Aandee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 7:45 am: |
| 
|
मला कुणी मुगाच्या शिर्याची रेसिपी द्याल का? मी करते पण माझा खरपुस होत नाही डाळ भिजवुन करावा कि डाळ भाजुन करावा
|
Moodi
| |
| Tuesday, September 19, 2006 - 8:07 am: |
| 
|
Aandee इथे बघ आहे तो, मात्र त्याला हलवा असे नाव मिळालेय. कृती तीच आहे. /hitguj/messages/103383/4923.html?1014699586
|
Manuswini
| |
| Tuesday, September 19, 2006 - 5:28 pm: |
| 
|
सगळ्यात सोपी कृती सांगते जो heavy सुद्धा नाही calories मध्ये. मुगाची डाळ दूधात भिजवून वाळव पंख्याखाली. ती कोरडी झाली की भाज छान मग रवाळ वाट. डाळ भाजायला वेळ लागतो. पण कोरडी भाजावी,तूप न घालता. मग तो जाडा रवा हवा आहे तेवढा घेवुन तूपात भाजावा. आणी उकळीचे दूध घालून शिजवून घ्यावा. त्यात बदाम काप,केसर,काजु,वेलची पूड घालावी. मग साखर घालावी. आणी मंदाग्नी वर झाकून ठेवावा. बाकीचा रवा fridge मध्ये ठेवून नंतर वापरु शकतेस. माझा होतो खुसखुशीत. माझी ही speciality आहे असे friends म्हणतात
|
Aandee
| |
| Wednesday, September 20, 2006 - 2:53 pm: |
| 
|
मूडी,मनस्विनि तुमच्या प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद मला नवरात्रात करायचा आहे आमच्या कडे एक धान्या फ़राळ असतो त्यात मी मूग वापरते.शिरा केला कि लगेच तुम्हाला कळवते कसा झाला ते कि खायलाच येता घरी........
|
Safaai
| |
| Wednesday, September 20, 2006 - 3:57 pm: |
| 
|
ओ मनुस्विनी ताई, तुम्हाला खरंच दिसत नाही का हो? वरती त्या मूडीताईने एवढे कष्ट घेऊन लिंक दिली तर तुमचं आपलं भलतंच... जरा योग्य ठिकाणी लिहीलं तर काय जातं का? आता येऊ नका म्हणत की मलाच का बोलता म्हणून...
|
Manuswini
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:42 pm: |
| 
|
सफ़ाई, तुम्हाला फुकट्या Admin म्हणुन ठेवले आहे का हो? का तुमची तब्येत पण बरी नाही? तसे असेल तर सांगा कारण तब्येत ठिक नसेल तर तुमचे असे बरळणे साहजिकच आहे असे समजेल. कारण मला आपला वेळ नाही घालयचा तुमच्या बरळ्याकडे जरा तुम्हाला मराठी वाचता येत असेल तर माझ्या कृटीतील फरक बघा आणी मूडीने लिहिलेल्या? राहता राहिले योग्य ठिकणी लिहिण्याचा तर तुम्ही कशाला नको ती डोकेफोड करता जर तुम्हाला admin म्हणुन अधीकर नाही. get well soon सफ़ाई
|
Moodi
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:46 pm: |
| 
|
अगं बाळे ती कृती मी लिहीलेली नाहीये, नुसती लिंक दिलीय तिथली. पाऊसने लिहीलीय, मला नको क्रेडीट त्याचे. 
|
Shyamli
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:47 pm: |
| 
|
get well soon सफ़ाई >>> हे हे हे, मनु......... बाकी तूझि ही रेसीपि छान आहे हं करुन बघायला हवी.. आवडली एकदम सुटसुटित वाटते...
|
Manuswini
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:53 pm: |
| 
|
अग मूडी ते link म्हणून राहिले बघ......... श्यामली कशी आहेस? बरेच दिवसांने?
|
Chandrika
| |
| Wednesday, September 20, 2006 - 7:11 pm: |
| 
|
Manuswini, Mug dal kiti vel bhijath thevayacha? Adhi bhajun mag bhijavun/valvun kele tar kase? Chan vatathe recipe.
|
Manuswini
| |
| Wednesday, September 20, 2006 - 7:21 pm: |
| 
|
चन्द्रिका, मूग डाळ आधी भाजली तर भिजली जाणार नाही. तो चुकिचा क्रम ठरेल. भिजवून ठेवायच्या मागे हेतु हाच की डाळ हलकी होते. दुसरे म्हणजे दूधात भिजवल्याने एक वेगळी चव येते. मी try केलेय पाण्यात भिजवून आणी दूधात, दूधात जेमतेम अर्धा ते १ तास भिजव. पुर्ण दाणा भिजला असेल तर काढून नितळत ठेव बाहेर मग पेपरावर पंख्याखाली वाळव. कोरडी वाळली के भाज मंदाग्नीवर आणी, खरपुस भाजल्याचा वास आला की मग त्याचा जाडा रवा काढ. मग तूपात भाज. तूपात साधारण पुर्ण रवा बुडतो. gas एकदम low ठेव. दुसर्या पद्धीतीने केले तर काय्च्या काय तूप लागते आणि वेळ खावु काम. भलत्याच Calories पोटात पण जातात. भंयकर तूप लागते जर ओली डाल वाटून भाजली तर. म्हणुन असे केले तरी चवीत फरक पडत नाही. तूप कमी लागते. दूधात भिजवल्याने चव छान होते.
|
Bee
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:52 am: |
| 
|
ही कृती खूप निराळी आहे. मनु, रवा कसा काढतेस तू ह्या डाळीचा.. मिक्सरवर डाळ टाकली तर होईल का रवा तयार?
|
Prady
| |
| Thursday, September 21, 2006 - 5:12 am: |
| 
|
आमच्या ओळखीत एकांकडे साजूक तुपात मुगाची डाळ भिजवतात रात्रभर असं त्यांनी सांगितलं मला. ते गुजराथी आहेत. खायची अर्थातच माझी हिंमत झाली नाही.
|
Manuswini
| |
| Thursday, September 21, 2006 - 5:15 am: |
| 
|
बी mixie मध्ये डाळ वाट भाजली की जाडसर हवी पण. साजुक तूपात कcछी डाळ भिजवतात?
|
Aandee
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:30 pm: |
| 
|
मनु एकदम मुन्नाभाई स्टाईल GET WELL SOON...आपुन को एकदम आवड्या बोलेतो स्सॉलिड सफ़ाई किया
|
Moodi
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:43 pm: |
| 
|
हं!! काशऽऽऽ हमे भी!! .....
|
Malavika
| |
| Wednesday, December 06, 2006 - 1:02 am: |
| 
|
मनुस्विनी, तू दिलेल्या कृतीप्रमाणे मुगाचा शिरा केला होता. खूपच छान झाला. Thanks for the recipe.
|
Manuswini
| |
| Wednesday, December 06, 2006 - 6:14 pm: |
| 
|
thanks malvika .. ..
|
Sandu
| |
| Thursday, December 07, 2006 - 4:58 pm: |
| 
|
मी माझ्या बायकोला मुगाचा शिरा बनवून सरप्राइज देणार आहे. तेव्हा कृपया काही बेसिक प्रश्न आहेत्: १) मूग हे सबन्द गोल हिरवे मुग का पिवळी मुग डाळ? २) साखर किती आणि केव्हा घालवी?
|
Manuswini
| |
| Friday, December 08, 2006 - 5:29 am: |
| 
|
सांडु, मुगाची पिवळी धम्मक डाळ लागते ह्या शिर्याला. साखर तुझ्या चविप्रमाणे घाल. तुला अतिशय गोड आवडत असेल तर तु ज्यास्त घाल. दोन वाटी मुगाचा रवा तर २ वाटी साखर. बाकी कृती मे वरती लिहिल्याप्रमाणे goodluck
|