|
Shonoo
| |
| Wednesday, May 02, 2007 - 11:43 am: |
| 
|
दिनेश रुचिरा मधे १ वाटी बेसन, चार वाट्या तूप आणि दोन वाटी साखरेचा पाक असं दिलंय. मग बेसनाला तूप चोळून लावावे असं म्हटलंय. ते नेमकं किती तूप? बेसन अगोदर भाजून घ्यायला हवं का? इथे लाडू बेसन म्हणून वेगळं मिळतं ते आणावं का साधं ( बारीक) बेसन चालेल? बेसन आणि पाक एकत्र केल्यावर परत विस्तवावर ठेवून तूप टाकताना विस्तव कसा हवा? पाक गरम असतानाच बेसन त्यात मिसळावे का? मिश्रण थाळीत ओतण्यापूर्वी त्याला थाळीला तुपाचा हात लावावा लागतो का? नॉनस्टिक भांड्यात केलं तर चालेल का? की स्टीलचं जाड बुडाचं पातेलं चांगलं? पहा मी म्हटलंच होतं ना for dummies व्हर्शन पाहिजे म्हणून!
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 02, 2007 - 12:05 pm: |
| 
|
शोनू, बेसनाला तुप चोळायचे ते एक वाटीला एक चमचा पुरेल. ते चोळुन बेसन रवेदार दिसले पाहिजे. पण तरिही कोरडे दिसले पाहिजे. ( ब्रेडच्या चुर्याप्रमाणे ) . बेसन आधी थोडेसे भाजावे लागते. पण लाडवाईतके नाही. स्टीलपेक्षा लोखंडाची कढई चांगली, पण ती नसेल तर उत्तम दर्ज्याचे, म्हणजे उष्णता सहन करु शकणारे नॉनस्टिक भांडे चालेल. पाकातल्या बेसनाचे तपमान खुपच असते शिवाय तुपहि कडकडीत गरम करुन घालायचे असते. लोखंडाची कढई असेल तर जास्त उश्णता चालते. एरवी भांड्याच्या तब्येतीप्रमाणे. पण तरिही ती जरा जास्तच ठेवावी लागते. आणि हात भरभर हलवावा लागतो. तुपाचे तपमान कमी असेल तर जाळी पडत नाही. गरम पाकातच तुप घालायचे असते. गरम पाक आणि तुप याच्या संयोगानेच जाळी पडते. ताटाला तुपाचा हात लावणे आवश्यक आहे. ताटात ओतल्यावर लगेच धारदार सुरीने वड्या कापुन, ताट कलते ठेवायचे, व बाहेर येणारे तुप काढुन घ्यायचे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|