Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मिसळ

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » मिसळ « Previous Next »

Iop123
Thursday, February 22, 2007 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला मुम्बईत मिळणार्‍या मिसळची रेसिपी माहीत आहे का?

Dineshvs
Thursday, February 22, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईत साधी मिसळ आणि फ़राळी मिसळ अश्या दोन प्रकारच्या मिसळ मिळतात.
साध्या मिसळीसाठी अलिकडेच नलिनीने लिहिलेल्या उसळीचा वापर करुन त्यावर फ़रसाण, कोथिंबीर टाकुन आणि लिंबु पिळुन खाता येईल. सोबत पाव घ्यायचा.


Suparna
Sunday, August 19, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दादरला पणशीकर किंवा आस्वाद मधे उपासाची मिसळ छान मिळते.

दाण्याचे कुट, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ पाण्यात टाकून पातळ वाटून एक व्यवस्थित उकळ काढायची म्हणजे गेव्ही तयार होईल.
शेंगदाणे ६-७ तास भिजवून मीठ टाकून उकडावे.
एक बटाटा पण उकडावा.

भिजवलेल्या साबुदाण्याला मीठ, साखर व दाण्याचे कुट लावावे.
फोडणीत जिरे, वाटलेली हिरवी मिरची घालून साबुदाणा त्यात जरासा परतावा मग बटाट्याच्या फोडी टाकून परतायचे व खिचडी बनवायची.

सर्व्ह करताना ही खिचडी त्यावर वरील पातळ रस्सा ग्रेव्ही मग उकडलेले शेंगदाणे थोडे व कोथंबीर व वरती बटाट्याची सळी टाकून दह्यासोबत सर्व्ह करावी.
हवे तर बटाट्याचे वेफ़र कुस्करुन टाकावे.



Upas
Sunday, August 19, 2007 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी सुपर्णा.. दादर गिरगावात प्रकाशकडे तसच सांडुकडे मस्त फराळी मिसळ मिळते.. सांडूला मी एकदा पद्धत विचारली होती, अगदी अश्शीच..

Manjud
Monday, August 20, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपासाची मिसळ मी अशी करते


साहित्य:-

शेंगदाणे १- वाटी
बटाटा, रताळं, कंद वगैरे उपसाच्या मिश्र भाज्यांच्या फोडी १ / २ वाटी.
दाण्याचं कूट ३ चमचे
ओलं खोबरं अर्धी वाटी
२ हिरव्या मिरच्या, जिरं, थोडी चिंच, मीठ साखर चवीप्रमाणे.

वरून पेरण्यासाठि तळलेल्या साबूदाण्याचा तिखट चिवडा, बटाट्याचा चिवडा आणि बारीक चिरलेली काकडी आणि कोथिंबीर.

कृती: -

हिरव्या मिरच्या, जीरं, ओलं खोबरं, चिंच आणि दाण्याचं कूट सर्व मिक्सरधुन वाटुन घ्या. (पाणी शक्यतो घालायला नको)
शेंगदाणे ७-८ तास भिजवून शिजवून घ्या.
भाज्या उकडवून (अगदी मऊ नको) मध्यम फोडी करून घ्या.
जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करुन जिर्‍याची फोडणी करून घ्या. त्यात खोबर्‍याचं वाटण घालून थोडं परता. मग शिजवलेले शेंगदाणे आणि भाज्या घाला. पाणि घालून उकळी येउ द्या. चवीप्रमाणे मीठ साखर घाल. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशी मिसळीची ग्रेव्ही झाली पाहीजे.
खायला देताना आधी मिसळ भाजी घालावी. त्यावर तिखट चिवडा आणि बटाट्याचा चिवडा घालून वरून काकडी व कोथिंबीर पेरावी.
खूप तिखट वाटल्यास दही घालावे पण दही न घालताच अतिशय चविष्ट लागते ही फराळी मिस्सल.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators