Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Fodani

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » Fodani « Previous Next »

Rahul16
Wednesday, October 18, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Koni weg weglya fodanyanchya prakarabaddal sangel ka?...

mhanaje waranawar dal fry sarkhi fodani karato tashya aankhi kahi wegwegalya fodanya karata yetilll...khup testi laggu shakate ase waran....

mala kahi mahit nahi ...mi fakt vicaharat aahe...

Robeenhood
Thursday, January 04, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोडण्या तर सगळ्याच देतात...
मला उत्कृष्ट फोडणी कशी देतात ते सांगा बुवा..


Jagu
Friday, January 05, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुर डाळीच्या आंबट वरणासाठी फोडणी
५ ते ६ लसूण पाकळ्या
मोहरी, जिर, कडीपत्ता
१ हिरवी मिरची,
४ मेथीचे दाणे

ही फ़ोड्णी वरण शिजल्यावर वरुन देतात.

फ़ोडणीच्या भांड्यामध्ये तेल टाकून चांगले तापून द्यावे. मग मोहरी टाकुन तडतडावी आणि जिर टाकव मग लसुण टाकून बाकीचे सर्व टाकावे. चमच्याने हलवून फ़ोडणी थोडी खरपूस होउ द्यावी मग एक हातात वरणावरचे झाकण अर्धे उघडून फ़ोडणी ओतून लगेच झाकण ठेवावे. एक मिनीट उकळुन वरणाचा गॅस बंद करावा.


Jagu
Friday, January 05, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील फ़ोडणी ताकच्या कढीसाठी, मुग डाळीच्या वरणासाठी सुरवातीला देतात

Suvikask
Friday, January 05, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंबाडिच्या भाजीवर लसणाची खमंग फोडणी घेतात. तेल गरम करुन त्यात मोहरी व लसुन पाकळ्या घालणे. लसुन चांगला कुर्कुरीत तलुन घ्यावा. अतिशय सुंदर चव येते भाजीला.

Shailaja
Thursday, June 28, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेल गरम झाल्यावर मोहरी टाकल्यावर तेलाचा फ़ेस होतो(सम्राट्चे शेंगादाणा तेल वापरते) मग तेल चांगले कि वाईट?फ़ेस हो उ नये म्हणुन काय करावे?

Dineshvs
Thursday, June 28, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगल्या ब्रॅंडचे तेल असल्याने तसा फ़ेस आला तरी हरकत नाही. फक्त शेंगदाणा तेल लवकर खवट होते म्हणुन एक्स्पायरी डेट बघुन घ्यावे.

Shailaja
Friday, June 29, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश !
मोहरी मुळेही फ़ेस होऊ शकतो का?

Dineshvs
Friday, June 29, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोहरीमूळे नाही यायचा फ़ेस. पण जर शंका असेल, तर काहि कच्चे मोहरीचे दाणे चुरडुन चव पहावी. जर खवट असेल, तर वापरु नये.
मोहरीची चव कडवट तिखट असावी.


Lopamudraa
Sunday, February 03, 2008 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंगदाणा तेल किंवा तीळाचे तेल यांना फ़ेस येतोच ते तेल खराब नसते. त्यासाठी तळतांना त्यात एक चिंचेचे बोटुक टाकतात. खानदेशात या दोन्ही तेलाअंचा वापर जास्त होतो. तेव्हा फ़ेस येणे हे तेल खराब झाल्याचे लक्षण नाही. तर तेल चांगले असल्याचे आहे.. :-):-) sahaj disale mhaNun otherwise khup divas jhaaley aadheecheepost yeun..

Dakshina
Tuesday, June 03, 2008 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंगदाणा किंवा सुर्यफ़ूलाचे तेल अर्धवट तापले असता (चुकून) मोहरी टाकली तरी फ़ारसा वास नाही येत फ़ोडणीला...
पण इतर तेलाची फ़ोडणी घालताना मात्रं ते चांगले तापवून घ्यावे लागते, नाहीतर पदार्थाला तेलाचा वास येतो.
विशेषतः करडई चे तेल.


Aaftaab
Tuesday, June 03, 2008 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंध्र प्रदेशी restaurants मध्ये भाज्या आणि सांबार यांना एक वेगळाच झणझणीतपणा असतो. ते लोक फ़ोडणीत काय घालतात कोणी सांगू शकेल का?
किंवा आंध्रा style सांबार कसे करायचे हे सविस्तर सांगू शकाल का?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators