Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सारु

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » सारु « Previous Next »

Manuswini
Wednesday, March 28, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

actually मी काही वेगळे करायचा प्रयत्न करत होते...
खरे तर सांबार मसाला करत होते. पण भरपुर घरात डाळी बघुन शेवटी plan change केला. मग discover झाले की हा high protein nutritious डाळीचा प्रकार होवु शकतो.


२ वाट्या तांदूळ,
१ वाटी मुग डाळ,
खालील डाळी प्रत्येकी मुठी मुठी घ्यायच्या,
मसुर डाळ,
चणा डाळ,
उडीद डाळ,
३ मोठे चमचे अक्खे धणे,
३ मोठो चमचे जिरे,
तिखट लाल मिरच्या(चविप्रमाणे),
हिंग शेवटी टाका न भाजता,
७ ते ८ काळी मीरी दाणे,
२ चमचे मेथी,
दोन लहान चमचे सुखे खोबरे( हो लहानच चमचे घ्या नाहीतर ते सांबार होईल).
सुकलेला कढीपत्ता,

वरील सर्व वेगळे वेगळे भाजुन काढायचे नी छान बारीक वाटायचे (कोरडेच).
दBआबंद भरुन ठेवायचे.

काल मी कंटाळले होते, तेव्हा जराशी ही पुड घ्यायची, tomato बारीक वाटुन घ्यायचे,
छान फोडणी द्यायची मोहरी,ताजा कढीपत्ता,चिंच, कोथींबीर, मग एक वाटी चांगलेच पाणी टाकुन त्यात tomato juice टाकायचा, उकळी आली की ही पॉवडर टाका. मोजुन दहा मिनीटात मस्त protein युक्त डाळ तयार, पाहीजे तर सांबार म्हणुन वापरा भाज्या टाकुन,
पाहीजे तर भरपुर चिंचेचा जुइcए टाकुन चिंच रसम, नाहीतर tomato सारु म्हणुन.
नाहीतर नुसते गरम भातावर पण छान लागते.
कंटाळा आला असेल तर कोण ऑफ़ीस वरुन येवुन डाळ उकडा,शिजवा, फोडणी द्या करतय.

करुन पहा, खुप चविष्ट लागतो हा प्रकार, tomato नाही टाकला तरी चालते. पाहीजे तर गुळ टाका.

हे खुप आळते नंतर, शुद्ध तूपाची फोडणी छान लागते.

पुड थोडीच घेतली नी दोन वाट्या पाणी टाकले तरी छान होते.



Sharmila_72
Tuesday, April 24, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, मला किती आनंद झालाय माहीताय ही सारु ची कृती पाहुन. आत्ता बीसाठी टोमॅटोच्या साराची रेसिपी टाकताना पाहीली ही कृती मी. एकदा एका साउथ इंडीअन लग्नात होत हे सारु. not exactly south indian पण त्यांच आडनाव राव होत. आम्हाला इतक आवडल होत ना की त्यानंतर ओळखीतल्या बर्‍याच साउथ कडच्या लोकांना विचारल होत कस करायच ते. पण व्यवस्थित कृती मिळालीच नव्हती. तुला मनापासुन थॅंक्स!

Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आयडीया आहे आमच्यासारख्या कामचुकारासाठी... आजच आईला फ़ोन करून ते डाळीचे मिक्स बनवून पाठवायला सांगते.

Dineshvs
Tuesday, April 24, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी मी घरी करुन ठेवला हा मसाला. काहिकाहि उडुपी हॉटेलमधे हा प्रकार मिळतो.

Sharmila_72
Tuesday, April 24, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, माझ्या वरच्या पोस्ट वरुन तुला समजलच असेल की how desperate I was for saaru . आज लगेच मिश्रण करुन बाटलीत भरून ठेवल. आणि रात्रीच्या जेवणात केल सारु. अप्रतिम! अगदी तस्सच झालेल लग्नातल्यासारख! परत एकदा धन्यवाद.

Bee
Wednesday, April 25, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या विदर्भात अस्साच एक प्रकार केला जातो आणि तोही लग्नातच केला जातो ज्याला आम्ही एसोर म्हणतो. मी घरून आणला येतेवेळी.

मनुस्विनी, कुठे शिकलीस तू हा प्र्कार.. खरच झक्कास आहे..


Vrushs
Wednesday, April 25, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, तुम्ही सांगितलेल सारु हे तुरीच्या डाळीचे करतात का?

Prarthana
Friday, May 04, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एसोरची आमटी कशी करतात

Manuswini
Sunday, June 03, 2007 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आज मी इथे येवुन पाहीले बर्‍याच दिवसाने actually accident नंतर वेळच नाहे मिळाला इथे यायला.

anyways, back to normal खरे सांगु जसे मी वरती लिहिले आहे मी कोणाकडुन हे शिकले नाही ना मला कोणी ही recipi दीली, अगदी आई शप्पथ :-)

एकदा मी एका कन्नड मैत्रिणीकडे खाल्ले होते. पण ते जरा पांचट होते.
आणि खाताना मि नेहमीच अंदाज लावते काय बरे असेल ह्यात खायची आवड असली ना की नेहमी मनुष्य असे trial n error करतो.
मी सांबार मसाला बनवायच्या खटपटीत होते तर आठवले की ती सारुची चव म्हटले असेच काही जीन्नस असतील नी टाकले अंदाजाने हाताला जे लागेल ते.

