Dineshvs
| |
| Saturday, November 04, 2006 - 2:47 am: |
| 
|
सायो बाजरी किंवा ज्वारीचे पिठ चिकट होटे, हे अनैसर्गिक आहे. मुळातच या धान्यात ग्लुटेन कमी असल्याने ते चिकट होत नाही. उलट भाकरीच्या पिठात चिकटपणा आणण्यासाठी हे हाताचा पंजा दाबुन मळावे लागते. कोरडे पिठ पसरुन त्यावर भरभर फ़िरवत हाताने भाकरी थापावी लागते. मग पिठाची बाजु वर येईल अशी तापलेल्या तव्यावर ती टाकायची. तवा तापलेला असणे हेहि महत्वाचे आहे. वरुन पाणी फ़िरवल्यावर वरचे कोरडे पिठ भिजते. आणि त्या पाण्याची वाफ होवुन ती खालच्या थरात जाते. हि वाफ़ आणि तापलेला तवा यामुळे तो थर चिवट बनतो. तरिही थोडेफार पाणी शिल्लक असतेच. भाकरी उलटुन टाकली कि त्या पाण्याचे लगेच वाफ होते आणि ती आधी चिवट झालेल्या भागाला वर ढकलते व भाकरी फुगते. अशी क्रिया उच्च तपमानालाच घडु शकते म्हणुन भाकरी थेट निखार्यावर फुलवतात. तव्याच्या उषणतेला मर्यादा असतात. म्हणुन तव्यावर भाकरी फुलवायची असल्यास, रुमालाने दाबावे लागते. तपमान, पाणी, भाकरीची जाडी, पाणी फ़िरवायची वेळ, हे सगळे अनुभवानेच जमते.
|
Karadkar
| |
| Sunday, November 05, 2006 - 3:31 am: |
| 
|
मनु अग धारवाड वगैरे भागात कधि कधि लाटुन करतात पण माझ्या सगळ्या काकु हातानेच थापुन करतात भाकरी एकदम पातळ. पण ह्या भाकरी शिळ्या झाल्या की एकदम कडक होतात. मग त्या पापडासारख्या वाळवुन ठेवतात. चुलीच्या कडेने उभ्या करुन ठेवतात. खुडुम खुडुम मस्त लागतात खायला. आमच्याकडे लग्नाचे देवक बसले की भाकरी करत नाहीत घरी पण रोजची सवय असलेल्याना चपातीचे जेवण सकाळसंध्याकाळ नको होते मग अश्या खट्टर भाकरी खातात. आता मला भाकरी करावी वाटायला लागली पीठ नाहीये अज्जिबात.
|
Prady
| |
| Sunday, November 05, 2006 - 4:49 am: |
| 
|
हो माझी एक मैत्रीण पण करते लाटून भाकर्या. त्याला ती लाटभाकर्या म्हणते.
|
Bee
| |
| Sunday, November 05, 2006 - 7:04 am: |
| 
|
हा टॉपिक आजन्म पुरणार आहे. कराडकर, पिठ झाकून नाही ठेवले म्हणजे नक्की काय? मी पिठ पिशवीत बांधून freezer मधे ठेवतो. वर जर ठेवले तर त्यात किडे पडू शकतात. तू कसे टिकवून ठेवते?
|
Sayonara
| |
| Tuesday, November 07, 2006 - 7:50 pm: |
| 
|
सगळ्यांच्या टिप्सबद्दल धन्यवाद. मिनोती, तू म्हणालीस त्याप्रमाणेच करते गं मी. फक्त पीठ भिजवून न ठेवणं सोडून. ते फक्त यावेळेस केलं. पण का कोण जाणे मला काही जमल्या नाहीत नीट. मला वाटतं सतत करत गेलं तरच हात बसेल.
