|
Keya
| |
| Friday, February 28, 2003 - 4:45 am: |
| 
|
शेंगदाण्याचे खमंग पिठले अर्धी वाटी हरबर्याच्या डाळीच्या (बेसन) पिठात चवी प्रमाणे तिखट, मीठ, थोडी हळद, हिंग, कccआ मसाला, चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे शेंगादाण्याचे कूट घालून थोडे जास्त पाणी घालून पातळ करणे. (पाण्याच्या प्रमाणानुसार पिठल्याचा पातळपणा ठरतो. तव्यावरचे पिठले घट्ट असते पण शिजण्यासाठी पाणी व्यवस्थित लागते. त्यामुळे पाणी थोडे जास्त घालावे.) खोलगट तव्यावर थोड्या जास्त तेलाची फोडणी करून बारीक केलेला लसूण घालणे. लसूण लाल झाल्यावर डाळीच्या पीठाचे मिश्रण घालणे. हलवत राहून घट्ट झाल्यावर गस बारीक करून झाकण ठेवून वाफ आणणे. गरम किंवा गार भाकरी, आवडत असल्यास कांदा, ठेचा, दह्याबरोबर खा. टीप: लसूण सढळ हाताने वापरल्यास खमंगपणा येतो.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|