|
नागलिचे पापड नाशिक , खान्देश भागात जास्त केले जातात.पुण्या मुम्बै भागात हे पापड कमिच दिसतात.. नागलिच्या पापडासाठी नागली चांगली लाल रंगाची आणावी..काळपट असेल पापड काळपट येतो.. चवित फ़रक पडत नाही.. या पापडाला उस्तावार जास्त असली तर चव मत्र अतिशय सुंदर येते.. नागली आणुन दोन पाण्याट धुवुन घ्यावी याने त्यातिल काड्या कचरा निघुन जातो... मग नागलि पाण्यात भिजत घालावी.किलोला मुठ्भर गहुही मिसळावे १२ तासाने उपसुन मोथ्या टोपात निथळुन घ्यावी.मग,वार्याशी एका सुति साडिवर,जुन धोतरावर पसरुन वाळत घालावी(थेट उन्हात मत्रा घालु नये).सुकुन कोरडी झाली कि चक्किवर दळुन आणावी. चक्की वाल्याकडे दुसरे नागली किंवा गव्हाचे दळण नसेल तर खबरदारि म्हनुन पाव शेर गहु हि बरोबर असु द्यावे ज्वारि बाजरिवर पापडाचे पिठ दळले तर पापड रंग चव सगळ्यालाच उतरतो.मध्यम चाळनी लावुन दळुन आणावे... निवांत वेळी मोठ्या पाटिला,पातेल्याला स्वछ कापड बांधुन पिठ गाळायला बसावे. हे तसे वेळखावु आणी पसार्याचे काम असते...लहानपनि मी हे काम करताना अंगावर खुप कोंडा पिथ उडवुन घेत असे...बांधलेल्या कापडावर थोडे थोडे पिठ घेवुन एकाच दिशेने कापडावर फ़िरवावे...वरति काळपट लाल कोंड्यासारखे पिठ राहिले कि कधुन एका पातिल्यात ताकत जावे.. खालच्या वस्त्रा गाळ पिठाचे पापड करायचे आहेत. नागलिचे पापड गरम लाटायचे असतात तेव्हा २-३ जनी मदतिला असेल तर उत्तम किमान २ तरि जन पाहिजेच.. कारण हि झालि फ़क़्त तयारि... अजुन मुख्य पापड सुरु व्हायचे आहेत. खालील सामानाची तयारि आदल्या रात्रिच करुन ठेवावी खिशी घ्यायला म्हणजे पापडाचे पिठ शिजवायला चांगले कल्हई चे पितळी पातिले , चाटु किवा सोट्या पिठ घेरायला. दुसरे एखादे तेव्हडेच मोठे स्टिलचे पातिले त्यावर बरोबर बसेल अशी चाळणी मसाले:-ओवा-जिरे याचि समप्रमाण भरड पुड,पाप्डखार,सोडा,निवडुन स्वच्छ केलेले तिळ,मिठ, तेल
|
उन्ह तापायच्या आतच खिशिला सुरुवात करावि जेवढ्या पिठाचे पापड करायचे तेव्हढे पिठ छोट्या पातिलीने मोजुन घ्यावे तेव्हडेच पाणी पातेल्यात उकळायला ठेवावे...पाण्यात ओवा-जिरे पुड , तिळ , मिठ झाकन थेवुन पाणी उकळली के पापडखार soda टाकावे.उकाळत्या पाण्यावर पिठ ताकावे आच कमि करावि झाकण ठेवुन २ मिन पिठ अजिबात हलवु नये. आता चाटु ला तेल लावुन चांगले घेरुन घ्यावे..गुठल्या असतिल मोडुन घ्यावा.आता पातिले खालि उतरौन एकिने धरुन दुसरिने चांगले दणादणा घेरुन घ्यावे.२ मिनित वाफ़ देवुनांच बंद करावि. झाकण राहु द्यावे आधिच दुसर्या पातेलीत पाणी उकळण्यास ठेवावे. चाळणिला तेल लावुन शिजवलेले पिठ घालुन वाफ़ेवर ठेवावे.. अस केल्याने पिठ गरम राहाते...आणी पापड खुप हलका होतो.. शिजलेले पिठ असेच नुसते तेल लावुन खायला खुप छान लागते..लोहाचि झीज भरुन खायला हे पिठ उपयुक्त आहे.लहान मुलांना अवश्या द्यावे तर पापड करायला मात्र अजुन थोडे कष्ट आहेतच पिठ गरम असतानच मळुन सारखे करावे.लाट्या करुन पातेलित झाकुन ठेवाव्या. दोन प्लस्तिक कागदात थेवुन पापड लाटावे सोडवुन वेताच्या डालकिवर टाकत जावे .. डालकि भरलि कि उन्हात साडि , प्लस्टिक किंवा धोतारावर वाळत घालावे.. २ उन्ह दाखवुन पापड डब्यात भरुन ठेवावे... तळुन , भाजुन कसेहि सुंदर लागतात...पचायला अतिशय हलके आहेत.
|
पिठ गाळुन वरचे कोंड्याचे पिठ परत दळुन आणावे.त्याचे परत गाळुन पापड करावे याला " निगाळ्याचे " पापड म्हणतात. पिठ घेरताना जास्तिचे उकळिचे पाणी जवळ असु द्यावे खिशि कोरडि वाटलि तर या पाण्याचे हबके द्यावे. microwave मुळे पिठ गरम करणे सोपे झाले आहे. प्रेसयंत्रावर हे पापड पटकन होतात. जमल तर पापडाचा फोटो टाकेल
|
Dineshvs
| |
| Saturday, May 26, 2007 - 3:37 am: |
| 
|
प्राजक्ता, मी खाल्ले आहेत हे पापड. तिकडे नागली पिकत नसली तरी या पापडासाठी घेतात. मी मागे याच्या शेवया, कुरड्या लिहिल्या होत्या. नागली भिजवुन वाटुन गाळुन घेतली कि कोरडे पिठ गाळायचा त्रास कमी होतो.
|
Giriraj
| |
| Saturday, May 26, 2007 - 6:36 am: |
| 
|
माझी आई हे पापड अत्युत्कृष्ट करते. ती अगदी बेताबेताने म्हणजे एक ग्लासभर पिठाचेच एका वेळी पिठ घेरते त्यामुळे ती एकटीच दिवसभरात भरपूर पापड लाटते. निगाळ्याचे पापड थोडे जाडसर करावे लागतात आणि ते थोडे काळपट येतात!
|
हे माझ्या अत्यांतिक आवडते पापड!याची गरम खिशी तर खुपच आवडिची...गिरी तु नाशिकचा का रे?माझ माहेर नाशिकच.. दिनेशदा मला आठवतय तुम्ही गव्हाचा चिक आणी नागलिचा चिक आलटुन पालटुन सोर्यात भरुन करायच्या " "पार्सुपाइन नुडलची " रेसिपी हि लिहिली होती.. खिशी घेणे अवघड वाटत नसेल तर पिठ मसाले एकत्र करुन ढोकल्यासारखे वाफ़वुन काढावे..मग मळुन पापड करावे
|
Arunima
| |
| Saturday, May 26, 2007 - 7:19 pm: |
| 
|
अरे वा प्राजक्ता एकदम detail मध्ये लिहिलस. मीहि नासिकचीच. माझी आई हि खुप छान करते हे पापड. काय मस्त लागतात न. मागच्या वर्षी भारतात गेले होते तर घेउन आलेय. इथे बर्याच जणाना माहित नाहित. पण सगळ्याना खुप आवडले.
|
Giriraj
| |
| Sunday, May 27, 2007 - 10:02 am: |
| 
|
मी धुळ्याचा.. पण नाशिकला ही खूप वर्षे (बालपणी) राहिलो आहे..
|
Shyamli
| |
| Tuesday, May 29, 2007 - 2:23 pm: |
| 
|
हे खीशी घेणं प्रकरण थोडक्यात आपल्या उकडीच्या मोदकाच्या उकडीसारखीच आहे, प्राजक्ता छान माहीती दिलीयेस (मी दोन्ही ही केलेलं आहे बर्का )
|
Arunima
| |
| Tuesday, May 29, 2007 - 3:47 pm: |
| 
|
अरे हो गिरी मागे नासिक बीबी वर यायचास तु काहि दिवस.
|
प्राजक्ता मी पण नाशिकचीच आहे. my grandma makes awesome papad. I remember when I was small, we used to go to nashik at my mama's place. आजी तेव्हा हे पापड बनवायची. आणी आम्ही सगळे भावंड मिळुन ते वाळत घालयचो. -भावना
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|