Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चिकन शाकुती Xacuti...

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » कोंबडी किंवा चिकन » चिकन शाकुती Xacuti « Previous Next »

Dineshvs
Sunday, May 13, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिकन शाकुती

यासाठी मसाला आधी तयार करुन घ्यावा लागतो. १ किलो चिकनसाठी मसाल्याचे प्रमाण. दोन टेबलस्पुन धणे, एक टिस्पुन जिरे, एक टिस्पुन बडीशेप, पाच सहा मिरीदाणे, दोन वेलच्या, दोन तीन लवंगा, दोन इंच दालचिनी, एखादे चक्रीफ़ुल, अर्धा चमचा जायपत्री, पाव जायफळ, २ टेबलस्पुन खसखस, हे सगळे लोखंडी कढईत शेकुन घ्यावे. कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे, पण करपु द्यायचे नाही.
चार ते पाच लाल मिरच्या उघडुन, बिया काढुन कोमट पाण्यात भिजत ठेवायच्या. ( काहि जण मिरच्याही भाजुन घेतात. ) एक वाटी नारळाचे खोबरे खवुन घ्यावे. दोन मोठे कांदे बारिक चिरुन घ्यावेत. अर्धा इंच आल्याचे तुकडे घ्यावेत आणि पाच सहा लसुन पाकळ्या सोलुन घ्यायच्या.
तेलात आधी ओले खोबरे खमंग भाजुन घ्यावे. ते काढुन घेऊन त्यात कांदा लाल परतुन घ्यावा. कांदा लाल झाला कि त्यातच आले व लसुण घालुन जरा परतावे व सगळे थंड होवु द्यावे.
मग कांदा खोबरे आणि भिजवलेल्या मिरच्या अगदी बारिक वातून घ्याव्यात. लागले तर मिरच्या भिजवलेले पाणी वापरावे.
चिकनच्या तुकड्याना मीठ, हळद आणि एका लिंबाचा रस चोळुन ठेवावा. अर्धा तास ते मुरु द्यावे.
तेल तापवुन त्यात कडीपत्ता व हिंग घालावा. एक लहान कांदा बारिक चिरुन गुलाबी परतुन घ्यावा. त्यावर मसाला पेस्ट घालुन परतावे. मग चिकनचे तुकडे घालुन मंद आचेवर २० ते २५ मिनिटे शिजवावे. लागलेच तर गरम पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. या मसाल्यामुळे झणझणीतपणा येतो, पण हवे असेल तर अजुन लाल तिखट घालावे.



Ajjuka
Sunday, May 13, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शाकाहारी असल्याने अशी वेज शाकोतीसागुती मी गोव्यात खाल्ली होती. लाल तिखटाने तिखटजाळ न करताही मस्त झणझणीत होती. ती पण अशीच करतात का? पण marinate काय करतात जसं इथे चिकनचे तुकडे..?

Dineshvs
Sunday, May 13, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, भेंडी, फ़्लॉवर, वांगी अश्या भाज्या वापरता येतील. नाहीतर बटाटा आहेच.
या भाज्या फारश्या मॅरिनेट करायची गरज नाही. भेंडी वापरली तर चिंच घालावी लागेल.


Ajjuka
Sunday, May 13, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोव्यात अजून एक मस्त शाकाहारी पदार्थ खाल्ला एका हाटीलातच. पणजीला त्या बोटी संपतात तिथे आहे ना किनार्‍यावर हॉटेल तिथे. नावच आठवत नाहीये पण त्यात तिखट अजिबात नसतं खूप हळद असते आणि थोडा मसाल्याचा झणका असतो.
दिनेशदा तुम्ही बहुतेक ठरवून शाकाहारी ना... निदान मूळ माहिती तरी आहे आयाबायांकडून मिळालेली. आम्हाला ते कुठून मिळणार.. हा सासू सांगू शकते पण तेवढा वेळ घरात टिकायला हवं ना मी.. ही ही


Dineshvs
Monday, May 14, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, बटाट्याची भाजी होती का ती ? माझे हॉटेलात जाणे तसे कमीच आहे.
मी अपघाताने शाकाहारी झालोय. आणि जनरल आवड म्हणुन माहिती गोळा केली. शिजवतो पण चवही बघत नाही, अशी तर्‍हा माझी.


Shyamli
Saturday, May 19, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा काल केली होती चिकन शाकुती.
छान झाली. मी आणलेला तयार मसाला होता तोच वापरला बाकी तुम्ही सांगितलत त्या प्रमाणेच केली
लगेच रेसीपी दिल्याबद्दल धन्यवाद :-)


Lalitas
Tuesday, May 22, 2007 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रविवारी शाकुती केली होती पाहुण्यांसाठी.... मी चिकन खातच नाही तेव्हां कशी झाली हे बघण्याचा प्रश्नच नव्हता, पाहुणे खुष झाले

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators