Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 09, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » मुलांचे खाणे » लहान बाळांसाठी खाद्य » Archive through February 09, 2007 « Previous Next »

Leenas
Thursday, March 09, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं, मी भाताच्या पेजेने सुरुवात करेन चमचाभर. Thanks Savani

Mukman2004
Thursday, March 16, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या ९ महिन्याच्या मुलीला माउ-सुत वरन्-भात, खिचडी, (अर्थात भाज्या घालुन)
रव्याचा उपमा, नाचणी आणी कणिकेची पेज आणी फ़ळा मधे केळ, चिकु, पपया
आणी अधुन मधुन भाज्याचे सुप. आसे देते
तुम्ही लोक आजुन काही पोष्टिक अश्या व्हरायटी सुचवु शकाल का?? (ति कधी कधी तेच तेच खाउन कंटाळते)


Storvi
Thursday, March 16, 2006 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन तीन पिठं एकत्र करुन धिरडी करता येतात. ही चविष्ठं पण असतात आणि दात नसले तरी चावता येतात.
avacaDo चे guacamole चांगलं होत. त्यात cheese spices कमी घालायचे recipe आहे wholsomebabyfood.com वर.
भोपळ्याचा भरित देता येतं. मी कोथिंबीरी च्या वड्या करतात तसं सगळी पीठं एखाद्या भाजीची puree अस एकत्र करुन थोदसं मीठ जिरं वगैरे घालून वाफ़वुन करत असे. चावायला मऊ आणि चविला पण छान..



Mukman2004
Friday, March 17, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks शिल्पा :-) करुन पहाते मी

Marathifan
Monday, March 20, 2006 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक प्रश्न अहे. मी यु एस ल आहे.माझा मुलगा ६ महिन्यान्चा आहे. त्याला आपण खातो त्या भाज्या(उदा. फ़्लोवेर दुधी, पालक,गाजर,कोबी वगैरे) उकडून मिक्स करुन दिल्या तर चालतात का? कि लहान मुलानसाठी ओर्गनिक सेकशन मधल्याच भाज्या आणायला हव्या?

Dineshvs
Tuesday, March 21, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहा महिन्याच्या मुलासाठी वेगळे जेवण करायची गरज नाही. हळु हळु मुलाला घरचे सगळे खातात तेच खायला शिकवले पाहिजे.
ऑरगॅनिक चा आग्रहच असेल तर तो सगळ्यांसाठी असावा. चौरस आहार असणे महत्वाचे.


Marathifan
Tuesday, March 21, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you very much, Dinesh.

Asira
Thursday, March 30, 2006 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी ३ महिन्यांची झालीय. डॉक्टरानी आता हळुहळु solids सुरू करायला सान्गितले आहे. ४ महिने पूर्ण होईपर्यन्त थाम्बलेले बरे काय ? भात शिजवून वरच्या पाण्यानी सुरुवात करावी की भाताची मऊ पेज दिली तरी चालेल ?

Storvi
Thursday, March 30, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं तिन म्हैने खुपच लहान आहे. थांब थोडे दिवस. आणि असं वेळेवर ठरवण्यापेक्षा तिची तयारी बघ. त्यचे चिन्ह
१. आपण जेवत असतांना जेवतांना आपल्या जेवणाकडॅतोंडाकडॅ बघणे
२. आपल्या बरोबर तोंड हलवणे
३. दात येणे

हे होत असले की मुलं खाण्यात interested आहेत असं समजावं अणि अशि चिन्ह दिसली की सुरु करावेत solids



Asira
Friday, March 31, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Storvi :-)
ती आम्ही जेवत असताना तोन्डाकडे बघायला लागली आहे.
मला पण ३ महिने पूर्ण म्हणजे लहानच वाटत आहे पण डॉक्टर म्हणले म्हणून वाटले की विचारावे इथे.
अजून १ महिना थाम्बलेले बरे मग ना


Storvi
Friday, March 31, 2006 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो एक महिना थांबायला काही हरकत नाही

Marathifan
Monday, April 10, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'red millet flour' mhanajech nachani na?
mi ekada anale tar tyavar 'finger millet flour' asa lihila ahe. Donihi flour var raggi asach lihila ahe.