छान वाटले तुम्हाला आवडले पाहुन.


Manuswini
Sunday, June 03, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vrushs
तुझ्या प्रश्नाचे उत्तर,
मी खरे तर तूरडाळ avoid करते Acidity होते म्हणुन आणी हा प्रकार एक trial होता तेव्हा आपोआपच माझी fav मूग डाळ घेतली.
मूग डाळ कमी Calories , पचायला हलकी, आणि मला acidity होत नाही. तेव्हा तु please try करुन पहा नी सांग मला कसा लागतो ते तूरडाळ वापरुन.
इथे काही hard n fast rule नाही गं. kitchen आपले असते घुसा नी करा काय ते, शेवटी आपणच खाणार ना पहिल्यांदा ही माझी strategy . :-)
मला अहो जाहो नको गं म्हणु


Manuswini
Sunday, June 03, 2007 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला तु कुठे असतेस गं?

जेवणाची तुलाही आवड दिसते?


Supermom
Sunday, June 03, 2007 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु,
खूपच मस्त कृती आहे ग.
एक प्रश्न- हे सगळे जिन्नस तेलावर भाजायचे की तसेच कढईत म्हणजे तेलाशिवाय भाजायचे?


Manuswini
Sunday, June 03, 2007 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ,
तसेच कोरडे भाज, तांदूळ,डाळी निवडुन घे फक्त.

खरे तर वरील प्रमाण मी अंदाजे टाकलय हाताला जी वाटी लागली तेव्हा, तुला जी काय डाळ हवे असेल तर टाक. पण खरे सांगु जवळपास तसेच वरील प्रमाणे टाकलेस तर डाळी तांदूळ मिळुन येते.
एक म्हणजे सुखा कढीपता जेवणात खाल्याने केस छान होतात(स्वःनुभव)


Upas
Sunday, June 03, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम सारु छे.. bachelors ना पसंद.. कुठे मिळेल हे बाहेर? चांगला ब्रांड कोणता?
मनु, कशी आहेस आता? रत्नांगिरीत खूप आंबे हाणतेयस असं ऐकलं.. आराम कर! :-)


Manuswini
Sunday, June 03, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, thanks for asking, ठिक आहे आता. परत आले कर्म भूमीत.
रत्नांगीरीला नाही चिपळुणला होते. आंबे खुप खाल्ले.
अरे घरी करना, नुसते भाजायचे नी वाटायचे. पाहीजे तेव्हा पाणी टाकुन उकळ, भात घाल नी खा.(फुकट सल्ला). :-)

पण अजुन bachelors का ते? एक. भा. प्र.


Sharmila_72
Tuesday, June 05, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, मी मुंबईत असते. हो मला वेगवेगळे छान चमचमीत पदार्थ खायला आवडतात पण कोणी आयत करून क्वचितच देत गं आपल्याला unless you go to someone's place . म्हणून मग असे पदार्थ करायची आवड आपोआप develop झाली. तू भारतात आली होतीस अस समजल तुझ्या पोस्ट्स वरून. किती दिवस होतीस? खूप बर वाटत असेल ना इथे येऊन गेल्यावर?

Disha013
Tuesday, June 05, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मनु,कशी आहेस?तब्येत कशी आहे आता?


Upas
Tuesday, June 05, 2007 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, घरी करायला हरकत नाही पण outsourcing ने किफायातशीरपणे काम होतात आणि शिवाय उत्तम quality :-)
आणि हो अजून bachelors.. म्हणजे सध्या काठावर आहे.. Nov मधे डुबकी मारेन संसार सागरात.. :-p

Bee
Wednesday, June 06, 2007 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुची इतकी काळजी का करत आहेत सगळे जण :-) काय झाले तिला नक्की.. चांगली खातीपिती तर होती.. :-)

Manuswini
Monday, June 18, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला,

हो भारतात होते,मस्त वाटले, खावुन पिवुन चरुन आले.:-)

उपास,
ते outsourcing ना, cheap labor . खुप फायद्याचे आहे. स्वस्त नी मस्त ना... मग तु सगळ्या पदार्थांची यादी करुन Nov deadline करुन घे नी येताना सांग त्या NOV resource ला घेवुन यायला(आणखी एक फुकट सल्ला, राग नसावा).


दिशा,
आता ठिक आहे, thanks for asking .

बी,
अरे Accident झाला होता, पण ठिक आहे आता.

mods,sorry नको ते विषय लिहिते आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators