|
Surabhi
| |
| Monday, November 27, 2006 - 10:09 am: |
| 
|
मेथी दाणे भिजवून इतर धान्याप्रमाणे त्यांना मोड येऊ द्यावे. तुरीची डाळ एक वाटी आणी मोड आलेली मेथी साधारण अर्धा वाटी दोन्ही एकत्र दोन वाट्या पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी. नंतर घोटून त्यात आपल्या अंदाजाने चिंचेचे पाणी, तिखट, मीठ घालावे..किंचीत चवीपुरता गूळ पण घालावा. सुकं खोबरं, व धणे-जिरे एक एक चमचा भाजून घालावे. जास्तशा तेलात ५-६ लसूण पाकळ्या ठेचून फोडणी करावी व त्यात घोटलेली डाळ, वाटलेलं जिरं-खोबरं सर्व फोडणीला टाकून एक कढ काढायची. ही डाळ्मेथी पळीवाढीच असते. अजिबात कडू लागत नाही.
|
Prarthana
| |
| Tuesday, November 28, 2006 - 8:24 am: |
| 
|
डाळ्मेथी दुसरा प्रकार १ वाटी तुरीची डाळ व पाउण वाटी मेथीची निवडालेली भाजी म्हणजे हिरवी पाने एकत्र कुकर म्ध्ये शिजवावी. नंतर चान्गले घोटून त्यात तिखट, मीट, मसाला, चवीपुरता गूळ घालावा. थोडे पाणी घालून सरसरीत करून घ्यवे. नेहेमीप्रमाणे लसणाची फ़ोडणी करून त्यावर हे तयार केलेले मीश्रण टाकावे व छान उकळू द्यावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|