|
Adtvtk
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:37 pm: |
| 
|
कलौंजी वापरुन काही recipe आहेत का? कशा प्रकारची चव यायला हे वापरावे? नलिनी तुझी उसळीची recipe झकास वाटतेय. पण बदाम फ़ुल म्हनजे काय?
|
Asmaani
| |
| Thursday, February 08, 2007 - 6:27 am: |
| 
|
काल एका चाट प्रकाराचे नाव ऐकले. " बास्केट चाट" किंवा कटोरी चाट. कुणी सांगू शकेल का कसे करायचे?
|
Chinnu
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:38 pm: |
| 
|
अस्मानी, बटाट्याचा किस काढुन तो कटोरीला अथवा बास्केटवजा जाळीला थापुन ती कटोरी / जाळी कडक तेलात सोडतात. त्याने ह्या बटाट्याची बास्केट तयार होते. त्यात नेहेमीप्रमाणे ऐनवेळी चाट सर्व्ह करतात. ही ऐकीव माहिती आहे.
|
Shonoo
| |
| Thursday, February 08, 2007 - 5:37 pm: |
| 
|
बन्गाली लोक बर्याच फोडण्यांमधे कलौंजी वापरतात. मसुराच्या डाळीची आमटी अशी: वाटीभर मसुर डाळ (मापाने अर्धा कप ), एक चिमूट हळद आणि थोडे मीठ घालून, पातेल्यात शिजत लावायची. प्रेशर कूकर मधे शिजवली की त्याचा लगदा होतो. एक छोटा कांदा उभा पातळ चिरायचा. दुसया पातेल्यात एक्-दोन टे स्पून तेल तापवून त्यात मोहरी, कलौंजी, जिरे, धणे आणि मेथी टाकायची, आणि कांदा घालून परतायचं. कांदा पारदर्शक झाला की दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्या. मिरच्या घातल्या की पाठोपाठ डाळ घालायची. आवडत असेल तर १ चहाचा चमचा साखर घालयची. उकळी आली की आमटी तयार. फार पातळ नसते ही आमटी.
|
Leenas
| |
| Friday, February 09, 2007 - 5:30 am: |
| 
|
मला धिरड्याचे पिठ असे १ ते २ किलो दळून आणायचे आहे. तर त्यात काय काय घालू? म्हणजे तान्दुळ, मूग डाळ, थोडे जिरे, धणे, आणी काय काय? ह्याचे प्रमाण काय? सगळ्या डाळी थोड्या थोड्या घेतल्या तर चालतील का?
|
Nalini
| |
| Friday, February 09, 2007 - 10:49 am: |
| 
|
लिनास, शक्य असेल तर सगळी कडधान्ये सालिसकट घेता आली तर एकदम बेस. जसे की सगळेच पाव किलो.. हरभरे, उडिद, मुग, मठ, तांदुळ, गहू, ज्वारी, बाजरी, चवळी, सोयाबीन. ह्यातच हवे असल्यास जिरे आणि धने. तसे ते पिठ भिजवताना वरुनही घालू शकतेस. हे सगळे वेगवेगळे भाजून घ्यायचे आणि एकत्र दळुन आणायचे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|