Giriraj
| |
| Tuesday, October 11, 2005 - 5:20 am: |
| 
|
आंबट चुका... हीसुद्धा एक मोसमी पालेभाजी. चवीला काहीशी आंबट लागणारि ही भाजी सध्या मिळू शकते. भाजी निवडून घ्यावी. साधीशीच फ़ोडणी ध्यावी. भाजीत पाणी घालून थोडी उकळी आल्यावर दाळीचे पीठ घालून थोडावेळ शिजू द्यावे. यात शेंगदाणेही घालू शकतात. त्यांची चव अगदीच फ़न्टास्टीक लागते. नकीच करून बघा.
|
आंबट चुका म्हणजे घोंगुरा काय? कोणी सांगेल का मला? मी बाजारात ती भाजी बघुन घेवुन आले नी डाळ टाकुन बनवली, आंबट होती चवीला.
|
Prady
| |
| Sunday, August 19, 2007 - 3:41 am: |
| 
|
घोंगुरा म्हणजे अंबाडी ची भाजी गं मनू
|
हो ग हो prady, thanks गं. मी नंतर आईला फोन करून विचारले नी वर्णन केले तेलगु बायांनी मला घुंगूरा सांगीतले, मग केल्यावर जरा ओळखीची वाटले पण कित्येक वर्षात खाल्ली न्हवती. कमालीची आंबट ग.
|
Lalitas
| |
| Monday, August 27, 2007 - 2:14 pm: |
| 
|
मनु, त्या तेलगु बायांना घोंगुरा pickle विचार..... आंबटचुक्याचं कसलं अप्रतिम लोणचं बनवतात, खाऊन बघ असलं त्यांच्याजवळ तर!
|
Chinnu
| |
| Monday, August 27, 2007 - 3:38 pm: |
| 
|
ललिता, गोंगुरा pickle, Indian grocery store मध्ये पण मिळते. बर्यापैकी तिखट असते. spicy जेवणाची सवय असेल तरच घ्या. गरम भातावर तूप टकून छान लागते.
|
Dineshvs
| |
| Monday, August 27, 2007 - 4:22 pm: |
| 
|
ललिता, आपल्या चवीला ते लोणचे खुपच तिखट आणि तेलकट लागते. मी त्यात गुळ आणि खारकेची पुड घालुन खातो. आंबाडीची पाने न उकडता, तेलात परतुन हे लोणचे करता येते. त्यात आवडीप्रमाणे मीठ व तिखट घालायचे.
|
बाप रे तेलगू लोकांचे तिखट लोणचे हा प्रकार मी आयुष्यात परत कधीच खावू शकत नाही. एक आहे ना तेलगू मैत्रीण, तिच्या घरी पहिल्यांदा कुठलेसे लोणचे Try केले. एक तर भरपूर तेल(आपण टाकतो त्याच्यापेक्षा त्यांच्या लोणच्यात तेल ज्यास्त असते)... तिखट म्हणजे डोक्यात झीणझिणी गेली. I cant eat the way they cook बाबा. पण मी केलीली अंबाडीची भाजी पण काही मी ज्यास्त खावू शकले नाही. त्यात मी बेसन,डाळ टाकून सुद्धा.
|
Chinnu
| |
| Monday, August 27, 2007 - 7:49 pm: |
| 
|
मनु, म्हणुनच, झणझणीत खायची सवय नसेल तर ह्या लोणच्याच्या वाटेस जावु नये! ललिता, दिनेश आणि मनु, कृपा करून तेलुगु असे लिहा! दिवे घ्यालच
|
चिन्नु तु तेलुगु आहेस का ग? दिवे कशाला गं? ते marathi gramemer जरा माझे कच्चेच आहेच. पण तु मराठी चांगले लिहितेस?( वरचे उत्तर 'हो' असेल तर
|
Ksha
| |
| Monday, August 27, 2007 - 9:50 pm: |
| 
|
देवा, भाजी होय?!! मला बीबीचे नाव वाचून भलतेच वाटले काहीतरी!
|
Chinnu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 1:42 am: |
| 
|
छे छे. आम्ही मराठी आमची मर्हाटी! क्ष
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:33 am: |
| 
|
तेलुगु असा शब्द आहे का ? आता लक्षात ठेवीन. त्यांच्या एका चटणीला तर ते चक्क गन पावडर असेच म्हणतात. पण आन्ध्रातले सगळेच लोक तितके तिखट खात नसावेत. मी तिथल्या एका आडवाटेच्या हॉटेलात घरगुति जेवण जेवलोय. लोणचे सोडले तर बाकि प्रकार नॉर्मलच होते. खुपदा हॉटेलवाले, असा सरसकट गैरसमज पसरवुन देतात. अरे पण हा बीबी आंबट चुक्याचा ना. आंबट चुका हि भाजी गोलसर पानांची असते. पानी साधारण तीन सेमी आकाराची असतात. हि पाने कच्चीच वाटुन त्याची चटणी करता येते. सॅंडविच ला लावायला हिरवीगार चटणी छान दिसते आणि लागतेही. अळु वैगरेच्या भाजीत भर म्हणुन आणि चवीसाठी हि भाजी गालतात. रोजच्या वरणात हि पाने घातली आणि वरुन फ़ोडणी दिली तरी छान लागते.
|
Suparna
| |
| Tuesday, August 28, 2007 - 7:02 am: |
| 
|
दिनेशदादा शेवटी आंबट चुक्याच्या भाजीची छान माहीती दिलीत. तशी चाकवत आणि करडईच्या भाज्यांची पण माहीती जमल्यास द्या ना. अश्याच घरगुती पद्धतीने भाज्या कश्या करायच्या ते........
|
Lalitas
| |
| Tuesday, August 28, 2007 - 7:58 am: |
| 
|
आम्ही आंबटचुका अळुच्या भाजीत घालतो. अळुबरोबर आंबटचुका चिरून भाजी तेलावर परतुन शिजत लावली की अगदी दह्यासारखी शिजते. दिनेश, मी जे गोंगुराचं तेलुगु लोणचं खाल्लं होतं ते जरासुध्दा तिखट नव्हतं... (मी जहाल तिखट अजिबात खाऊ शकत नाही) पण चविष्ट होतं. माझ्या तामिळ मैत्रिणीने ते चेन्नईहून आणलं होतं. मला तर ते अतिशय आवडलं!
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:10 pm: |
| 
|
ललिता, मग ते नक्कीच घरगुति असणार. बाजारात मिळते ते भयानक तिखट असते. अलिकडे हि भाजी बाजारात कमीच दिसते. खुप जणाना माहितही नसते. सुपर्णा करडईची भाजी, /hitguj/messages/103383/130800.html?1188303491. इथे लिहिली आहे.
|
Karadkar
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:17 pm: |
| 
|
आळुच्या भाजीत अंबट चुका घालण्याचे अजुन एक कारण म्हणजे त्याच्या अंबटपणामुळे आळुचा खाजरेपणा कमी होतो. आणि वेगळी चिंच घालावी लागत नाही.
|
Chinnu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:20 pm: |
| 
|
दिनेशदांना अनुमोदन. बाजारु गोंगुरा पिकल खुप तिखट असते. माझी एक मैत्रीण गोंगुरा ची मिरच्या भाजून, चटपटीत चटणी करते. कृती विचारुन लिहीन.
|
Runi
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:46 pm: |
| 
|
माझी आई आंबट चुक्याची भाजी ज्वारीच्या कण्या (की कन्या) घालुन करते, तिला विचारले पाहिजे कशी करते ती ही भाजी, खुप चवदार करते ही भाजी.
|
usa madhye chukyaalaa kaay mhaNataat? kuThe miLel?
|
Aashu29
| |
| Thursday, May 22, 2008 - 1:51 am: |
| 
|
माझी आई आंबट्चुक्याचे पिठले करते, नॉरमल पिठल्याच्या क्रुतित कांद्यानंतर हा पाला घालुन तो सॉफ़्ट होइस्तो परतायचा. मग पाणि मग पिठ.
|