|
Dineshvs
| |
| Wednesday, February 21, 2007 - 3:48 pm: |
| 
|
सहलीसाठी गेलात, खास करुन समुद्रकाठी गेलात, कि करुन बघण्यासारखा हा एक अनोखा प्रकार आहे. इटली आणि फ़्रांस दोन्ही देशातला हा मूळ प्रकार. साधारण दीड दोन किलोची ड्रेस्ड चिकन घ्यावी. तिच्या पोटाची कॅव्हीटी दोर्याने घट्ट शिवुन घ्यावी. जाड फ़ॉईलचा मोठा तुकडा घेऊन त्यावर तेवढाच दुसरा तुकडा ठेवावा. हा तुकडा संपुर्ण चिकन कव्हर करेल, यापेक्षाहि मोठा असावा. ही फ़ॉईल खाली पसरुन त्यावर साधारण किलोभर जाडे मीठ पसरुन घ्यावे. त्यावर चिकन ठेवावी. फ़ॉईलचे चारी तुकडे वर उचलुन चिकनच्या सर्व बाजुनी भरपुर मीठ घालावे. अधुन मधुन थोडे पाणी शिंपडत जावे. वरुनहि मीठ घालुन फ़ॉईल घट्ट गुंडाळुन घ्यावी. एवढ्या वजनाच्या चिकनला साधारण दोन किलो मीठ लागेल. मग शेकोटी पेटवुन मंद आचेवर हि चिकन भाजुन घ्यावी. साधारण तास भर लागेल. तेवढ्या वेळात. मिरच्या, टोमॅटो, सिमला मिरच्या, कांदे, लसणाच्या पाकळ्या, असे सगळे काड्याना टोचुन निखार्यात भाजुन घ्यावे. हे सगळे जिन्नस भाजुन झाले कि वरची साले काडुन एकत्र मॅश करावे. त्यात कच्चे तेल, व मीठ घालावे. तिखट वा मिरपुड घालावी. हे मिश्रण, जरा गरम करुन घ्यावे. चिकनची फ़ॉईल सोडवावी. मिठ घट्ट झालेले असेल, ते हळु हळु फ़ोडुन घ्यावे. ( हे मीठ वाया जात नाही. चिकन फ़्लेव्हर्ड सॉल्ट म्हणुन वापरता येते. ) आतली चिकन सोनेरी रंगावर शिजलेली असेल. त्याचे तुकडे करुन, वरच्या मिश्रणात बुडवुन खावेत. हि चिकन जळत वा करपत नाही. तसेच ती खारटही होत नाही.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|