Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मखमल पुरी

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पुर्‍या » मखमल पुरी « Previous Next »

Rupali_county
Tuesday, September 05, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी नविन रेसिपी
तुम्हि ऐकलि हि असेल पण तरिहि ट्राय करत आहे

मखमलपूरी

१ वाटी मैदा
अर्धा टी स्पून हळद
तेल डीप फ़्रायिन्ग साठी
सुके खोबरे किसून १ वाटी
साखरेचा एकतारी पाक

० मैद्यात हळद ताकुन कणिक भिजवल्या
प्रमाणे पिठ भिजवून घेणे.

० साखरेचा एकतारी पाक करायला ठेवा.

० भिजवलेल्या पिठाच्या लहान (अगदि लहान
नाही)पुर्‍या करून त्या तेलात तळुन घ्या,
तळताना मात्र तेलातच अर्ध्या दूमडा
(अर्ध गोलाकार).

० पूरि तळाल्याचा अन्दाज येताच ति पूरी
गरम गरम असतानाच गरम पाकात टाका
आणि २-३ मिनिटा नन्तर एका ताटात काढुन
ठेवा. त्या पूरि वर किसलेले सुक खोबर
पेरा.

० ह्या पुर्‍या ५ ते ६ तासानी कडक होतिल
(किन्वा दुसर्‍या दिवशी), मग मखमलपूरी
खाण्यास तयार. चहा सोबत ह्या पूर्‍या
ऊतकृष्ट लागतात.

आमच्या कोल्हापूरात रूखवतात तयार करतात. लाल रन्ग आणि पिवळा रन्ग घालुन.


ह्या विकेन्ड ला किन्वा पुढच्या विकेन्ड ला फोटो टाकेन. एक्दम सोपी आणि साधी रेसिपि आहे हि. ट्राय करून कळवा

रुपाली


Sas
Friday, June 08, 2007 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मखमल पुर्‍या

रुपाली तुमच्या Recipe त मी थोडा बदल करुन अत्ताच पुर्‍या केल्या

मी All Purpose Flour पाण्याने कणिक भिजवतो तस भिजवल (शेवटि जर्‍याश्या तेलाचा हात लावला हाताला चिटकलेल पिठ कढण्यास, जस कणक भिजवितांना करतात. )

माझ्या कडे उरलेला पाक होता (Remaning of readymade Gulabjamun n Rasgullas), तो गरम करयला ठेवला व त्याला उकळी आल्यावर आच मंद केली.

मध्यम आकारच्या, जाड नाही व बारिकही नाही अश्या पुर्‍या लाटल्या त्याला काट्या चमच्याने (all over) टोचा मारुन गरम तेलात तळायला टाकल्या.

तळता तळता पुरी दुमडली व तळुन झाल्याझाल्या तेल नितरवुन गरम होत असलेल्या पाकत घतली, पुरी २-३ मी. पाकात ठेवलि (पाकात पुरीच्या बाजु बदलल्या व बाजुने गरम पाक चमच्यात घेवुन पुरीवर ओतला) नंतर पाक नितरवुन पुरी ताटलित ठेवली व त्यावर किसलेले खोबर पेरले.

लगेच खायला ही पुरी खुप चविष्ट लागली. काही तासांनी कडक होण्याची वाट बघतेय. :-)

Thanks a lot Rupali, u solved my problem of what to do of readymade गुलाबजामुन, रसगुल्ले ई. चा उरलेला पाक. :-) :-) :-)




हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators