|
पाटील, राव गुळाच काम लई चिक्कट असत बघा! आधी एक गुळव्या धरुन आणायचा, नसल तर आपणच कम्बर कसुन कुणा गुळव्याच्या हाताखाली काम करुन गुळव्या बनायच! मग क्रशरची (उसाचा रस काढण्यासाठी) जुळवणुक करायची, त्यासाठीच्या डिझेल इन्जिनाला लागणार्या डिझेलची बॅरल्स जमा करुन ठीवायची... त्यान्च्या साठी आगीपासुन लाम्बवर शेड टाकायची! जर्राबी डिझलचा वास हिकड लागायला नाय पायजेल....! ह्ये जमवेस्तोवर भली थोरली काहील, लाब उलथनी, काहील उधलायला वासे, गुळाच्या खड्यासाठी वेगवेगळ्या मापाचे लाकडी साचे, कॉटनची धोतरे चिरगुटे, रस्सी वगैरे बाबी जमवायच्या! काहील आलीरे आली की तिच्या बुडाच माप घेवुन खड्डा खन्दायला सुरुवात करायची, तिच बूड पक्क अधान्तरी कडेपर्यन्त बसेल असा खोल खड्डा खणुन येकी कडुन एक बोल पाडायच इन्धन टाकायला, तर दुसरी कडच्या बोळाला चिमणी बान्धुन त्यात डॅम्पर फिट करायचा म्हन्जी बाहेर पडणारा धुर, वायु यावर कन्ट्रोल केला की आच कमी जास्त होती! ह्ये झाल का? की क्रशरची जागा फिक्स करायची की जिथुन निघालेला रस येकत्र जमा होवुन नुस्ता अडसर काधुन तकाटण काहिलीत सोडल की रस काहीलीत पोचायला हवा! अन तस नसल तर जुन्या पाण्याच्या टॅन्करच्या टाकीच जमवायच... ती जमिनीत पुरुन त्यात रस गोळा करायचा! अन वीज असल तर वीजेच्या पम्पान खेचुन किन्वा हातपम्पान खेचुन किन्वा बकेटिन्नी वोरपुन काहिलित रस घ्यायचा! आता लक्षात येतय नव्ह? तर पह्यले झूट रस काढायला सुरुवात करायचि.... रस काढताना मधि मधि पेरुचा पाला पण सारायचा, झालच तर आल्याच तुकड, थोड खडे मीठ अस बी सारुन द्याच..... शिल्लक उसाची चिपाड पसरवुन वाळवत ठेवायची...... रस काढीतच र्हायच.... गिर्हाइकाला, म्हन्जी शेतकर्याला भोवानीच कारण सान्गुन काहीलिची अन चुलीची पुजा करुन जेवण घालायच अन उद्याच्याला बोलवायच! तोवर दिस भरात आख्खा टॅनक्र भरतो हे रसान! आपली चिल्लीपिल्ली, आजुबाजुची लोक कामकरी, समद्याना घागरी घागरी रस पाजायचा! रातच्याला राखणिला थाम्बायच! भल्या पहाट उठुन सोताच आवरुन चुलाणाला जाळ घालायचा.....! जाळ अन निखारे रसरसेस्तोवर काहील वर ठेवायची नाही, मग जाळ भणाणला, की काहील वर ठेवुन त्यात रस वोतायचा! अन मग काय? येकाला भट्टीत चिपाड घालायला लावायच येकाला उलथन्यान रस मधी मधी बुडापासुन ढवळायला उभा करायचा बाकिच्याना उरल्या उसाचा रस काढायला पिटाळायच..... अन मन्ग रसाला आधण येइस्तोवर आपण तमाकुची चिमुट तोन्डात कोम्बून मस्त पैकी ह्याच्यावर वरीड त्याच्यावर वरीद अस करत र्हायच!.....! तासाभरात उकळि फुटु