|
Dineshvs
| |
| Monday, October 10, 2005 - 3:24 pm: |
| 
|
कोल्हापुरला भरली दोडकी करतात. भरल्या वांग्याप्रमाणेच असतात ती. दोडक्याची हिरवी मिरची, चण्याची डाळ व ओले खोबरे घालुन भाजी करतात. तसेच तुरीची डाळ, बटाटे, टोमॅटो व दोडके सगळे एकत्र शिजवुन काळा मसाला घालुन रसभरित भाजी करतात. दोडक्याची साले न काढता तो ठेचुन घ्यायचा. बटाटेहि असेच न कापता ठेचुन घ्यायचे. हिरव्या मिरच्या, आले, लसुण हे पण ठेचुन घेऊन सगळे परतुन शिजवायचे. यात मुगाच्या डाळीचे वरण घालायचे. खोबरे घालायचे. हि भाजी फ़ार चवदार लागते.
|
Dineshvs
| |
| Monday, October 10, 2005 - 4:10 pm: |
| 
|
ईथे भरल्या वांग्याचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी कुठलाहि मसाला भरुन केला तरी चालतील. दोडक्याचे तीन ईंच तुकडे करायचे. व भरल्या वांग्याप्रमाणे भरुन घ्यायची. दोडक्याला खुप पाणी सुटते, म्हणुन फ़क्त वाफ़ेवर शिजवायची. दोडकी कधी कधी कडु निघतात. म्हणुन देठाजवळचा एक तुकडा खाऊन बघावा. तो कडु लागला नाही तरच भाजीत वापरावा. तसेच भरली दोडकी करताना पुर्ण शिरा काढु नयेत. नाहीतर भाजीत दोडके विरघळतात. पण यापेक्षा वर जो ठेचुन करायचा प्रकार आहे ना तो खुप छान लागतो. खोल भांड्यात दोडके घेऊन लाटण्याने ठेचले तरी चालेल. याहि भाजीत फ़ार थोडे पाणी घालायचे. तोंडली ठेचुन पण छान होते भाजी.
|
Karadkar
| |
| Monday, October 10, 2005 - 4:34 pm: |
| 
|
दिनेश त्यांची रेसिपी लिहितिलच पण मी माझी पण देते दोडकी नाजुक बघुन घ्यावीत शक्यतो. धुवुन शिरा काढुन त्याचे २ इंc लांबीचे तुकडे करावेत. त्या तुकड्यांचे ४ फ़ाक करावेत (भरल्या वांग्याला छेद करतो तसे.) असे एकुण १० - १२ तुकडे आहेत असे समजु. १ वाटी दाण्याcए कुट, २ ते ३ लसूण पाकळ्या, कांदा लसुण मसाला, मिठ, चविप्रमाण, खुप सारी कोथीम्बिर बारीक चिरुन. वरील सर्व मिश्रण अर्धा चमचा तेल घालुन एकत्र करावे, आणी ते दोडक्याच्या तुकड्यांमधे भरावे. तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता घालुन फोडणी करावी त्यात दोडक्याचे तुकडे घालुन हलक्या हाताने परतावे. मसाला जर जस्ती झाला असेल तर तो पण वर घालावा. पाणी नाही घतले तर भांड्यावर झाकण ठेवुन त्यात थोडे पाणी घालुन शिजवावे. मसाला बाहेर पडणारच पण तो शक्यतो कमी बहेर पडावा अशी काळजी घेउन परतावी.
|
Sassulya
| |
| Tuesday, February 06, 2007 - 12:56 am: |
| 
|
वरील पाक क्रुति मधे ओले खोबरे टाकले तर अजुन छान
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|