|
Manuruchi
| |
| Thursday, July 05, 2007 - 12:13 pm: |
|
|
malpova kasa karayacha yachi krupya kruti sangal ka
|
Dineshvs
| |
| Thursday, July 05, 2007 - 4:08 pm: |
|
|
मालपोवा नव्हता का इथे ? एका दंतकथेनुसार फ़सुन पसरलेल्या जिलेबीपासुन मालपोव्याची उत्पत्ती झाली, असे म्हणतात. दोन वाट्या मैदा किंवा कणकेसाठी अर्धी वाटी साखर व अर्धी वाटी खवा किंवा अर्धी वाटी दुधपावडर घ्यावी. पाण्यात आधी साखर मिसळुन घ्यावी, मग बाकिचे जिन्नस घालावेत. भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट भिजवावे. रात्रभर ठेवावे. सकाळी त्यात बडिशेपेची पुड अर्धा चमचा घालावी, किंवा आवडीचा इसेन्स घालावा. हवे तर एखादे पिकलेले केळे कुस्करुन घालावे. खवा वा दुध पावडर आयत्यावेळी मिसळली तरी चालते. खोलगट कढईत तुप तापवावे. अर्धी पळी भिजवलेले पिठ एकदम त्या तुपात ओतावे. मालपोवा फ़ुलुन आला कि उलटुन तळावा. झार्याने निथळुन, कलत्या ठेवलेल्या ताटात काढावा. मग त्यावर आटवलेली रबडी वा क्रीम घालुन खावे. रबडी कमी गोड असावी.
|
thanks Dineshvs, tumhi farch utrkustha mahiti dilit tya baddal dhanyawad
|
आम्ही मालपुवा कणीक नी तांदुळ घालुन करतो. जवळपास दिनेशदा नी सांगीतले तसेच पण ह्याची चव वेगळी लागते कारण मी वरील पद्ध्तीचा खाल्ला आहे. माझा हा एक fav पदार्थ, जवळपास रोज खायची मी आवडीने (लहान असताना) एक वाटी तांदुळ पीठी (आई मोदकाची पीठी घ्यायची), एक वाटी कणीक, गुळ चवीप्रमाणे, आंबट दही, केसर, वेलची, किंचीत मिठ, हे सगळे रात्री करुन ठेवायचे. सकाळी अतीशय पिकलेले केळे कुस्कुसकरुन घालायचे. नी घोटायचे पिठ, मग बीडाचा तवा असतो त्यात शुद्ध तूप घालुन छान मालपुवे काढायचे. रंग केशरी येतो केसरामुळे. जाळी सुंदर पडते. कधी कधी आजी पिकलेल्या फणसाचा गर टाकायची, सुंदर वास येतो करताना. मला ह्याचीच चव ज्यास्त आवडते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|