|
Zakasrao
| |
| Thursday, January 25, 2007 - 11:25 am: |
| 
|
घरी पनीर टिक्का मसाला केला होता पण पनीर थोडे वातड झाले. कोणी कारण सांगु शकेल का? प्लीज.
|
Akshitija
| |
| Thursday, January 25, 2007 - 9:00 pm: |
| 
|
कुणाला pineapple शिरा recipe माहीत आहे का?
|
क्शितिजा, www.aayisrecipes.com वर आहे त्याची recipe
|
Dineshvs
| |
| Sunday, January 28, 2007 - 3:20 am: |
| 
|
झकासराव, पनीर ज्या दुधापासुन केले त्यात जर फ़ॅट्स कमी असतील तर असे होते. त्यात मैद्याचे प्रमाण जास्त असले, मुरवताना तेल कमी पडले, ग्रील करताना आच अगदी मंद असली व जास्त वेळ ग्रील केले तर असे होते. विकतचे पनीर एक तर खुप फ़र्म असते किंवा खुप मऊ. फ़र्म पनीर तळण्यासाठी व ग्रील करण्यासाठी योग्य आणि मऊ, मिठाई रसगुल्ला साठी वैगरे. आणलेले पनीर, बरेच दिवस फ़्रीजमधे राहिले तर त्यातला सगळा ओलावा निघुन जातो, व ते कोरडे बनते. असे पनीर ग्रील केले तर ते वातड होते.
|
Zakasrao
| |
| Sunday, January 28, 2007 - 5:58 am: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा, पण मी पनीर विकत आणले होते.ते फ़्रिजमधे २४ तासापेक्षा कमी वेळ होते. तरी ते तसे झाले. त्याल fry करण्यासाठी काही ठराविक वेळ आहे का? ते किती वेळ fry करावे?
|
Dineshvs
| |
| Sunday, January 28, 2007 - 10:57 am: |
| 
|
दुकानात ते किती दिवस होते ते महत्वाचे आहे. खुपदा जुना माल आधी खपवला जातो. खरे तर पनीर मुंबईत खुप ठिकाणी ताजे मिळते. वसई हुन मुंबईला रस्त्याने येताना, भिवंडि रोडवर, भगवन्स नावाचे एक मोठे संकुल आहे. तिथे दुधाचे उत्तम पदार्थ मिळतात. तर असे ताजे पनीर, आणुन त्याचा वास घेतला तर त्याला ताज्या दुधाचाच वास येतो. अजिबात आंबुस वा नटी वास येत नाही. धारदार सुरीने कापले तर त्याचा व्यवस्थित तुकडा कापला जातो, चुरा होत नाही. असे तुकडे पडणारे पनीर टिक्का, पालक पनीर साठी योग्य. चुरा झाला तर भुर्जी किंवा सारणा साठी योग्य. कापताना किती जोर लावावा लागतो त्यावर पण पनीरचा प्रकार ठरेल. जर कापताना पिकलेले केळे कापण्या ईतका जोर द्यावा लागला तर ते फ़र्म आणि पिकलेली पपई कापल्या सारखे वाटले, तर ते मऊ पनीर. असे पनीर बहुदा तळल्यावर त्यातली फ़ॅट वितळते आणि त्याच्या शेप आणि टेक्श्चर दोन्ही जाते.
|
Sami
| |
| Sunday, January 28, 2007 - 4:54 pm: |
| 
|
मी कुठल्याही gravy साठी पनीर कधीच deep fry करत नाही... तव्यावर थोडं तेल / तूप टाकून तुकडे दोन्ही बाजूनी अगदी किंचित सोनेरी रंग येईपर्यंत परतते आणि मग लगेच काढून gravy मधे टाकते. त्यामुळे पनीर gravy मधे छान मऊ रहातं at the same time तुटतही नाही. पण जर deep fry केलं तर लगेच गरम पाण्यात टाकून पिळून घ्यावं. आणि gravy मधे टाकावं म्हणजे मऊ रहातं.
|
Sunidhee
| |
| Monday, January 29, 2007 - 9:14 pm: |
| 
|
मंडळी,खुप basic पण मला बर्याच दिवसांपासुन पडलेला प्रश्न.. US मधे sour cream पाहिले. पण fresh cream पाहिले नाही. ते काय नावाने मिळते? कोणत्या कंपनीचे?
|
Sashal
| |
| Monday, January 29, 2007 - 9:19 pm: |
| 
|
whipping cream मिळतं dairy section मध्ये तेच fresh cream .. तुमच्याकडे local dairy brands असतील किंवा मग berkely farms/ borden वगैरे brands available असतील ..
|
Sunidhee
| |
| Monday, January 29, 2007 - 9:28 pm: |
| 
|
अरे, मला उगाचच वाटायचे whip cream गोड किंवा आंबट असते आणि फक्त फ़ेस असतो.. म्हणुन कधी नाही घेतले. तसा नसत का? thanks सशल.. लगेच उत्तर दिलस.
|
Sashal
| |
| Monday, January 29, 2007 - 9:32 pm: |
| 
|
whipped cream नाहि whipping cream .. ह्यात फ़रक आहे whipping cream whip/ beat केल्याननंतर त्याचा फ़ेस होतो किंवा whipped cream होतं ..
|
Sunidhee
| |
| Monday, January 29, 2007 - 9:40 pm: |
| 
|
अगं बर झालं फरक सांगितलास ही निघालेच आणायला. ठान्कू.
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 30, 2007 - 1:35 pm: |
| 
|
आमचे ईंग्रजीचे प्राध्यापक, आगाशे, नेहमी ड्रिंकिंग वॉटर, व्हीपिंग क्रीम अश्या शब्दप्रयोगाना हसायचे. त्यांच्यामते ड्रिंकेबल वॉटर आणि व्हीपेबल क्रीम, हे योग्य शब्दप्रयोग आहेत.
|
Zakasrao
| |
| Wednesday, January 31, 2007 - 6:14 am: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा, परत try करेन.
|
Ami79
| |
| Wednesday, January 31, 2007 - 6:46 am: |
| 
|
इथे मी डबल बी बद्दल विचारले होते, ते वाहुन गेले वाटते
|
Milindaa
| |
| Wednesday, January 31, 2007 - 12:20 pm: |
| 
|
त्यावर psg ने उत्तर दिले होते. तिला विचार.
|
Lajo
| |
| Thursday, February 01, 2007 - 4:32 am: |
| 
|
नमस्कार मंडळी, मला कोणी नाचणीच्या पीठाचे काय काय पदार्थ करता येतील (आणि जमल्यास कृती सुद्धा) सांगू शकेल का प्लिज...
|
Psg
| |
| Thursday, February 01, 2007 - 7:19 am: |
| 
|
मिलिंदा, इतकं लक्षात आहे तर मी काय सांगीतलं होतं तेही सांग अमिला (पण इतक्यातच लिहिलेलं पोस्ट होतं ते, उडलं कसं काय? इथे तर अति जुने मेसेजेस पण आहेत!!) अमि, पुन्हा एकदा - डबलबीच्या शेंगा असतात, मोठे दाणे असतात.. त्याची जीरं-खोबरं-लसूण घालून छान उसळ करतात, चव थोडी पीठूळ असते, रस राखून छान लागते..
|
उसाच्या रसाच्या दशम्या सांगा कशा करायच्या?
|
Milindaa
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:06 pm: |
| 
|
सोनू, जरा शोध घ्या म्हणजे सहज सापडेल. सर्व काही विचारत बसू नका. इथे आहे रस घालून दशम्या करायची पध्दत. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=753225#POST753225
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|