|
Dineshvs
| |
| Tuesday, April 06, 2004 - 9:34 am: |
| 
|
अळकुड्यांची पंजाबी भाजी. अळकुड्या किंवा अरवी उकडुन सोलुन घ्यावी.दोन हातांच्या तळव्यात ती जरा दाबुन चपटी करुन घ्यावी. चिंचेचा कोळ, लाल तिखट, थोडासा गरम मसला, जिरेपुड, मीठ यांचा थोडे पाणी घालुन दाटसर घोळ करुन घ्यावा. त्यात वरील अळकुड्या मुरवत ठेवाव्यात. एक दोन तासानंतर तव्यात तेल घालुन मंद आचे वर खरपुस तळाव्यात. अगदी शेवटी त्यावर थोडी कणीक भुरभुरवी. व ती खंग भाजेपर्यंत परतावे. अशीच कमलकाकडीचे काप करुन पण भाजी करता येते. मरठी पद्धतीने भाजी करताना अरव्या सोलुन कच्च्याच कापा करायच्या. तेलाची मोहरी, हिंग कडीपत्ता घालुन फ़ोडणी करायची त्यात हिरव्या मिरच्या आणि अरवीचे काप घालायचे. कोकमे आणि मीठ घालुन परतुन कोरडी भाजी करायची. वरुन खोबरे व कोथिंबीर घालायची. जर अरवी खाजरी वाटली (कापताना हाताला खाज आली तर) थोडा वेळ काप चिंचेचा दाट कोळात मुरवुन मग वापरावे.
|
Sayonara
| |
| Thursday, April 22, 2004 - 3:03 am: |
| 
|
राजसी, अळकुड्यांची भाजी मी आणखीन एका पद्धतीने करते आणि ती अशी : अळकुड्यांचे चौकोनी तुकडे करुन deep fry करुन घायचे आणि मग तेलाची हिंग, हळद, मोहरी, जिरं ह्याची फोडणी करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो परतून घ्यायचे मग त्यात किंचित लाल तिखट, गरम मसाला घालावा. चांगले शिजल्यावर मग अळकुड्याचे तुकडे घालून वरुन कोथिंबीर घालावी. ह्यात धने - जिरे पूड जरी घातलीस तरी वाईट लागणार नाही. ह्या पद्धतीने अळकुड्यांचा चिकटपणा जातो.
|
Rajshri
| |
| Tuesday, November 14, 2006 - 4:17 pm: |
| 
|
Arvi chi bhaaji -Boil arvi (5-6 medium sized) till soft. -When cool, peel and chop into medium sized pieces. -Heat oil. Fry the pieces carefully to a golden brown color on medium heat. -In the same oil preferably, add 1 tablespoon ova (ajwain)-an essential material for this recipe, salt, halad thikhat, garam masala. Fry for 2-3 minutes. -Add the fried arvi pieces to this mixture and mix till the pieces are coated with the masala. -Cover and cook on slow heat for 5-10 minutes. -Garnish with chopped coriander. Serve hot with chapatis. Variation-can also add finely chopped onion or spring onion.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|