचा. लहान मुलांसाठी चाट मसाल्या ऐवजी कस्टर्ड किंवा आइसक्रीम घालायचे.


Megha16
Friday, March 16, 2007 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याचे धन्यवाद,
छान मेनु सुचवलेत. फ्रुट सॅलेड ची आयडीया छान वाटतेय.
लालु, अग तिला खुप खावस वाटतय चाट. कारण स्वत्: करे पर्यत ती इतकी कंटाळुन जाते म्हणुन म्हटल की जरा चट्पटीत मेनु ठेवावा.
प्रज्ञा, रगडा पॅटीस,आलु टीक्की पनि पुरी च चाललय आमच.
चिनु ने सुचवलेला दही वडा कल्पना छान वाटली.
उद्या मैत्रीणी शी बोलुन ठरवते मेनु.....
thanks a lot.......


Vrushs
Friday, March 16, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो. Actually as a starter.

Visoba_khechar
Friday, March 16, 2007 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>एक लंच पार्टी आहे Baby Shower च्या निमित्ताने.

Babay Shower म्हणजे काय? हा नक्की काय प्रकार आहे ते कळेल का? मी यापूर्वी असला कुठलाही shower ऐकला नव्हता म्हणून विचारतो!

(एक एक ऐकावं त्या पद्धती-चालीरिती की नवश्रीमंताची थेरं? हा प्रश्न पडलेला!) तात्या.


Prady
Friday, March 16, 2007 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार विचार नका करू तात्या. कशाला त्रास करून घेता स्वत्:ला या वयात? Baby shower कुठलंही नवश्रीमंतांचं थेर वगैरे नाही. डोहाळेजेवणाचंच साहेबाच्या भाषेतलं नाव.

Lalu
Friday, March 16, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vrushs, flavoring आणि dipping साठी वेगळी olive oils विकत मिळतात. Carapelli ब्रॅन्ड ची चांगली असतात. त्यात पुन्हा ड्राय किंवा फ्रेश italian spices, लसूण बारीक चिरुन, मिरीपूड, red pepper flakes असे पदार्थ घालता येतात. garlic, chillies फ्लेवर चे olive oil पण मिळेल. खाताना ब्रेड थोडा warm असेल तर छान लागतो.

Vrushs
Sunday, March 18, 2007 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank u Lalu.खूप दिवसांपासून हवी होती मला ही recipe.आता करून बघेल.

Supermom
Tuesday, March 20, 2007 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बावीस लोकांच्या डिनर पार्टीसाठी कोणी अंदाज देईल का मला?
मेनू असा आहे,
स्टार्टर्स म्हणून्-
तन्दुरी पद्धतीने ग्रिल केलेल्या भाज्या, चिप्स
मेन मेनू-
पुलाव
बटाट्याची उकडून भाजी
मटार उसळ(फ़्रोजन पीज वापरून)
बुंदी रायता
दाल फ़्राय
चपात्या
सलड

गोड म्हणून गाजर हलवा, केक

फ़्रोजन पीज, बटाटे व गाजराचा अंदाज मुख्यत्वेकरून हवाय. मला वाटतेय की पीजचे दोन पौंडांचे तीन पॅकेट्स लागतील. कोणी मदत करेल का?


Dineshvs
Wednesday, March 21, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रीन पीजचा अंदाज बरोबरच आहे. दोन्ही भाज्या कोरड्या नको. एक ग्रेव्हीवाली असावी.
बटाटे तीन किलो पुरतील. गाजरे पण तीन किलो लागतील. केक आहे म्हणुन कमीहि पुरतील.
मोठ्या पार्टीसाठी अंदाज करताना, घरातला सामान्य भुकेचा माणुस किती जेवतो, त्याला माणसांच्या संख्येने गुणुन अंदाज करता येतो.
दाल फ़्रायसाठी एक किलो डाळ पुरेल. बुंदीरायता साठी एक किलो बुंदी पुरतील. चपात्या प्रत्येकी दोन ते तीन लागतील. ( आकारावर अवलंबुन ) पराठे आधी करुन अर्धवट भाजुन ठेवता येतील. आयत्यावेळी नुसते तुप सोडुन गरम केले कि झाले.
तंदुरी करायच्या भाज्या आधीच मॅरिनेट करता येतील. बटाटे आदल्या दिवशी उकडुन ठेवता येतील.


