|
Savani
| |
| Thursday, January 11, 2007 - 5:18 pm: |
| 
|
प्रज्ञा, खास तुझ्यासाठी. ब्रोकोली स्वच्छ धुवुन त्याचे तुरे काढुन घ्यायचे फ़्लॉवरप्रमाणे. ते तुकडे पाण्यात किंचीत मीठ घालून त्यात घालुन जरा वाफ़वून घ्यायचे. MW मधे सुद्धा चालतील. आता ते वाफ़वलेले तुरे निथळुन घेऊन, हाताने थोडे चेंदून घे. पाणी शक्यतो काढुन टाक सगळं. आणि मग कणीक थोडे बेसन, तांदळाचे पीठ असे एकत्र करून त्यात ब्रोकोली, थोडी कोथिंबीर हिरव्या मिरच्या ठेचुन, धणे जीरे पूड, किंचीत हळद, मीठ, तेल असे सगळे एकत्र करून कणीक मळायची. आणि पराठे लाटुन तव्यावर तेल सोडुन खमंग भाजायचे. आणि लसणाच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खायचे. ह्यात कोथंबीर थोडी जास्त घातली तर ब्रोकोलीची चव उग्र लागत नाही. मी ह्यात आलं लसूण घालत नाही कारण मला वाटतं त्याने आणखी उग्र चव येईल की काय.
|
Prady
| |
| Thursday, January 11, 2007 - 5:32 pm: |
| 
|
सावनी Thanks .. नक्की करून पाहाते.
|
Bee
| |
| Friday, January 12, 2007 - 3:06 am: |
| 
|
सावनी, मलाही ही कृती आवडली. माझ्या एका ओळखीच्या काकू सांगत होत्या ब्रोकुलीचे सुप देखील छान होते. मी करुन बघीन ही कृती. thx!
|
Prady
| |
| Friday, January 12, 2007 - 4:36 pm: |
| 
|
सावनी लई झ्याक झालेत पराठे. पण मी घातलंय थोडं आलं लसूण चांगला स्वाद आलाय. आणी उग्रपणा अजिबात नाही.
|
Savani
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:05 pm: |
| 
|
प्रज्ञा बी, करून बघ नक्की. आणि सांग आवडले का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|