|
Ninavi
| |
| Thursday, March 02, 2006 - 3:36 pm: |
| 
|
बी, तुला ( स्पॅनिशसुद्धा) केशराचा वास,चव कळत नाही? मूडी, मग त्याला जुनाट सर्दीवर औषध सांग बाई. 
|
केशर विरघळते <<<< ऐ. ते. न. 
|
Maitreyee
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:05 pm: |
| 
|
बी तुला जबरा बनवलय त्या दुकानदाराने!! केशराला स्वाद गन्ध नाही? आणि विरघळते पण??
|
Dineshvs
| |
| Thursday, March 02, 2006 - 5:33 pm: |
| 
|
शर्मिला, दादरला रानडे रोडवर सर्वोदय दुकानात अस्सल काश्मिरी केशर मिळु शकेल. आणि मी सगळी केशर वापरलीत, मला भारतीय केशराचा वासच जास्त आवडतो. क्रॉफ़र्ड मार्केटमधल्या त्या दुकानात मिळु शकेल, पण घेताना त्यावरचे सील आणि पिकाचा सिझन बघुन घ्यायचा. एका वर्षापेक्षा जुन्या केशराला काहिच स्वाद नसतो. थायलंडमधे अनोटा नावाचे दाणे रंगासाठी वापरतात. त्याने केशरासारखा रंग येतो, पण स्वाद नाही. कोकणात ते झाड कुंकवाचे झाड म्हणुन ओळखले जाते, त्याला पांढरी वा जांभळी सहा पाकळ्यांची फ़ुले येतात व त्रिकोणी केसाळ फ़ळ येते, त्यात हे दाणे असतात. ( बीला असेच काहितरी मिळाल्याचे दिसतेय ) जर खात्रीचे केशर मिळत नसेल तर कृत्रिम ईसेंस वापरणे चांगले.
|
Bee
| |
| Friday, March 03, 2006 - 5:58 am: |
| 
|
विरघळते म्हणजे मुरते.. साखरेसारखे विरघळत नाही. त्याला ढवळल तर रंग अजून अजून पसरत जातो. दिनेश, मैत्रेयी नाही कुणीच जबरा बनवलेला नाही.. इतके लोक तिथूनच विकत घेतात. शिवाय मला एक दोन डब्या तर अर्थर्वशीर्षाचे आवर्तन होते तेंव्हा त्यांच्याकडून मिळाल्यात. सगळ्यांकडून तोच अनुभव होता की केशरचा स्वाद येत नाही. गंध तर अजिबात नाही. वासावरुन केशर ओळखणे मला जमणारच नाही कारण कधी हुंगायला इतका वास दरवळलाच नाही. पारिजातकाच्या फ़ुलांचा वास त्यातून दरवळाला तर सोण्याहून पिवळे होईल. जाऊ दे.. खूप विचार केला की मग त्रास होतो. प्रत्येकाचे नाक वेगवगळे
|
Dineshvs
| |
| Friday, March 03, 2006 - 4:16 pm: |
| 
|
Bee येतो आहेस ना ईकडे, तुला सगळे ऐन वसंतातल्या गंधांची आणि स्वादांची ओळख करुन देतो.
|
मी पण २,३ ब्राण्डच्या डब्यातले केशर वापरुन पाहिले आहे. रंग मस्त्त आलेला...पण केशराचा मुळ स्वाद काय असतो ते अजुनही उमगलेले नाही.
|
Psg
| |
| Saturday, March 04, 2006 - 7:23 am: |
| 
|
केशराला काही सुगंध म्हणावा असा वास येत नाही, पण डबी उघडली की एक प्रकारचा उग्र, शुद्ध वास येतो, तोच केशराचा वास. डबी उघडल्यावर जर कसलाच वास येत नसेल, तर केशर अस्सल नाही!
|
Amayach
| |
| Friday, April 28, 2006 - 8:02 pm: |
| 
|
मला एक शन्का आहे. मी जेम्व्हाही ढोकळा बनवते तेम्ह्वा मी मिश्रण कुकर मधे वाफ़वायला थेवते आणी दहा मिनिटानन्तर जेम्हा कुकर उघडते तेम्वा ढोकल्याच्या मिश्रणात खुप पाणी साचलेले असते. काय करावे म्हन्जे ढोकळा फ़क्त वाफ़वला जाइल आणी त्या मिश्रणात पाणी जाणार नाही?
|
Junnu
| |
| Friday, April 28, 2006 - 8:09 pm: |
| 
|
वाह!! बर झाल विचारलस, मला ही कधीपसुन हेच विचारायच होत. मी ह्या प्रोब्लेम मुळे एका वेळी एकच भांड ठेवते. वर ते भांड आणि त्याच्याखाली मिश्रण नसलेल भांड ठेवते.
|
Arch
| |
| Friday, April 28, 2006 - 8:23 pm: |
| 
|
अमेया आणि सोनल, तुमच कुकरमध्ये पाणी जास्त ठेवल जात आहे. भांड्याचा तळ पाण्यापेक्षा २ इंच तरी वर आहे न हे बघत जा म्हणजे पाणी जाणार नाही. कुकरच्या size वर अवलंबून आहे पाणी किती टाकायला लागेल ते. पण ढोकळा वाफ़वायला जास्त पाणी लागत नाही.
|
Dineshvs
| |
| Saturday, April 29, 2006 - 1:14 am: |
| 
|
ढोकळा वाफवताना तुम्ही वेंट वेट म्हणजे शिट्टी तर नाही ना लावत. ती नसते लावायची. पाणी ईतकेच हवे कि ज्यामुळे सतत १५ मिनिटे सातत्याने वाफ येईल. पण तीहि फ़ार जोरदार नसावी, म्हणजे एकदा वाफ यायला सुरवात झाली कि गॅस मध्यम करावा. तसेच ढोकळा शिजुन वर पाणी जात असेल तर तो डबा तिरका आणि ऊलटा करुन ठेवायचा. पण न शिजता मिश्रणातच पाणी जात असेल तर त्याचा झुणका करावा.
|
Mrinmayee
| |
| Saturday, April 29, 2006 - 1:19 am: |
| 
|
ढोकळ्यात पाणी जाऊ नाही म्हणून झाकणाला towel किंव्वा जाड फडकं देखिल बांधतात. भारतातून मी एक ढोकळा stand आणलाय. त्यात कधी हा problem आला नाही
|
Storvi
| |
| Tuesday, August 15, 2006 - 10:41 pm: |
| 
|
अळु खाजरा आहे की नाही हे कसं ओळखावे?
|
Priya
| |
| Wednesday, August 16, 2006 - 12:50 am: |
| 
|
शिल्पा, नुसतं पाहून कसं ओळखायचं माहीत नाही. अळु चिरताना, देठं किंवा शिरा काढताना, देठं सोलताना वगैरे हाताला खाज येते. क्वचित कधी हाताला नाही कळले तरी खाताना घशात खवखवते. म्हणूनच अळवाचे पदार्थ करताना शिजतानाच त्यात चिंच घालतात. अळुवडीचे पीठ भिजवताना त्यात चिंच घालतात.
|
Ek_mulagi
| |
| Wednesday, August 30, 2006 - 2:36 pm: |
| 
|
कोथिंबीर कशी टिकवायची? मी आणलेली एक आठवडा सुद्धा टिकत नाही, सडून जाते.
|
कोथिंबीर निवडुन वर्तमानपत्रात गुंडाळुन घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवल्यास खुप टिकते उसतीच वर्तमानपत्रात गुडाळुन ठेवली तरीही छान ठिकते
|
Prady
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:28 pm: |
| 
|
मी कोथिंबीर धुऊन, निवडून पेपर टॉवेल वर वाळवते थोडा वेळ. खूप वेळ अशी ठेवली तर ती सुकते म्हणून फार वेळ नाही ठेवायची. पाणी शोषलं गेलं पाहिजे. मग एका डब्यात तळाला पेपर टॉवेलची घडी ठेऊन त्यात ही कोथिंबीर भरून फ्रीजमधे ठेवते. आरामात १५ दिवस टिकते. सडत नाही.
|
Milindaa
| |
| Wednesday, August 30, 2006 - 5:44 pm: |
| 
|
/hitguj/messages/103383/60016.html?1085558403 this should be applicable
|
Ek_mulagi
| |
| Thursday, August 31, 2006 - 7:07 pm: |
| 
|
prady, manisha, Milinda: Thanks
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|