|
Dineshvs
| |
| Friday, June 08, 2007 - 5:04 pm: |
| 
|
पहिल्या पावसात रस्त्याच्या कडेने टाकळा उगवतो. अगदी दोनच पाने फ़ुटलेली भाजी खुप चवदार लागते. याची पाने संयुक्त म्हणजे चार पानाचे मिळुन एक पान असते. पाने गोलसर असतात. याची पाने खुडुन घ्यावीत. हि भाजी जरा कडसर असते म्हणून काहि जण उकडुन पाणी पिळुन टाकतात. पण मला ती तशीच आवडते. तेलाची हिंग जिर्याची फोडणी करुन त्यात कांदा व हि भाजी परतावी. थोडी हळद घालावी. हि भाजी शिजायला जरा वेळ लागतो. म्हणुन जास्त वेळ परतावी लागते. मग त्यात वाटीभर शिजवलेली तुरीची डाळ घालावी. नीट मिसळुन जरा शिजवावी. व वरुन थोडे लाल तिखट घालावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|