Supermom
Thursday, March 22, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, खूप खूप धन्यवाद.
पीज चे एक पॅकेट जास्तीचे आणून, हिरवे वाटणही करताना फ़्रीजमधे थोडे जास्तीचे ठेवणेही ठीक राहील. नाही का? म्हणजे वेळेवर दोन मिनिटात तयार. कमी पडले तर.


Dineshvs
Thursday, March 22, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्रीजमधे राहण्यासारखे सगळेच आधी करुन ठेवता येते. बुंदी रायत्याच्या दह्यात एखादा उकडलेला बटाटा कुस्करुन टाकायचा आणि एखादी काकडी किसुन टाकायची, म्हणजे ते रायते घट्ट गोळा होत नाही.
तंदुरी करायच्या भाज्यांबरोबर, हिरवी सफरचंद, अननस, स्टारफ़्रुट, मोठी केळी असेहि तंदुरी करता येते.
या सगळ्याबरोबर जलजिरा किंवा काला खट्टा सरबत मजा आणते.


Supermom
Thursday, July 05, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहा लोकांच्या पार्टी साठी छानसा मेनू सुचवेल का कोणी मला? आणि हो, बर्थ डे पार्टी आहे. म्हणजे केक असेलच. तर गोड पदार्थ त्या हिशोबाने सुचवा.

Karadkar
Thursday, July 05, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु. मॉ. उन्हाळ्याचे दिवस आहेत. दुसरे कहि स्वीट न करता फ़ळांचे कबाब करु शकतेस. कारण केक आहेच.

आणि बाकीचा मेनु पण खुप spicy ठेवु नको कारण गरम हवेत साधे हलके जेवण बरे वाटते.

एक लिंक देतेय ती बघुन तु फ़ळाचे डेकोरेशन करु शकते.
http://www.ediblearrangements.com/

हे करायला वाटते तितके अवघड नसते. लहान मुलाना मदत करायला खुप आवडते ह्या प्रकारात.

बाकी मेनु तुला डिनर की लंच त्यावर ठरवता येइल

Mrinmayee
Thursday, July 05, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरुवातीला:
पालकाचे कबाब किंवा मुगभजी पुदिन्याच्या चटणीबरोबर
भाजलेले शेंगदाणे आणि मक्याचे दाणे एकत्र करून त्यावर चाट मसाला,कांदा, कोथिंबीर आणि लिंबु पिळून

जेवणात:
कैरीचा तक्कु भरून केलेलं कांद्याचं लोणचं
सोलकढी
खमंग काकडी
पापड
आलु-पालक सुकी भाजी
वालाच्या डाळिंब्यांची उसळ (बेताचा रस्सा ठेवून) (सोलकढी असली की ह्या उसळीचं कॉंबीनेशन मस्तच!)
वांग्याचं भरित, दही घालून
फुलके किंवा तेलपोळ्या
टोमॅटो राईस



Supermom
Thursday, July 05, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती, मस्तच लिंक दिलीयस ग तू. गर्मीमधे खरंच करण्यासारखी डेकोरेशन्स आहेत ही. धन्स तुला.
अन मृ, तुझा मेनू पण अगदी खास उन्हाळा स्पेशल वाटतोय. (कांद्याचं लोणचं कालच केलय मी. तक्कू भरून. अर्थात ते पार्टीपर्यंत उडेल म्हणा.) मुख्य म्हणजे यातले एक दोन वगळता बहुतांशी पदार्थ थंडच सर्व्ह केले तरी चालण्यासारखे आहेत. खूप चालना दिलीत तुम्ही दोघींनी माझ्या डोक्याला. thanks तुला पण.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators