|
Prasik
| |
| Thursday, October 19, 2006 - 10:24 pm: |
| 
|
पाककृतीचे जिन्नस १ १/४ कप बेसन २ चमचे दुध १/४ किग्रा. तुप १ १/४ कप मैदा २ १/२ कप साखर १ १/२ कप पाणी १/२ चमचा वेलची संत्र्याचा अर्क नारिंगी रंग क्रमवार मार्गदर्शन: १. बेसन आणि मैदा एकत्र करा. त्या नंतर एका तव्यात तुप गरम करण्यास ठेवून द्या. २. त्यामध्ये पीठ मिसळून मंद गॅसवर किंचीत सोनेरी रंग येई पर्यंत गरम करून बाजूला ठेवून द्या. थोड्या वेळाने चमच्याने फ़िरवत रहा. ३. साखरेचा पाक तयार करून घ्या. त्यामधे नारिंगी रंगाचे व संत्र्याच्या अर्काचे २ थेंब टाका. त्यानतंर ते पिठाच्या मिश्रणात एकदम ओतुन घ्या. ४. त्यानंतर मिश्रणाला तार सुटेपर्यंत मोठ्या चमच्याने ढवळून घ्या. तार सुटल्यानंतर मिश्रण एका तूप लावलेल्या थाळीत १" चा थर होईल असे ओता. ५. वेलचीच्या बिया वरून पसरून वरून हलकेच दाबून घ्याव्यात. ६. थंड झाल्यानंतर चौकोणी आकारात कापून घ्या व हवाबंद स्टीलच्या डब्यात साठवण करा.
|
Manuswini
| |
| Tuesday, November 14, 2006 - 5:58 am: |
| 
|
मी कालच सोनपापडी केली प्रथमच मस्त झाली फक्त एका वाटीचे माप घेतले. मैत्रिणीचा baby shower होता, त्यात ती गुजराती. धन्य झाली ती खावुन.
|
Surabhi
| |
| Tuesday, November 14, 2006 - 9:48 am: |
| 
|
कशी केलीस ग मनु? ते candyfloss सारखे texture असते ते आले का तुझ्या वड्यांना? त्यासाठी पाक कसा केलास? details दे ना.....
|
Manuswini
| |
| Tuesday, November 14, 2006 - 8:17 pm: |
| 
|
मला ही सोनपापडी करुन पाहयची होतीच. आईला आधी फोन लावला कारण ती हा पदार्थ खुप आवडीने घरी करायची कारण पप्पांना जबरदस्त आवडते. मला फारशी आवडत नाही कारण गोडीला जरा ज्यास्तच असते म्हणुन कधीच लक्ष घातले नाही आई करत असताना व आई जवळ असताना. हे candy floss सारखे होणे जाम जिकरीचे नी कष्टाचे काम आहे. ......... 'पाकात' कौशल्य आहे ते पाकाच्या सुटलेल्या तारामध्ये पिठ फेटुन ते Candyfloss सारखे होते. तेव्हा मुळात right consistency चा पाक नी तुमचे हाताने फेटायचे कौशल्य. माझी अगदी अई सारखी किंवा दुकानासारखी नाही झाली पण निश्चीत तुपाचा गोळा नाही झाली. बर्यापैकी तार सुटली नी छान कोरडी, व्यव्स्थीत गोड झाली. प्रमाण मी १ वाटी बेसन, १ वाटी मैदा, २ वाट्या साखर, सव्वा वाटी पाणी, ३ मोठे चमचे दूध,सव्वा कप विरघळलेले शुद्ध तूप(शुद्ध तूपच घे, छान लागते). केसर, वेलची, बिया..... दोन मोठे नॉनस्टीक टोप घे. egg beater, fork मिश्रण beat करायला, एका टोपात साखर टाकुन, त्यात पाणी टाकले वरील प्रमाणात मंद Gas वर ठेवले सुरवातीला, दुसर्या टोपात बेसन, मिश्रीत मैदा मंदाग्नीवर भाजला(कोरडा), मग विरघळवलेले तूप टाकले, मग १० एक मिनीटे परतले, लाल होवु देवु नकोस जराही सोनेरी रंग टिकला पाहीजे. काढुन मोठ्या पसरट परातीत टाकले. इथे आता पाकाचा gas मोठा केला, बाजुला muslin cloth नी टोप तयार ठेवला पाक गाळायला. Walmart मध्ये muslin cloth मिळतो. पाक उकळायला लागला तसा दूध टाकले. फसफसून वरती येतो. gas कमी करून चांगला फेस येवु दे मग तो एकदम गाळ. पुन्हा उकळ. आता सावधपणे check करत रहा पाक कृतीत म्हटल्याप्रमाणे अडीच तारी वगैरे काही करु नकोस(आईची टिप्स), तो फक्त एक तारीच्या पुढची पायरी असावा नाहीतर beat करेपर्यन्त कोरडा होवु शकतो(आई टिप्स). जसा आळायला लागला की फटकन त्या परातीत पिठावर टाक नी हो जव शुरु egg beater egg beat करतो तसेच beat करायचे. पाकाच्या तारेत पिठ अडकुन मग ते candy floss होते, हीच ती trick . डाव्या हातात fork घे नी पिठ ढकलत जा Egg beater जवळ म्हणजे सगळे पिठाला तार सुटेल. कोरडे होतेय वाटले की तूप लावलेल्या थाळीत थाप, बिया लाव नी सुखव. माझी तरी चांगली झाली(मैत्रिणी टिप्स). चव अगदी बाहेरच्यासारखी. खुप आणखी beat केले असते तर पुर्ण flossy झाले असते पण पहिला प्रयत्न होता तेव्हा नक्कीच bad नाही.
