|
Dineshvs
| |
| Friday, June 08, 2007 - 4:54 pm: |
| 
|
पावसाच्या सुरवातीला हि भाजी बाजारात येते. आपट्याच्या पानासारखी पाने असतात. पण खुप छोटी आणि हिरवीगार दिसतात. याची फक्त पानेच विकायला असतात. कधीकधी फुलपुडीसारखी पुडी बांधलेली असते. यात निवडण्यासारखे फारसे नसते, तरी जून देठ काढुन टाकावेत. व पाने धुवुन बारिक चिरावीत. तेलाची हिंग घालुन फोडणी करावी व त्यात हिरवी मिरची व कांदा घालुन परतावा. मग हि भाजी टाकावी. थोडा वेळ झाकण ठेवावे. मग झाकण काढुन परतावी. मीठ घालावे व हवे तर थोडे ओले खोबरे घालावे. अत्यंत चवदार भाजी असते हि.
|
खरच अप्रतिम लागते ही कोरळची भाजी! वर सांगितल्याप्रमाणे साधीच भाजी करावी. या पाल्याची मूळ चवच खूप छान लागते. आम्ही यात मोड आलेल्या कडव्या वालाच बिरड घालतो. केवळ वालाचा उग्र वास जावा म्हणून अगदी जरास आल-लसूण-जिरे याची लहानशी वाटलेली गोळी घालायची. माझ्या मते ही आपट्याचीच पाने असतात पण अतिशय कोवळी असतानाच काढतात.
|
Ami79
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:07 pm: |
| 
|
मी कालच बनवली ही भाजी. त्यात बदल म्हणून बेबी कॉर्न च्या चकत्या घातल्या आणि भाजी बरोबरच मिरची शिजत घातली. नन्तर वरून खोबरे घातले. अप्रतीम झाली होती
|
Jagu
| |
| Friday, June 20, 2008 - 5:28 am: |
| 
|
मी कालच ही भाजी बनवली खुपच छान लागते. घरात सगळ्यांना आवडली.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|