|
Mrinmayee
| |
| Saturday, February 03, 2007 - 10:18 pm: |
| 
|
मक्याच्या पीठाच्या रोट्या माझ्या हातून अजीबात धड झाल्या नाहीत. तुटल्या! मग मैत्रीणीच्या आईला विचारून त्यात इतर नाना पीठं घालून शेवटी मिश्र पिठाच्या भाकर्या झाल्या. उरलेल्या मक्याच्या पिठाचा उपयोग पकोडे, धिरडी यात केला. नारळाच्या दुधात हे पीठ भिजवून, तिखट मीठ तीळ आणि जीरं आलं हिरव्या मिरचिची पेस्ट कालवून, त्यात यीस्ट घालून (२-३ तासांनी) छान फूग आणली. तव्यावर अगदी एक एक पळी पीठ घालून, (न पसरवता) झाकण ठेवून वाफ आणली. ही धिरडी छान फुगली. चांगली लागली.
|
Amayach
| |
| Sunday, February 04, 2007 - 5:40 pm: |
| 
|
मनु, तुझी रेसीपी सांगतेस का?? अग, ख़ुप मोट्ठा pack आहे. दिनेश, थालिपीठात इतर पीठाबरोबर घालायचा विचार केला होता. म्रुण्मयी, धिरडी करुन पाहाते. आणी माझ्या मक्क्याच्या रोट्या या वेळी मुळीच तुटल्या नाहीत. तु गरम पाण्यात पीठ भिजवुन करुन पाहा नाही तुटत. मी "मासीका" नावाचे पीठ वापरले.
|
मनुस्विनी लिहि ग कृती, माझ्याकडे मी चांगल २५ किलो आणुन ठेवले पिठ मृ मला वाटते इथल्या मक्याच्या पिठला विरी कमिच असते काय्/ ताज्या पिठाच्या पण भाकरी होत नाहित. मी गव्हाचे पिठ मिक्स करुन केल्यात. वरची तु दिलेली कृती छाने तस काहितरी करुन बघते.
|
Dineshvs
| |
| Monday, February 05, 2007 - 3:54 pm: |
| 
|
एक मोठा कांदा किसुन घ्यायचा. त्यात मीठ, मिरचीचे वाटण आणि कोथिंबीर घालायची. थोडे तेल घालायचे. त्याला पाणी सुटले कि त्यात मावेल तेवढे पिठ घालायचे. पाणी शक्यतो वापरायचे नाही. जरा मऊसर गोळा करायचा. त्यातला संत्र्याएवढा गोळा घेऊन, तव्यात तेल टाकुन त्यातच थापायचा. ( तवा गॅसवर ठेवायच्या आधीच ) मग मंद आचेवर तवा ठेवायचा. एका बाजुने सोनेरी झाले कि परतुन घ्यावे. एखाद्या फ़ॉईलवर तेल लावुन त्यावरहि थापता येते. मग फ़ॉईल उचलुन तव्यावर उलटे टाकायचे. व फ़ॉईल सोडवुन घ्यायची. हा प्रकार थापायला सोपा जातो. आकार आपल्याला हाताळता येईल ईतका ठेवावा. उलाथने मोठे घ्यावे. तसे नसेल तर भात वाढायचा हाता घ्यावा. लाल गाजर उकडुन कुस्करुन त्यातहि पिठ भिजवता येते. त्यालाहि छान चव लागते. त्यात थोडी साखरहि घालावी.
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 06, 2007 - 4:57 pm: |
| 
|
हो हो लोपा, तुझ्यासाठीच आहे ती. ससुल्या, दोडकेभातासाठी, दोडके सोलुन किसुन घ्यायचे. एक वाटी तांदळाला एक दोडका लागतो. हिंग, मिरची, जिर्याच्या फ़ोडणीवर दोडक्याचा किस परतायचा, त्यावर धुतलेले तांदुळ परतायचे. व लागेल तसे ताक वा पाणी घालुन शिजवायचे. दोडक्याच्या किसाला भरपुर पाणी सुटते, म्हणुन पाणी गरज बघुन घालायचे.शिजत आला कि मीठ घालायचे व वरुन तुप व ओले खोबरे घालायचे. आज सविस्तर लिहायला वेळ नाही म्हणुन ईथेच लिहितोय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|