|
Dineshvs
| |
| Thursday, May 03, 2007 - 6:14 am: |
| 
|
पनीर पकोडे पाव किलो पनीरचे आपल्याला हवे त्या आकारात तुकडे करुन घ्यायचे. एवढ्या पनीरसाठी दोन हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, अर्धा इंच आले, आणि आवडत असेल तर दोन तीन पाकळ्या लसुण हे वाटुन, अर्धी वाटी दह्यात मिसळावे. त्यातच मीट, जिरेपुड व थोडा ओवा घालावा. पनीरचे तुकडे त्यात अर्धा तास तरी मुरु द्यावेत. नेहमीप्रमाणे भजीसाठी भिजावो तसे बेसन भिजवुन घ्यावे. बेसनाच्या जागी मैदा व अंडेहि वापरता येईल. त्यात पनीरचे तुकडे बुडवुन तळायचे. कधी कधी पनीर कमी असते किंवा त्याचे तुकडे न पडता भुगा होतो. अश्यावेळी ते कुस्करुन वरील मिश्रणात मुरवावे. दोन मोठ्या बटाट्याचे पातळ काप करावेत. त्यातल्या दोन कापात पनीरचे मिश्रण दाबुन बसवावे आणि मग ते बेसनाच्या घोळात बुडवुन तळावे.
|
Cutepraj
| |
| Thursday, May 03, 2007 - 6:20 am: |
| 
|
धन्यवाद आजच घरी करुन बघेन.
|
Bee
| |
| Thursday, May 03, 2007 - 7:37 am: |
| 
|
दिनेशची कृती वाचण्या पुर्वी मला वाटल होत धरले पनीर की टाकले बेसनात नि मग तळून काधले की झाले पकोडे तयार.. पण त्यांची कृती वेगळी आहे.
|
पण restaurant मधे ते चटणी पनीर ला मधे चिरून त्यात भरतात ती तळताना बाहेर नाही का येत?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|