लागती....! अन मग मगाच्या उलथन वाल्याला दोन कच्च्कन शिव्या घालत बाजुला करायचा अन चिपाडवाल्याला बोम्बलुन सान्गायच की जाळ जरा धीमा घ्ये रे भो XXX ! करपवशील की रऽऽऽ! अन आपण उलथन्यानी काहीलीतला रस बुडापासुन इकडुन तिकडे सरकवित र्हायच! काय असत ना की चिपाडाचा जाळ सगळ्या बुडाखाली सारखाच नसतो... तवा आपणच रस फिरवायचा! अन मन्ग येक वेळ येती..र्अस घट्ट घट्ट व्यायला लागतो, अन तवा जोमान येल्गार करायचा! आक्षी काहीली भोवती घिरट्या घालीत घट्ट बनत चाललेला रस हिकडुन तिकड अन तिकडुन हिकड वोढीत रहायच! आता आपल्याला कळु लागलेल अस्त की काहीलीचा बूड कुठ जास्त तापतो हे अन कुठ थण्ड हे! ह्ये घमासान उडवुन द्यायची, पर कित्तीबी हलीवल तर वर साय जमायची ती जमतेच.... तर थोडी साय बाहेर काढुन घ्यावी, चव बघावि....! येका वर बोम्बलुन वोल्ली धोतर पिळुन घेवुन किलो, पाच किलो धा किलो ऐवजाच्या लाकडी साच्यात घालावी, काकवी काधुन घ्यावी... शेवटा शेवटाला लईच बैदा होतो.... बावखड घट्ट रस रेटुन रेटुन अगदी जाम होतात, पर आता माग हटायच न्हाई.....! रस अस्सा घट्ट होवु लागतो, तर थोडा ठिपका बाहेर जमिनीवर काढुन टाकावा, ठोडा ठिपका वोल्या येक किलोच्या धोतरात टाकावा, येकाला लग्गी बघुन घ्यायला उभा करावा की किती येळात त्ये दगुड बनतय.... तर या अन्दाजाला म्हणतात गुळव्याचा अन्दाज, अन मन्ग येक वेळ अशी येती की हाराकीरी केल्याप्रमाण रसावर तुटुन पडायच अन असतील नस्तील तेवढे समदे साचे त्या घट्ट रसान भरुन टाकायचे.......! भरताना कुणाच्या अन्गावर रसाचा गरम गोळा उलथन्यावरुन निसटुन उडत नाही याची काळजी घ्यायची.....! अन येकदा का पहिला घाणा भरुन झाला, की वोतायचा काहिलित पुन्ह्यान्दा रस, जाळ मोठ्ठा करायचला सान्गायच... अन पुन्हा पहिल्या सारख समद.....! पुढला घाणा निघेस्तोवर धोतरासही गुळाचे खडे बाहेर काढुन बारदान्यावर रचायचे, धोतर मोकळि करुन पुन्हा भिजवुन घेवुन साचे तयार ठेवायचे......! अन चालुच ना गुर्हाळ, पुन्हा पुन्हा तेच ते तेच ते! आत्ता काय काय चाबरट गुळवे रसात त्ये काय अस्त ना... नवसागर की काय त्ये, अन कॉस्टिक सोडा अन काय अन काय काय पिवळ्या रन्गासाठी मिसळतात......! आपुन त्यो घोळ करायचा नाही.....! हुश्श्यऽऽऽऽ! दमलो बोवा! आता कारभारणीला सान्गतो, जरा चार भाकर्या जास्त बडीऽव, अन कालवणाला भरल वान्गच कर! आज मस्त चेपुन हादडणार बगा!
|
Chinnu
| |
| Friday, February 02, 2007 - 7:40 pm: |
|
|
LT एकदम मस्त बगा. लहानपणी आग्रहाचे आमंत्रण असायचे रस प्यायला त्याची आठवण झालिया!
|
LT शाबास! एकदम झकास. आणि तू कंच्या गुर्हाळावर आडंजुड्या हुतास म्हणं? (गम्मत हा!) रसातला कचरा वगैरे (मळी) निघावा म्हणून भेंडीची खोडं चेचून घालतात रस उकळताना. शिवाय गूळ रवाळ होण्यासाठी (एकदम चिकट होऊ नये म्हणून) थोडा चुना मिसळतात. आणि LT खवचटपणे 'गुर्हाळ लावलंय' असं म्हणतात ते या गुर्हाळाला नाही बरे का! एरंडाच्या गुर्हाळाला. त्यातून काही रस निघत नाही. नुसतेच आपले एरंडच्या एरंड घालत बसायचे चरख्यात. अर्थात निरर्थक मेहनत / बडबड!
|
Lalu
| |
| Friday, February 02, 2007 - 8:27 pm: |
|
|
लिम्बू, छान लिहिलंय. प्रत्यक्ष बरेचदा पाहिलीत. रात्री असायची. आणि तू ते साच्याच म्हणतोयस ते नाही पाहिलं मी कधी. मोठी काहीलीच तिरपी करुन तो रस जमिनीत असलेल्या मोट्ठ्या चौकोनी दगडी खड्ड्यात(तोच साचा) ओतायचे शेवटी, ते पाहिले आहे. hmm.. काकवी
|
Manuswini
| |
| Friday, February 02, 2007 - 8:48 pm: |
|
|
लिंबु, लिहिलय चांगले पण ते गावठी अस्सल भाषा वाचायला नी समजायला वेळ लागतो की हो... मग आता हे सांगा चिक्कीचा गुळ कसा बनवतात ते? ज्यास्त चिकट पणा त्याला कसा येतो?
|
लिंबु भो, व्हि अंन्ड सी सोडुन असे गुळाचे कन्स्ट्रक्टीव्ह काम काहुन करायले वो. आमच्या शेतावर पाहीले होते मी गुळ काढताना. फार वास येतो पण. बर ते जाउ दे. मग मळीच काय केलस.
|
केदारजी, मळीपासून पह्यल्या धारेची पाडायची. गिर्हायकांची कमी नाही. पण काही असो. गुर्हाळाची माहीती LT नी छानच दिली. आता गुर्हाळ उद्योग टाकायला त्याची छान मदत होणार. LT पुन्यांदा धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Saturday, February 03, 2007 - 8:03 am: |
|
|
छान लिहिलय. उसाचा रस काढताना धुवुन घेतला जात नाही, त्यामुळे रसात बरिच माती राहते. ती मळीच्या रुपात वर येते. ती मळी लवकर आणि पुर्ण निघावी म्हणुन भेंडीची रोपे ठेचुन घालतात. आणखीहि काहि रसायने घालावी लागतात. रस पुर्ण घट्ट होईस्तो उकळत नाहीत. कारण थंड होताना तो जरा घट्ट होत जातो. अलिकडे गुळाची पावडर पण मिळते. ती चमच्याने मोजुन घालता येते. भारतात किती उतारा पडतो ते माहित नाही, पण केनयामधे तो १० % पडायचा, म्हणजे १०० किलो उसाचा, १० किलो गुळ मिळायचा. तिथेहि साधारण हिच पद्धत वापरतात. पण गुळाचा बहुतेक उपयोग बियरसाठी होतो. अमिताभ बच्चन, नुतन आणि पद्मा खन्ना अभिनीत, सौदागर सिनेमात ताडाचा गुळ करायची पुर्ण प्रक्रिया दाखवलीय. तो गुळ जरी काळपट दिसला, तरी जास्त चवदार असतो.
|
दिनेशभाऊ सौदागर खरच चांगला चित्रपट. त्यात नुतन जो गूळ बनवते त्याचं कौतिक बाजारातला प्रत्येक ग्राहक करतो. तुम्ही चांगल्या चित्रपटाचीही आठवण चाळवली.
|
चिन्नु, गजाभाउ, लालु, मनुस्विनि, केदार, पाटील, दिनेश.... सर्वान्ना धन्यवाद! सहज गम्मत म्हणुन तीसेक वर्षान्पुर्वी पाहिलेल गुर्हाळ आठवुन एकहाती लिहुन काढल, त्यात तपशीलात तृटी आहेतच... दिनेश भाऊ सान्गतातचेत! लालु, लाकडी उभी फळकुटे शेजारी शेजारी बसवुन असे साचे करतात. ते पाहिलेत. दगडि साचे पहिल्यान्दाच ऐकतो हे! मनुस्विनि, खर तर मला माहित नाही की चिक्कीचा गुळ कसा करतात, पण घट्ट होण्यची वेळ तसेच आच देण्याची पद्धत व दिनेश म्हणतात तस आत मिक्स करत असलेल्या पदार्थान्च्या प्रमाणावर चिक्कीचा गुळ करणे न करणे अवलम्बुन असावे! सर्वान्ना धन्यवाद, कधी जमल तर गुर्हाळाच चित्र काढीन!
|
Lajo
| |
| Monday, February 05, 2007 - 6:01 am: |
|
|
LT मस्तच वर्णन केलंय.. अगदी डोळ्यासमोर ऊभ राहिल लहानपणी पाहिलेल पन्हाळ्याजवळच गुर्हाळ. तो गोड ताजा ताजा रस, आणि ती बशीत काढुन दिलेली गरमा गरम गुळावरची साय... अहाहा आणि नंतर ताजा गुळ आणि हुरडा, सोबत भाकरी, लसणीची चटणी आणि झुणका आणि गडव्यातलं घट्ट दही... तोंडाला पाणी सुटलं... अफ़सोस.. आता फ़क्त आठवणी... पुन्हा पन्हाळा ट्रिप करायला पाहिजे पुढच्या भारत भेटीला...
|
Dineshvs
| |
| Monday, February 05, 2007 - 7:03 am: |
|
|
काहिलीली दोन कड्या असतात, त्यात आडवी काठी रोवुन काहिल उभी करतात आणि शेजारच्या दगडी वा लाकडी हौद्यात ओततात. तेव्हा रस पाकाप्रमाणे असतो. मग तो वार्याने जरा घट्ट होत जातो. अश्यावेळी मोठ्या उलाथन्याच्या सहाय्याने तो साच्यात वैगरे भरतात आणि तो निवला कि त्याचा गुळ होतो. हल्ली मोदक, क्युब्ज वैगरे आकारात पण ते साचे असतात. गुळाची ढेप फोडण्यापेक्षा, असे छोटे आकार ग्राहकांच्या दृष्टीने सोयीचे ठरतात. गरमागरम गुळ आणि कच्चे शेंगदाणे खायला छान लागतात. पाक ओतायच्या आधी काढुन जर भांड्यात ओतला तर त्याला म्हैसुरपाकासारखी जाळी पडते. तोहि प्रकार खायला छान लागतो. नेमके किती आटवायचे ते गुळव्या ठरवतो. खरे तर यात आता निश्चित तपमान वैगरे ठरवता यायला पाहिजे. सध्या तरी हि प्रोसेस व्यकिसापेक्षच आहे.
|
अमिताभ बच्चन, नुतन आणि पद्मा खन्ना अभिनीत, सौदागर सिनेमात...>>>पद्मा खन्ना ६७ वर्षांची झाली हे वाचून बसलेल्या धक्क्यातून मी अजून सावरतोय.... (एक डिलेटेबल विषयान्तर)
|
लिंबु भो, व्हि अंन्ड सी सोडुन असे गुळाचे कन्स्ट्रक्टीव्ह काम काहुन करायले वो. >>>>केदार भु तुमीबी न्हाईका V&C सोडून भक्तीमार्गाला लागलेत बर्याच पूर्वी..
|
Seema_
| |
| Monday, February 05, 2007 - 5:41 pm: |
|
|
LT मस्त लिहिलयस . गुळ पातळ असताना शेजारीच चिरमुर्याच पोत ठेवतात . आणि जस लागेल तसे त्याचे भराभर लाडु बांधतात . मस्त लागतात ते लाडु . आणि बरोबर सुकी भेळ असा पण बेत असायचा . ( जेवण नसेल तर. नाहीतर वांग्याची भाजी , भाकरी असा बेत असायचा . )
|
सगळ्यान्च्याच प्रतिक्रियान्बद्दल धन्यवाद! खर तर मी खरच पाटील रावान्ची अशीच खेचण्याकरता, आणि गम्मत म्हणुन ते वर्णन लिहिल, लिहिताना "आठवणीतल्या सत्याशी" प्रामाणिक राहुन लिहिल...! त्यात सुधारणान्ना भरगोस वाव हे! हे लिहिताना आणि तुम्हा सगळ्यान्च्या प्रतिक्रिया वाचताना एक गोष्ट राहुन राहुन जाणवत राहिली, की, शहरी करणाच्या, मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीच्या, जागतिकी करणाच्या व अशा असन्ख्य गोष्टीन्च्या परिणामान्मुळे आम्ही आमची सम्रुद्ध ग्रामिण परम्परा पुर्णतः हरवत चाललो नाही ना?????? हा V&C चा स्वतन्त्र विषय होईल....! आता इथुन पुढच्या थोड्याफार शिल्लक तकलादू आयुष्यात काही भरीव, भव्य दिव्य अस करता येइल की नाही याची शन्काच हे पण जे काही आम्ही आमच्या लहानपणि उदात्त बघितल, जो जातीपाती साम्भाळीतच, जिव्हाळा आणि प्रेमाचा व्यवहार गावागावातुन अनुभवला, माझ्या पुढच्या "व्यावहारीक" "प्रोफेशनल" पिढ्यान्ना त्यातला कण तरी अनुभवता येणार हे का? तरी माझी इच्छा हे! माझ्या पुरत तरी मला पुन्हा ती पुर्वीची समृद्धी उभी करायची हे जी गावागावातून हरवत चालली हे! (मनसे जॉईन करावी का???? ) पाहू पुढ काय होत ते.....! दिनेशभाऊ, डायरेक्ट काहिलीतून साच्यात किन्वा बाजुला काढुन घेवुन मग थोड्या वेळाने साच्यात टाकणे असे दोन्ही प्रकार मी बघितलेत, त्यान्चे कारण बहुतेक चिक्कीचा किन्वा कडक गुळ करण्या साठी असावे, त्यावेळेस वय लहान असल्याने उद्देश फारसे कळत नव्हते पण निरीक्षण बर्यापैकी असावे!
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 06, 2007 - 6:26 am: |
|
|
लिंबु, माझेहि बहुतेक लिखाण असेच आठवणीतुन आलेय. पण तुझ्यावेळेत आणि माझ्यावेळेत काहि दशकांचे अंतर असणार बहुदा. लिहित रहा.
|
लिम्बुभाऊ बरोबर आहे तुमच. मी जळगावला नोकरी करतो, पण राहतो गावात. गावात शेतकरी कोणतही पिक असो मोठ्या मेहनतीनं पिकवतो. पण विकताना त्याला एकच घाई झालेली असते. कपाशीचा व्यापारी गावात आला तर त्याने शेतकर्यांच्यामागे फिरावे, तर उलटच होतं. शेतकरी त्याला आपला माल घेण्यासाठी मिनतवार्या करत त्याच्या मागे हिंडतो. आता ऊस लावतात, त्याला वाढवतात. तोडणीवर आला की पुन्हा कारखान्याकडे तोडण्यासाठी विनन्ती आलीच. पण आपला माल कोणी घेणार नसेल तर त्याला पर्याय आहे. स्वताच गुर्हाळ सुरु करावा. आणि गुर्हाळ काढायला परवान्गी कशाला पाह्यजे म्हणतो मी. शेतकरीच आसतो मालक. लिम्बुभाऊ त्यासाठीच गावात थांबलोय. गुर्हाळ उद्योग त्यासाठीच.
|
अरेवा.. लिंबुचे गुर्हाळ का छान... चिंतामण पाटिल गुळ खायला येणार बर का !!! कधी बोलवताय...
|
बस्स! पुढल्यावर्षी याच मोसमात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|