|
Surabhi
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:23 pm: |
| 
|
"नाचणीचे पोळे" हा धिरड्यासारखा कोंकणी प्रकार आहे. ओल्या खोबर्याच्या लसूण घातलेल्या चटणीबरोबर हे दोसे खातात. छान जाळीदर, गुलाबी रंगाचे आणी कुरकुरीत पण होतात. नाचणी ४ कप, तांदूळ १ कप, उडदाची डाळ अर्धा कप एकत्र दळून आणायचं. पीठात मीठ व पाणी घालून पातळ घावन काढावे. आंबटसर चव हवी तर पीठ थोड्या ताकात व पाण्यात रात्रभर भिजत घालावे व सकाळी डोसे\पोळे काढावे. non-stick तव्यावर छान पातळ निघतात. लसणीची ओल्या चटणी सोबत हे पोळे खातात. ह्या बरोबरच्या चटणी साठी अर्ध्या नारळाचे खोबरे, त्यात २-३ सुक्या लाल मिरच्या, ४ लसणीच्या पाकळ्या व चिंच घालून सरबरीत चटणी वाटावी. ही चटणी पण केशरी रंगामुळे मस्त दिसते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|