|
Dineshvs
| |
| Sunday, January 28, 2007 - 4:20 pm: |
| 
|
गाजर आणि मेथीची भाजी या दिवसात बाजारात मेथी आणि गाजरे भरपुर आहेत, यावर केलेला हा आजचा प्रयोग. दोन मेथीच्या जुड्या घेऊन त्याची फक्त पाने खुडुन घ्यावीत. पाने धुवुन ती ताटात पसरुन घ्यावीत. त्यातच पाव किलो गाजरे जाडसर किसुन घ्यावीत. हलक्या हाताने ते मिसळुन घ्यावे. वाटीभर कच्चे शेंगदाणे घेऊन, मिक्सरवर त्याचे जाडसर कुट करुन घ्यावे. दहाबारा लसुण पाकळ्या सोलुन घ्याव्यात. तेलाची फ़ोडणी करुन त्यात हिंग जिरे घालावे. त्यात मिरच्यांचे तुकडे घालावेत. मी सांडगी मिरच्या वापरल्या, पण लाल वा हिरव्या मिरच्या चालतील. त्यावर दाण्याचे कुट घालुन जरा परतावे. तेल वेगळे झाले कि त्यावर मेथी गाजराचे मिश्रण घालावे. झाकण ठेवुन वाफ द्यावी. मग जरा परतुन मीठ घालावे. परत हलक्या हाताने परतुन गॅस बंग करावा. हि भाजी फार परतावी लागत नाही. पटकन होते. दिसायला तर हि भाजी सुंदर दिसतेच आणि चवीलाहि छान लागते. मेथीची भाजी करताना, ती खुप आळते, गाजरामुळे या भाजीला छान वस्तुमान मिळते. शिवाय गाजर आणि दाण्यामुळे, चवहि येते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|