|
Swa_26
| |
| Friday, December 08, 2006 - 5:25 am: |
| 
|
aavalyache tikhat lonache kase banavtat?
|
Prarthana
| |
| Wednesday, December 06, 2006 - 8:23 am: |
| 
|
आवळ्याचे लोण्चे ७-८ आवळे लोणचे मसाला तिखट मीठ किन्चित साखर लिम्बाचा रस आवळे धुवून पाणी न घालता उकडून घ्यावे गार झाल्यावर त्याच्या पाकळ्या सुट्या करून बी काढून टाकावी त्यात २ चमचे लोणचे मसाला १ चमचा तिखट, चवीला मीठ व थोडी साखर टाकून नेहेमी प्रमाणे फ़ोड्णी द्यावी वर २ चमचे लिम्बाचा रस टाकावा. लोणचे मसाला तयार किंवा घरीच मोहोरी व मेथीदाणे एकत्र कुटून करावा
|
Alpana
| |
| Monday, December 17, 2007 - 8:13 am: |
| 
|
आवळ्याच्या लोणच्याचा अजुन एक प्रकार... एक किलो आवळे, सरसोचे तेल, जिरे, मेथी दाणे, ओवा, चवीप्रमाणे जिर्याची आणी मिर्याची पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, सिरका ( विनेगर) आवळे धुवुन कोरडे पुसुन किन्वा हलक्या उन्हात किन्चितसे सुकवुन घ्यावेत. एका मोठ्या कढईमध्ये सरसोचे तेल घ्यावे ( अन्दाजे पाव वाटी). तेल कडकडित तापुन पारदर्शक झाले कि त्यात २-३ चमचे जिरे, १-२ चमचे मेथ्या, ४-५ चमचे ओवा घालावा. लगेचच हळद व चवीप्रमाणे जिरे-मिरे पूड,तिखट घालावे. आता ह्या मसाल्यामध्ये आवळे घालुन चवीप्रमाणे मीठ घालुन परतावे. नन्तर त्यावर झाकण ठेवुन वाफवुन घ्यावे. पाच एक मिनिटात आवळे शिजतात. मग हे लोणचे थंड करुन बरणीत भरावे. सगळ्यात शेवटी बरणीमध्ये आवळे बुडतिल इतपत सिरका ( काळे विनेगर) घालावे. हे लोणचे वर्षभर सहज टिकते. जसे जसे लोणचे मुरते तसा तसा त्याचा विनेगरमुळे आम्बटपणा वाढतो.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|