|
Bee
| |
| Monday, April 09, 2007 - 7:49 am: |
| 
|
मला सर्दीवर उपाय होईल अशा काढ्याची कृती मिळेल का? धन्यवाद..
|
Shonoo
| |
| Monday, April 09, 2007 - 1:13 pm: |
| 
|
गवती चहा, आले, बडी शेप, थोडा कांदा असं उकळावे. एका लोखंडी पळी मधे मूठभर पोहे कोरडे भाजून ते ही काढ्यात घालावे. पाहिजे तर एखादी लवंग, एक दोन मिरी दाणे थोडे ठेचून घालावेत. चांगले उकळून ( पाणी निम्मे होईल) गाळून ठेवावे. पाहिजे तेंव्हा थोडे थोडे गरम करून त्यात चमचाभर मध घालून प्यावे. अगदी गार करून पिऊ नये, सोसेल तितके गरम गरमच प्यावे. चिनी लोकांचे कांजी सूप पण छन लागते, पण ते शु शा मिळते की नाही ते मला नाही माहीत
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 3:20 am: |
| 
|
शोनू, पोहे पण घालतात काढ्यात.. नवल हो मजसाठी अजून लिना ना इथे कुणी.. शोनू धन्यवाद.
|
बी... मी जो काढा घेते तो एकदम लागू पडतो.. पण तुला पटतो का बघ.,, डॉक्टर्स ब्रेंडी..
|
Sakhi_d
| |
| Tuesday, April 10, 2007 - 7:40 am: |
| 
|
बी सर्दीसाठी अडुळसाच्या पानांचा काढा सगळ्यात छान.... ३ - ४ अडुअळ्साची पाने चिरुन घ्यायची, थोडी मिरी, दालचीनी, जेष्टमधाचे तुकडे किंवा पावडर, आल हे सगळे एकत्र पाण्यात उकळवायचे आणी त्यात खडीसाखर किंवा गुळ टाकायचा थोडा कडु लागतो पण ३ - ४ वेळा घेतल्या वर सर्दी लगेच जाते आणी कफ़ खोकल्यासाठी सुधा चांगला असतो
|
Shonoo
| |
| Tuesday, April 10, 2007 - 12:27 pm: |
| 
|
घरात असतील तर मूठभर तुळशीची पाने सुद्धा घालता येतात या काढ्या मध्ये.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:20 am: |
| 
|
बरोबर आहे शोनू, मी विसरले होते...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|