Bee
| |
| Tuesday, February 27, 2007 - 6:28 am: |
| 
|
मी इथे एका भाजीचे छायाचित्र टाकतो आहे. ओळखा पाहू तिचे नाव काय आहे. ज्यांना शेपू सारख्या अंगभूत गंध असणार्या भाज्या प्रिय आहेत त्यांनी ही भाजी अवश्या चाखायला आवडेल. ही भाजी पिठ पेरून करतात आणि एकदा केली की छान आठ दिवस ही भाजी टिकते. विशेष म्हणजे ह्या भाजीच्या फ़ार चविष्ट तिखट वड्या करता येतात. ही भाजी फ़क्त उन्हाळ्यात येते. चला आता वळखा पाहू 
|
अर्रे हा तर चन्दन बटवा! की सरसूची हे????? काय बी?? बरोबर वळिखल ना????
|
Bee
| |
| Tuesday, February 27, 2007 - 8:31 am: |
| 
|
निरिक्षणात चुकताय तुम्ही. हे लाल तंतू कधी घोळीच्या भाजीला असतात का? घोळीला छान हिरवट दांड्या असतात. त्या जाड असतात. शिवाय पानेही मोठी असतात. ही पाने अगदी जवसाच्या दाण्याइतपत मोठी असतात. ही भाजी जमिनीवर परसत वाढते. तिला उंची अजिबात नसते. चंदन बटव्याची पाने किती छान आकाराची असतात. वेगळाच आकार असतो चंदन बटव्याच्या पानांन्चा. अगदी चित्रकलेच्या वहीत काढून बघावा असा..
|
Surabhi
| |
| Tuesday, February 27, 2007 - 8:48 am: |
| 
|
ही चिवळीची भाजी आहे का? ही भाजी, हाद्ग्याची फुले अशा गावा कडच्या भाज्या कधी कधी दिसतात. पण कधी खाल्ली नाही. कशी करायची पण माहीत नाही......
|
चिवाची भाजी अस मी म्हणाले होते. (चला नवर्यला हरवल्याच समाधान मिळेल. ..) मी खाल्लिये याची भाजी केली सुध्दा आहे. पण खुप दिवस झालेत. लि.म्बु बी पाठव रे इकडे मग लावते. माझ्या मागच्या दारी खुप जागा आहे. तशी indian store मध्ये मिळते ही भाजी.
|
Surabhi
| |
| Tuesday, February 27, 2007 - 9:38 am: |
| 
|
लोपा, कशी करायची ही भाजी? आंबट असते का चवीला? कधी दिसली की करून पाहता येईल!
|
Nalini
| |
| Tuesday, February 27, 2007 - 10:20 am: |
| 
|
बी, ह्या भाजीला गावाकडे ' चिल' म्हणतात. आणि तो वर्षभर उपलब्ध असतो. शेतकर्यांसाठी ते एक नको असणारे गवत आहे. ज्याला मरण नाही. एकतर तो जमिनीला चिकटूनच पसरतो त्यामुळे मुळासकट काढून टाकणे अशक्य होते. हा असा काढलेला सुकलेला चिल जरी शेतात राहिला आणि शेताला पाणी दिले की हा लगेच हात पाय पसरतो.
|
बी ही भाजी बहुदा चिव्वळ ची असावी....जळगावकडचे लोक करतत म्हणए. मी ही दादरला एकदा [पाहीली होती, दोन तीन वर्षापुर्वी!! अशीच दिसतहोती!! अहो लिंबु! पडवळाची भाजी ओळखता येर्ते मला, मी नेहमीच करते पडवळ-डाळींब्या. पण काल मला भाजीवालीने दोडक म्हणुन जी भाजी दिलेवे तिला शीरा नाहीत!!आणि माझी ती भाजी करुन झालीही.
|
Chinnu
| |
| Tuesday, February 27, 2007 - 7:41 pm: |
| 
|
बी भाजी चिवयाची (असच म्हणतात ना?) आहे. माझी आई बेसन पेरुन करते. उसगावात मिळते का ही भाजी?
|
Nalini
| |
| Tuesday, February 27, 2007 - 9:54 pm: |
| 
|
सुपरमॉम, ठांकू. पण खुप माहिती नाही हे गं मला. अर्थात ह्या भाजीला वेगवेगळी नावं असणारच म्हणा. ह्याबद्दल आणखी असे की हा चिल जनावरांना पण खायला घालत नाही. त्याचे कारण म्हणजे हा शेणातून उकिरड्यात आणि उकिरड्यातून खतासोबत पुन्हा शेतात जाऊ नये म्हणून. हा एका कोरड्या जागी गोळा करुन सुकवून जाळला जातो. घोळूची भाजी ज्याला म्हणतात त्याला आम्ही घोळ म्हणतो तोही जनावरांना नाही घालत कारण त्याने जनावरं बुळकंडतात( हा खास गावठी शब्द). ह्या दोन्हीही भाज्या खायचा योग कधीच आला नाही.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, February 27, 2007 - 11:42 pm: |
| 
|
बी, ही चिवळीची भाजी! (किंवा चिवडी किंवा च्यूळ). खूप दिवसांनी पाहून अगदी करून खाविशी वाटली! विदर्भात तरी ही खास उन्हाळ्यात मिळते. स्पर्शाला देखील अगदी थंड असते. (बाळांना उन्हाळ्यात या भाजीवर झोपवतात! अतिशयोक्ती नाही!!!) ही भाजी निवडायला किचकट वाटते. पण ह्याची फक्त मुळं काढावी लागतात. डाळीचं पीठ पेरून, भरपूर कांदा तेलात लाल करून मग तयार केलेली ही भाजी वरून कढवलेल्या तेलाची चरमरित (लसणाची) फोडणी खालून खावी. भाकरीशी तर आणखी चवदार लागते. जेवताना बरोबर बुक्कीनी फोडलेला कांदा घ्यावा! (आंबटपणाला भाजीत कच्ची कैरी घालावी... शिजवताना!)
|
Bee
| |
| Wednesday, February 28, 2007 - 2:12 am: |
| 
|
अरे वा वाटलं नव्हतं इतक्या जणांना इतकी छान माहिती ह्या भाजीबद्दल माहिती असेल म्हणून. ह्या भाजीचे नाव आहे चिवळ. ही भाजी अगदी पोत्यानी बाजारात अगदी स्वस्त दरात विकायला येते. मृ म्हणते त्याप्रमाणे कैरी उभट चिरून त्याच्या फ़ोडी ह्या भाजीत घालतात. पण बेसन पेरल्याशिवाय ही भाजी होत नाही. बेसनामुळे तिचा अतिउग्रपणा जातो आणि मग एक छान चव येते. ही भाजी हळुहळु घट्ट होत जाते. केल्यावर ती थोडी ओलसर पसरते पण वार्यानिशी ठेवली की तिला घट्टपणा येतो. जर वाटीत ही भाजी ठेवली आणि वाटी तासाभरानी उलटली तर छान वाटीचा आकार ह्या भाजीला येतो. असे वाटते जणू तिखट केकच आहे. ही भाजी हातानी निवडायला कादाचित बरेच तास लागतील. पण आमचे पुर्वज इतके हुशार की त्यांनी झोपायच्या बाजीचा अर्थात खाटेचा उपयोग ही भाजी निवडायला केला. ही भाजी बाजीवर पसवरवून तिला हातानीच घोळसावे. बाजीखाली एक सतरंजी किंवा कापाड ठेवावा. सगळी बारीक पाने झडून खाली पडतात. बाजीच्या नारळाच्या दोर्यांचा चिवळीला स्पर्श होताच तिची पाणे टपटप खाली गळतात. पाच मिनिटात चिवळ स्वच्छ होते. उन्हाळ्यात जेंव्हा पुर्वी पंखे वा water coolers नव्हते तेंव्हा लहान मुलांना ह्या भाजीवर झोपवत. आधी धोतराच्या कापडात ही भाजी ठेवायची आणि वरतुन परत धोतर अंथरुन भाजी अंगाला चिकटू नये म्हणून मगच मुलांना वर झोपवत असत. मुलांना म्हणजे लहान बाळांना. मागे मी ह्या भाजीविषयी लिहिले होते तेंव्हा दिनेश म्हणालेत की एकदा फोटो टाक. म्हणून ह्यावेळी न विसरता ह्या भाजीचा फोटो खास आपल्या दिनेशदांकरिता आणला. ह्या भाजीचे दुसरे नाव 'चिव चिव' ची भाजी अशी आहे.
|