|
Lalu
| |
| Wednesday, November 08, 2006 - 10:04 pm: |
| 
|
तुम्ही कोणी मक्याच्या भाकरी करत नाही का? मेक्सिकन फूड च्या सेक्शन मधे Masa Brosa (harina de maiz) या नावाने मिळते ते पीठ घ्यायचे (यात मांस किंवा मासा नसतो!). पांढरा पुडा असतो. याच्या नेहमीप्रमाणे लागेल तसे मळून घेऊन भाकरी करायच्या. या पिठाचे texture अगदी ज्वारीच्या पिठासारखे असते पण मळताना थोडे जड वाटेल. भाकरी पातळ थापायची. लाटताही येते. हे पीठ जरा चिकट असते, जोर देऊन थापावे लागते. पण भाकर्या छान फुलतात आणि चव ज्वारीच्या भाकरीच्या जवळपास. कराडकर, करुन बघ.
|
Varshac
| |
| Wednesday, November 08, 2006 - 10:37 pm: |
| 
|
मी बहुतेकदा बाजरीच्या भाकरी करते. बाजरीचे पीठ जीतके जास्त मळु तीतक्या भाकरी चांगल्या होतात आणि मस्त फ़ुलतात.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 09, 2006 - 4:42 pm: |
| 
|
लालु, आमच्या आजोळी मक्याच्याच भाकर्या करतात. चवीला खुप छान लागतात.
|
Savani
| |
| Thursday, November 09, 2006 - 5:41 pm: |
| 
|
मी सुद्धा बरेचदा मक्याच्या भाकरी करते. पण मी indian store मधुनच आणते पीठ. पीठ भिजवताना जरा गरम पाणी मात्र घालावं लागतं. छान लागतात ह्या भाकरी. आता ते मेक्सिकन पीठ आणून पाह्यला हवं.
|
Bee
| |
| Friday, November 10, 2006 - 2:54 am: |
| 
|
नलिनी आणि इतर, माझ्या भाकरी तव्याला निघत नाही इतक्या चिकटतात. भाकरीला पापुद्रा येण्यासाठी तव्यावर भाकरी टाकली की लगेच ती दुसर्या बाजूला उलटावी लागते. पण माझी भाकरी तव्याला चिकटते म्हणून मला तसे करता येत नाही. त्यामुळे वरचा भाग कोरडा पडतो. फ़क्त मूठभर भाकरीचे पिठ मळताना तो उंडा हातात देखील येत नाही. मग त्याला चांगले कसे मळता येईल? काहीतरी logic नक्की आहे जे कळतं नाही. काल मी ३ भाकरी केल्यात. एकही भाकरी नीट झाली नाही. सगळ्यांचे तुकडे पडले होते. एका बाजूनेच फ़क्त झाल्यात. दुसरी बाजू पिठासारखी आणि भेगाळलेली झाली होती. ह्यालाच बहुतेक विरी जाणे म्हणतात.
|
Deemdu
| |
| Friday, November 10, 2006 - 5:18 am: |
| 
|
exactly हाच प्रश्न विचारायला मी इथे आले होते. भाकरी थापताना जर खुप पातळ थापली तर ती तव्यावर टाकल्या टाकल्या माझ्या भाकरीला फोड येतात आणि मग सगळ्याच भाकरीचा विचका होतोय
|
Karadkar
| |
| Friday, November 10, 2006 - 7:31 am: |
| 
|
भाकरी करणे चपाती करण्याइतके सोपे नाही. मर्फ़ी चा नियम इथे पुरेपुर लागु होतो. if something has to go wrong it will go wrong!! भाकरी ला फ़ोड येण्याचे मुख्य कारण म्हणजे तवा खुप तापलेला असणे हे आहे. तवा खुप तापला की भाकरीला फ़ोड येतात आणि वर लावलेले पाणी पण पट्कन सुकते. ते पाणी सुकुन गेले आणि भाकरी उलटायची रहिली तर तिला भेगा पडतात. practice शिवाय भाकरी नीट खाण्यायोग्य होत नाहीत. विरी जाणे = पिठाचा चिकटपणा जाणे भेगा पडणे नाही.
