|
मी बर्याच दिवसांपासुन भज्याच्या आमटी ची रेसिपी शोधतोय. कोणाला माहिती असेल तर प्लीज पोस्ट करा.
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:34 am: |
| 
|
मालवणला आमच्या घरी ती अशी करतात. कांद्याची शिळी म्हणजे नरम पडलेली भजी चार वाट्या, असतील तर अर्धा नारळ, चार पाच लाल मिरच्या, अर्धा कच्चा कांदा हे सगळे बारिक वाटुन घ्यायचे. त्यात हळद घालायची. तेलाची हिंग मोहरी घालुन फ़ोडणी करायची. त्यात अर्धा कांदा बारिक चिरुन घालायचा. तो परतला कि वरचा वाटलेला मसाला घालायचा. तीन चार कोकमे घालायची. मीठ घालुन उकळु द्यायचे. उकळुन मसाला शिजला कि त्यात भजी घालायची. एक उकळी आणुन गॅस बंद करायचा. वरुन कोथिंबीर घालायची. सुक्या खोबर्याचा मसाला घालुन, गोळ्यांची आमटी करतो तश्या पद्धतीने केली तर जास्त चांगली लागेल. भजी मात्र आयत्यावेळीच घालायची, नाहीतर विरघळतात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|