|
Dineshvs
| |
| Wednesday, December 27, 2006 - 3:44 am: |
| 
|
सुपारी एवढी चिंच कपभर गरम पाण्यात घालुन त्याचा कोळ काढुन घ्यावा. फ़्लॉवर, बटाटा, गवार, गाजर, अश्या भाज्यांच्या बेताच्या फ़ोडी करुन त्या दोन वाट्या घ्याव्यात. कढईत तेल तापवुन त्यात या भाज्यांचे तुकडे तळुन घ्यावेत. व बाजुला ठेवावेत. उरलेल्या तेलात दोन टेबलस्पुन बेसन मंद आचेवर खमंग भाजुन घ्यावे. दरम्यान चार कप पाणी उकळुन त्यात चिंचेचा कोळ घालावा. त्यात भाज्यांचे तळलेले तुकडे घालावेत. बेसन खमंग भाजुन झाले कि त्यात लाल तिखट, हळद, हिंग, धणे जिरे पुड घालावी. जरा परतुन त्यावर भाज्या आणि पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालुन जरा उकळावे. साखर वा गुळ घालत नाहीत. भाज्या आवडीप्रमाणे घ्याव्यात. बेसन हवे तर जास्त घेता येते. एवढ्या बेसनात कढी मध्यम दाट होते. चिंचेच्या जागी टोमॅटो घेता येतो, पण त्याने हवा तेवढा आंबटपणा येत नाही.
|
Adtvtk
| |
| Wednesday, December 27, 2006 - 10:54 pm: |
| 
|
भेंडी विसरलात. मी सिंधी कढि करताना लसणाची फोडणी देउन मग त्यात बेसन भाजते. फ़ारच झकास लागते. भाज्या हाताला लागतिल त्या
|
Vrushs
| |
| Thursday, December 28, 2006 - 4:09 am: |
| 
|
Thank U दिनेश दा. मी उद्याच करुन बघते
|
Dineshvs
| |
| Thursday, December 28, 2006 - 5:51 pm: |
| 
|
Adtvtk हो ना, हातशी लागतील त्या भाज्या, अरवी, भोपळा, कोहळा, पडवळ, सुरण, अश्या भाज्याहि चालतील.
|
Adtvtk
| |
| Thursday, January 04, 2007 - 7:05 pm: |
| 
|
माफ करा हं दिनेश त्यादिवशी फ़ारच abrupt comment टाकल्याबद्द्ल. फ़ारच घाइत होते. माझ्या एका सिंधी मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ४ मुख्य भाज्या असतात भेंडी, गवार पाहीजेतच आणि उरलेल्या २ मी खरतर विसरलेय बहुतेक बटाटा आणि कहीतरी. आता मी बरेच वेळा कढी केली पण एकदाही भेंडी गवार टाकुन नाही कारण त्या भाज्याहातशी नसतातच. पण एक कढी म्हणुन जे काही करते ते चांगले लागते
|
Dineshvs
| |
| Friday, January 05, 2007 - 3:38 am: |
| 
|
माफी कश्याबद्दल ? माझ्याहि बाबतीत तेच, मी कधी भेंडी नाही वापरली. ती समजा तळलीच तर छान कुरकुरीत होते, मग ती परत ओली करणे जीवावर येते. मी फोडणीत मेथीदाणे घालतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|