|
Dineshvs
| |
| Monday, June 04, 2007 - 5:37 pm: |
|
|
हि काहि ऑफ़िशियल कृति नाही. हे माझे व्हर्जन आहे. चार ग्लासभर जलजिरासाठी दोन लिंबाएवढी चिंच भिजत घालावी. मग त्याचा कोळ काढावा. दोन चहाचे चमचे जिरे, एक चमचा धणे, पाचसहा मिरीदाणे, जरा भाजुन त्याची पुड करावी. एका पातेल्यात चार ग्लास पाणी घेऊन त्यात चिंचेचा कोळ व वरील पावडर घालावी. एक मुठभर ताजी पुदीन्याची पाने. थोडा आल्याचा तुकडा, व थोडी कोथिंबीर एकत्र वाटावी. त्यात हवा तर हिरव्या मिरचीचा लहानसा तुकडा घालावा. हे वाटण त्या पाण्यात घालावे. चिमुटभर हिंग घालावा. मग चवीप्रमाणे साखर व काळे मीठ घालावे. मला त्यात अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आवडतो. हे सगळे फ़्रीजमधे ठेवुन थंड करावे. माठ असेल तर त्यात करावे. तसेच मी पाण्या ऐवजी अर्ध्या प्रमाणात सोडा घालतो. पिताना आवडीप्रमाणे गाळुन घ्यावे वा तसेच प्यावे. पण ढवळुन घेणे आवश्यक आहे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|