|
Bee
| |
| Wednesday, January 24, 2007 - 11:19 am: |
| 
|
काशीकोहळं म्हणजे आपला लाल रंगाचा लांबुळका भोपळा. घार्या हा पुर्यांसारखाच एक प्रकार आहे. आंबूस म्हणजे आंबटसर. तर पिकलेला एक किलो भोपळा छान गलगल होईल इतपत शिजवायचा. त्यात एक वाटी घट्ट दही घालायचे. नंतर त्यात मावेल इतकी कणिक आणि अगंदी पळीभर बेसनाचे पिठ घालायचे. मिठ, हळद, तिखट, ओवा आणि थोडा खायचा सोडा घालावा. हे सर्व मिश्रण घट्ट गोळा होईल असे मळायचे. कणिक मळताना हवे तर तेलाचा हात घ्यायचा. नंतर पोळपाटावर छोट्या छोट्या पुर्या लाटून त्या तळून घ्यायच्या. पुर्यांचा आकार पानीपुर्यांऐवढा असतो पण ह्या पुर्या मात्र जाडसर असतात. वर छान ओवा दिसायला हवा आणि चवीला लागायला हवा इतका घालायचा. बरेच जण ह्या घार्या ताकात बुडवुन खातात.
|
Chinnu
| |
| Friday, February 02, 2007 - 11:28 pm: |
| 
|
बी, मी Indian Grocer मध्ये जो भोपळा मिळतो त्यला microwave केले. बाकी कृती तुम्ही सांगितल्याप्रमणे. सुंदर झाल्या पुर्या. जरा गुळचट चव होती, मग चटणीबरोबर हादडले. धन्यवाद!
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|