|
Bee
| |
| Friday, November 10, 2006 - 8:16 am: |
| 
|
मी गेल्या ७ वर्षांपासून 'नियमित' भाकरी करतो आहे पण मला एकदाही यश नाही आले. कळत नाही कुठे काय चुकत. काहीतरी नक्की आहे ह्या भाकरीमधे जे मला उलगडत नाही आणि मीही असा की जोवर भाकरी जमत नाही तोवर मला चैन पडणार नाही. सहसा पदार्थ एकदा दोनदा तीनदा चुकतात पण चौथ्यांदा तो पदार्थ जमतोच जमतो. मला भाकरी करणे जगातील सर्वात कठीण पाककला वाटते आहे. साधी थापून जमत नाही तर हातावरील भाकरीचे स्वप्न बगणे दूर जे मी आधी बघितले होते.
|
Prady
| |
| Friday, November 10, 2006 - 1:51 pm: |
| 
|
जेनू काम तेनू थाय बीजा करे सो गोता खाय. बी त्यापेक्षा तू एखादी छान बायको आण पाहू. हाता वरच्या भाकर्या अगदी आयत्या करून वाढेल अशी.
|
Shonoo
| |
| Friday, November 10, 2006 - 3:04 pm: |
| 
|
कराडकर आणि इतर MBM ( Masters in Bhakari Making ) आता एक व्हिडिओ बनवा भाकर्या करतानाचा आणि YouTube वर टाका लवकर. बी ला निदान बायको आल्यावर भाकर्या मिळू शकतील. माझ्या सारख्यांचं काय!
|
Seema_
| |
| Friday, November 10, 2006 - 3:52 pm: |
| 
|
पहिल्यांदा भाकरी तव्यावर टाकताना आच बारीक ठेवायची आणि लगेच पाणी फ़िरवायच म्हणजे फ़ोड येणार नाहीत . हे जमल तरच भाकरी चांगली होण्याचे chances आहेत . पाणी पुर्णपणे सुकत न सुकत तोवरच भाकरी उलटुन मग आच प्रखर करायची . मिनोती म्हणते ते बरोबर आहे आमच्या भागात अगदी पातळ करतात भाकर्या . खटर भाकरी आणि तेल आणि तिखट . आणि उंडा लहान असतो म्हणुणच व्यवस्थित मळता येतो.पाणी लावत लावत मुठीन मळुन घ्यायचा
|
Milindaa
| |
| Friday, November 10, 2006 - 6:05 pm: |
| 
|
माझ्या सारख्यांचं काय! <<< नवर्याला शिकव
|
Karadkar
| |
| Friday, November 10, 2006 - 8:56 pm: |
| 
|
शोनू आयडीयेची कल्पना भारी आहे एकदम. देशात गेले की मम्मी भाकरी करताना काढेन मी व्हीडीओ!! बघते कसे जमतेय ते
|
Manuswini
| |
| Saturday, November 11, 2006 - 3:35 am: |
| 
|
भाकरी करायला खरोखर जड आहे का? कुत्सित पणे नाही विचारत पण एवढे कठिण सुद्धा नाही. आधी तांदूळाची भाकरी करून पहा मग बाकिच्या मी सर्व प्रकारच्या करते शिकाऊ असाल तर सरळ उकड करायची आणी ziploc bag च्यावर थापुन करा थोडी सवय झाली की हाताने थापायची. मीच फोटो टाकते भाकरी करतानाचे थांबा उद्याच ज्वारीच्या करणार आहे. बर्यापैकी पातळ करते न फुटता थापुन. .. टम्म फुलतात पण त्यात कसलाही रस्सा भरायचा नी खायचा मी तर तळलेली माशाची तुकडी role करुन खाते बाजरीची भाकरी नी सार एक तुकडी
|
Paragkan
| |
| Saturday, November 11, 2006 - 3:36 pm: |
| 
|
कै. दुर्गाबई भागवतांच्या 'दुपानी' मधल्या एका लेखाची आठवण झाली. त्यात त्यांनी दोन हातांवर भाकरी थापण्याची कला कुठल्याश्या चित्रपटात रत्नमालाबाईंवर शित्रीत केलेलं एक दृश्य पाहून शिकल्याचं म्हटलं आहे. तो शॉट शोधा बघू तुम्हीपण. 
|