|
Manuswini
| |
| Tuesday, November 14, 2006 - 8:22 pm: |
| 
|
फोटो घेतलाय, मुद्दाम्हून तुकडा कापुन फोटो घेतला flossy structure दाखवायला........ पण problem हाच की माझ्याकडे digital camera नाही तेव्हा अजुन २७ फोटो आहेत ते संपले की टाकतेच... खाताना चविष्ट लागते..... मी ज्यास्त गोड नाही केली तरी अगोड नाहीय मी खातेय आता ऑफ़ीस मध्ये बसून........ दोन piece स्वःताला ठेवले बाकी मैत्रिणीला
|
Surabhi
| |
| Wednesday, November 15, 2006 - 9:57 am: |
| 
|
मनु, तू फारच उत्साही आणि पाककुशल आहेस. किती कठीण कठीण पदार्थ उत्तम करतेस! मी नेहमी सोनपापडी आणली की खाताना `ही कशी बरे केली असेल असा विचार करत खात होते.... तू लिहिलेल्या कृती कडे पाहून असं वाटतय... एवढा patience आणि कौशल्य काश माझ्याकडे असते तर.... पण कधीतरि try करून पाहीनच.
|
Nalini
| |
| Wednesday, November 15, 2006 - 3:18 pm: |
| 
|
मनु, तुला कृती लिही म्हणुनच सांगायला आले होते बघ. मला पण हाच प्रश्न पडला होता की पाक कसा असायला हवा. मला एक सांग की जेव्हा बेसन आणि मैदा तुपात भाजतो तेव्ह्या ते कोरडेच असत की पेस्टसारखे मिश्रण होते ते? दोन वाट्या पिठाला सव्वावाटी तुप लागते म्हणुन विचारतेय? मलाही सोनपापडी खुप आवडते. ईथे घ्यायला गेले की ती किती दिवसांची असेल? असा विचार मनात येतो आणि ठेवुन देते. बघते एकदा करुन.
|
Malavika
| |
| Wednesday, November 15, 2006 - 5:01 pm: |
| 
|
भारी आहेस मनुस्विनी. you inspired me to try out this complicated recipe. तुझी मूग डाळ हलवा ची कृती पण खूप छान आहे.
|
Manuswini
| |
| Wednesday, November 15, 2006 - 10:16 pm: |
| 
|
नलीनी, sorry झाला उत्तर द्यायला तूप हे विरघळवुन थंड केलेले होते. त्यामुळे ते ज्यास्त होत नाही. दोन्ही पिठ कोरडीच भाजली आधी. मग विरघळलेले तूप टाकुन आणखी जरा वेळ परत. सोनेरी रंगच ठेव. आणी काय कराय्चे माहीत, हे पिठ थोडे कोमट झाली की मळायचे चांगले. actually तूप टाकल्यावर paste सारखा लगदा होतो पण तुला माहीती असेलच ना की बेसनचे लाडवाचे पिठ पण आपण मळतो तेव्हा सुटे होते. असे हे पिठ सुटे करुन परातीत ठेव. पाक हा एकतारी झाली की check कर. gaS नंतर मोठा करुन सतत ढवळत रहा नी एकतारीच्यी जरा पुढे चिकट वाटला की (धार सोडता येण्यासारखा पाहीजे(आई टिप्स) की टोप पकडीने कलता करून पिठावर चारी बाजुने धार सोड.(हे सर्व फार पटापट करावे लागते(आई टिप्स) movements has to be fast , अडीच तारी वगैरे पाक व्ह्यायची वाट पाहु नकोस वाटल्यास दीड तारी कर.... पाच दहा मिनीटे तरी छान beat कर. egg beater उजव्या हातात धर नी beat कर जसे अंडे beat करतो तसे. कडेचे पिठ fork ने ढकलत जा. त्या पाकाच्या जाळीत ते पिठ अडकुन तारेमुळे ते flossy होते. मेहनत आहे बरीच. पण मजा येते कारण achievment वाटते ती flossy सोनपापडी खाताना मला सांग केल्यावर....... मे role संपला की फोटो टाकतेच...
|
Vj1
| |
| Thursday, March 29, 2007 - 3:48 pm: |
| 
|
Aho photo taka naa..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|