Surabhi
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:24 pm: |
| 
|
लाजो, आमच्या कोंकणी पद्धतीचा एक नाचणीचा प्रकार लिहिलाय बघ मी कोंकणी बीबीवर. तुला आवडतो का बघ. पौष्टिक व सोपा आहे. तसेच नाचणीचे बेसन लाडूसारखेच लाडू करतात ते पण छान होतात.पण त्यात dryfruits तूप, गुळ खजूर, असे घालून त्याची चव वाढवावी लागते.
|
Shonoo
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:46 pm: |
| 
|
लाजो तांदळाच्या पिठाच्या करतात तशाच नाचणीच्या पिठाच्याही भाकर्या करता येतात. इथे भाकर्यांच्या बी बी वर सापडतील तांदळाच्या भाकर्यांसाठी टिप्स.
|
Chinnu
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:02 pm: |
| 
|
लाजो नाचणीचे सुप करता येते. मीठ आणि जीरे टाकुन पाण्याला उकळी आणायची. नाचणीचे पीठ एक दोन चमचे पाण्यात मिक्स करुन ते द्रावण उकळलेल्या पाण्यात घलत हलवत जायचे. जरा गाढ झाले की उतरवायचे. वर कोथिम्बीर चिरुन घालयची आणि गाठिशेव पेरुन सर्व्ह करयचे. हाच प्रकार सुप न करता अजुन घट्ट होवु दिला तर हे असे पीठ सांबार बरोबर छान लागते. देतांना बाउलमध्ये आधी सांबर आणि वर एक मोठा चमचा ह्या पीठाच गोळा असे देतात. ह्याला आम्ही रागीसंकटी म्हणतो. नाचणीचा शिरा / हलवा पण करतात तुपावर भाजुन. मला व्यवस्थीत कृती माहीत नाहिये त्याची.
|
Prady
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:09 pm: |
| 
|
लाजो नाचणीचे लाडू छानच लागतात. आणी वर चिन्नूने सांगितल्या प्रमाणे मीठ जिरं घालून घट्ट शिजवून मग गॅसवरून उतरवलं की थोडं ताक घालायचं. असं छान लागतं. iron चा चांगला स्त्रोत आहे नाचणी म्हणजे.
|
Savani
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:49 pm: |
| 
|
नाचणीचे पीठ दुधात घालून खिरीसारखा प्रकार सुद्धा करता येतो. छान लागते ते पण. मी माझ्या मुलाला नेहमी देते. लहान मुलांसाठी तर नाचणी चांगली.
|
Shmt
| |
| Thursday, February 01, 2007 - 8:39 pm: |
| 
|
मला एक माहीती हवी आहे. asparagus च्या शेंगा उष्ण असतात का? Thanks in advance
|
Lajo
| |
| Friday, February 02, 2007 - 12:23 am: |
| 
|
धन्यवाद सुरभि, शोनू, चिन्नु, प्रज्ञा आणि सावनी. भरपूर आयडियाज मिळाल्या. मला iron साठीच नाचणी खायला सांगितली आहे.
|
लाजो काय म्हनतेस? भारतवारि हुन आले बर का मी. मस्त मजा केली....खूप खूप आठवण येते आईची.
|
Lajo
| |
| Friday, February 02, 2007 - 3:11 am: |
| 
|
हाय रुपाली, मी मजेत, तु कशी आहेस? मज्जा आली असेल ना घरी? तु नवीन काही पदार्थ करायला शिकलीस की नाही आईकडुन? नक्कि पोस्ट कर. भाग्या चालली आहे या वीकएंडला भारतात. आपण भेटु तुला जमेल तेव्हा..
|
Sia
| |
| Friday, February 02, 2007 - 6:02 am: |
| 
|
कर्नाटक मधे रागी-मुद्दा नावाच एक प्रकार करतात अणि रागि चे दोसे पण करतात
|
Ami79
| |
| Friday, February 02, 2007 - 6:50 am: |
| 
|
धन्यवाद पुनम.मि नक्की करुन पहिन
|
Dineshvs
| |
| Friday, February 02, 2007 - 1:47 pm: |
| 
|
नाचणी चे दोदोल, आंबिल या पदार्थांची चर्चा झालीय ईथे. नाचणीच्या शेवया, पापड वैगरेहि करतात.
|
सिआ रागि मुद्दे कशे कर्तत?
|
Amayach
| |
| Friday, February 02, 2007 - 4:01 pm: |
| 
|
माझ्याकडे 'मक्के की रोटी' करायला आणलेले मक्याचे पीठ उरले आहे त्याचे आणखीन काय करता येईल? आता 'मक्के की रोटी' नाहि खायची! कोणाला काही सुचते आहे का?
|
Zakki
| |
| Friday, February 02, 2007 - 4:26 pm: |
| 
|
मी इथल्या शॉपराईट मधे मक्याच्या पिटा ब्रेड चे पाकीत बघितले. खाऊन पाहिले, आवडले नाही! तुम्हाला 'मक्के की रोटि' का खायची नाही? मग त्या पीठाचे इतर पदार्थ कसे चालतील? नाहीतर कॉर्न ब्रेडच्या रेसिपीज मिळतील कुठेतरी.
|
Zee
| |
| Friday, February 02, 2007 - 5:57 pm: |
| 
|
खालिल लिंक मधे रागीचे विविध पदार्थ दिले आहेत. रागी मुद्धे सुद्धा.... http://www.deccanherald.com/deccanherald/aug062004/liv8.asp
|
Shonoo
| |
| Friday, February 02, 2007 - 6:19 pm: |
| 
|
भाकरी च्या BB बर लालूने ( बहुतेक) मक्याच्या पीठाच्या भाकरी बद्दल लिहिले होते.
|
Chinnu
| |
| Friday, February 02, 2007 - 7:34 pm: |
| 
|
ऋतुजा, अग मी वर दिलेली रागी संकटी म्हणजेच रागी मुद्दा. बेसिकली मुद्दा किंवा संकटी म्हणजे शिजवलेल्या पीठाचा गोळा. झी ते मुद्दे नाही हो!
|
Dineshvs
| |
| Saturday, February 03, 2007 - 11:07 am: |
| 
|
Amayach त्या पिठाचे थालीपीठ, उपमा वैगरे करता येईल. थालीपीठासाठी कांदा, मिरचीचे वाटण, जिरे, मीठ वैगरे घालायचे. चांगले लागते. मेक्सिकन पदार्थ करता येतील.
|
Manuswini
| |
| Saturday, February 03, 2007 - 10:05 pm: |
| 
|
तु corn पिठचे मक्याच तमलिटो corn cakes करु शकतेस. तो आपल्या गोड शिर्या सारखा छान लागतो. चवदार सुद्धा असतो. रेसिपी हवी तर सांग.
|