|
Dineshvs
| |
| Wednesday, December 13, 2006 - 5:45 pm: |
| 
|
पांढरा ढोकळा दोन वाट्या तांदळाचे जाडसर पिठ घ्यावे, व त्यात पाव वाटी मैदा मिसळुन ते सगळे चाळुन घ्यावे. ( जर पिठ जाडसर नसेल तर, तांदुळ ताकात भिजवुन मिक्सरवर जाडसर वाटुन घ्यावेत. ) एक वाटी आंबट ताक घेऊन, त्यात हे मिसळावे. हे मिश्रण तासभर तसेच ठेवावे. त्यात मीठ घालावे. जर मिश्रण फार घट्ट वाटले, तर थोडेसे पाणी घालावे. पाणी उकळत ठेवावे. डब्याला तेलाचा हात लावुन ठेवावा. पाण्याला उकळी आली कि पिठात अर्धा चमचा सोडा वा ईनो सॉल्ट घालुन, एकाच दिशेने हलवुन, पटकन डब्यात ओतावे. झाकण ठेवण्यापुर्वी, त्यावर थोडी मिरीची जाडसर पुड घालावी. पंधरा मिनिटे वाफवुन घ्यावे. वाफ जिरली कि तयार ढोकळ्यावर थोडे काश्मिरी लाल तिखट भुरभुरुन घ्यावे. चमचाभर तेल तापवुन त्यात मोहरी व जिरे घालावे. ते तडतडले कि गॅस बंद करुन त्यात हिंग घालावा, व लगेच पाव कप गार पाणी घालावे. ढोकळ्याचा डबा थंड झाला कि त्याचे चौकोनी तुकडे करावेत, आणि त्यावर हे मिश्रण पसरुन ओतावे. वरुन कोथिंबीर, पसरावी, व थोडे कच्चे शेंगदाणा तेल लावावे. नाचणीच्या पिठाचाहि असा ढोकळा छान होतो. अर्थात तो पांढरा नसतो.
|
Amayach
| |
| Wednesday, December 13, 2006 - 8:25 pm: |
| 
|
दिनेश, कृती छान वाटते आहे. 'खाटा ढोकळा' म्हणुन जे रेडीमेड मिक्स मिळते ते घरी असेच करतात का?
|
Dineshvs
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:30 am: |
| 
|
रेडि मिक्स मधे थोडे उडदाचे पिठ असते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|