|
Dineshvs
| |
| Thursday, February 22, 2007 - 4:33 pm: |
|
|
Biscotti हा एक ईतालियन बिस्किटाचा प्रकार आहे. नेहमीपेक्षा थोडा वेगळा. पाव कप अनसॉल्टेड बटर घेऊन ते रुम टेंपरेचरला येऊ द्यावे. त्यात अर्धा कप कॅष्टर शुगर मिसळुन ते फ़ेटुन घ्यावे. दीड कप सेल्फ़ रेझिंग फ़्लोअर आणि अर्धा कप Polenta पाव चमचा मीठ, २ टिस्पुन बेकिंग पावडर, चिमुटभर दालचिनीची पुड आणि अर्धा चमचा धणेपुड एकत्र चाळुन घ्यावे. त्यात लिंबाच्या सालीचा किस चमचाभर मिसळावा. एक अंडे थोडे फ़ेटुन घालावे. आणि दोन टिस्पुन ब्रॅंडी घालावी. हे सगळे हलक्या हाताने मळुन घ्यावे. त्यात प्रत्येकी अर्धा कप बदाम आणि पिस्त्याचे तुकडे मिसळावेत. या मिश्रणाच्या दोन वळकट्या कराव्यात. ( साधारण ९ ईंच लांब व अडीज ईंच रुंद अश्या. ) १६० अंश सेंटिग्रेड किंवा गॅस मार्क ३ वर हे साधारण अर्धा तास बेक करावे. साधारण थंड झाले कि धारदार सुरीने, याचे तिरकस लांबट तुकडे करावेत, आणि ते परत दहा मिनिटे बेक करावेत. हवाबंद डब्यात सात आठ दिवस राहु शकतो हा प्रकार. साधारण स्वीट डेझर्ट वाईनमधे बुडवुन खातात. चहा कॉफ़ी बरोबर पण चांगले लागते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|