Bee
Tuesday, April 11, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंखे, रागी म्हणजेच नाचणी. पण रागी ही भाजलेली असते. रागी हा बहुतेक तामिळ शब्द झाला. Red millet flour हे नाव अद्याप तरी ऐकले नाही. पण नाचणी लालसरच असते तेंव्हा बरोबर असेल. तुला जे मिळाले ते सत्व असेल पिठ नाही. नाहीतर नाचणीच्या भाकर्‍या छान ज्वारीच्या भाकरीप्रमाणे होतात. सत्वाची भाकरी होत नाही ग..

Asami
Tuesday, April 11, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रागी कानडी शब्द आहे. नाचणी म्हणजे Finger millet

Bee
Friday, February 09, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१० महिन्याच्या बाळाला बटाटे दिले तर चालतात का? जर चालत असेल तर भाजलेला बटाटा द्यावा की उकळलेला?

आणि fruit jam दिला तर चालतो का कारण आता तिला दात आले आहेत आणि घडीच्या पोळीमधील जो आतला पदर असतो तो तिला खूप आवडतो. त्या सोबत fruit jam दिला तर चालेल का? की मुळात पोळीचा पदरही देऊ नये. पण ती छान खाते हे मात्र नक्की आहे..

आम्ही जेवायला बसलो की आमच्याकडे बघते आणि दात खाते. मग तिला पोळीचा कण चारला की अजून अजून दे म्हणते. पण फ़क्त एकच की लवकर गिळत नाही. आतमधेच गोळा करुन ठेवते. मग आम्हाला तिच्या घशात अडकण्याची भिती वाटते. आता तिचे diet इतके वाढले की ताई म्हणते पुर्वी तीन वेळा नाचनी सत्व आणि लागेल तसे दुध जिथे लागायचे तिथे तिला आता वरचा आहार देखील कमी पडतो आहे. म्हणून सध्या आम्ही खिमटी प्रकार सुरू केला. चिक्कू वगैरे तिने नकार दिला. केळी अजून थंडीचे दिवस असल्यामुळे सुरु केली नाहीत.


Limbutimbu
Friday, February 09, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> १० महिन्याच्या बाळाला बटाटे दिले तर चालतात का?
चालतात की नाही माहीत नाही पण माझ्या धाकटी लिम्बोणिने दहा महिन्यान्ची असताना माण्डा ठोकून "बटाटेवडा" मिटक्या मारीत खाल्लेला! नॉट अ जोक! माह्याकड फोटो हे तिचा खातानाचा!
पण तू आपला नीट सल्ला घे कुणाचा तरि.....!


Bee
Friday, February 09, 2007 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर कुणीतरी दही दिल तरी चालतं म्हणालेत. माझ्या मते दही साखर घालून जरी दिल तरी खोकला व्ह्यायची भिती नाही का.. दही चालत असेल तर दही घालून भाताची पेज दे असे मी ताईला सुचविणार आहे..

LT- धन्यवाद दोस्ता..


Robeenhood
Friday, February 09, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीन महिन्यानन्तर कोणत्याही बाळाला मोठ्या माणसांचा कोणताही आहार चालतो...
(अनुभव आहे बरे दोन छोट्या मानवांचा फुक्कट नै सांगत..)


Limbutimbu
Friday, February 09, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> अनुभव आहे बरे ....
आसुऽऽद्या आसुऽऽद्याऽऽ!
अन तो अनुभवी मानव बाळाचा बोवाजी होवुन मग खुपच मोठ्ठा म्हन्जे बाळासारखाच बोळक्या तोन्डाचा झाला की मग परत ल्हान बाळाचाच आहार त्याला चालू लागतो.......!
हूडा, यावर तुझे काही अनुभवाचे बोल????
DDD

Shonoo
Friday, February 09, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी

इथले डॉक्टर साधारण वर्ष पूर्ण होईपर्यंत गाई-म्हशीच्या दुधाचे प्रकार देउ नये म्हणतात दही, चीझ वगैरे. पण भारतात ८-१० महिन्यांच्या बाळाला दही-भात देतात. दात आले असतील तर पोळी, पुरी, ब्रेड, डोसा, इडली हे सर्व प्रकार देऊ शकता. माझ्या दोन्ही मुलांनी साधारण याच वयावर ( १०-१२ महिने) हे सर्व प्रकार खायला सुरुवात केली होती.

French Fries तर अगदी आवडीने खात असत. अजूनही खातातच म्हणा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators