|
Bkashish
| |
| Friday, September 23, 2005 - 1:20 pm: |
|
|
काल आईने पेरूची भाजी केली होती, खुपच छान झाली होती. पेरू घेतांना मोठे घ्यावेत पण फार पिकलेले मऊ घेवू नये नाहीतर भाजीचा लगदा होतो व गिळगीळीत लागते किंवा कच्चेही घेवू नये भाजी तुरट लागते, एका पेरुच्या चार फोडी करून बी काढून टाकावे व परत प्रत्येक फोडीच्या दोन अश्या प्रत्येक पेरूच्या आठ किंवा अजुन जास्त फोडी कराव्यात. फोडणीत मोहरी,जीरे, मसाला घालून फोडी फ्राय कराव्यात, नंतर आवश्यकतेप्रमाणे पाणि घालून उकळी फुटल्यावर मीठ, दाण्याचा कूट, थोडा गुळ व तीळाचा एक चमचा कूट अवश्य घालावा.तीळामूळे छान चव येते. भाजी थोडी घट्टच असावी.यात अजून कोणी भर घालू शकेल का? मी मोघमच लिहीलय. या साठी वेगळा बी बी उघडावा की इथेच ठीक आहे?
|
Bkashish
| |
| Saturday, September 24, 2005 - 4:32 am: |
|
|
भाजीत तिखट, हिन्ग, हळद घालायचेच राहिले.
|
Swa_26
| |
| Monday, December 25, 2006 - 10:51 am: |
|
|
पेरुची भाजी: साधारण पिकलेले पेरु, हिंग, हळद, मीठ आणि थोडे चवीला तिखट. थोड्या तेलामधे हिंग, हळद घालावे. त्यात पेरुच्या चौकोनी फोडी करून घालावे. वरुन तिखट आणि मीठ घालावे. पेरुची भाजी तयार.... (करायला आणि लिहायला..... दोन्ही सोपे.)
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|