|
Aditih
| |
| Wednesday, September 27, 2006 - 7:39 am: |
| 
|
मी भाजणी अशी करते. साहित्य: तांदूळ १ किलो हरभरा डाळ १/२ किलो उडीद डाळ १/४ किलो मुग डाळ १/८ किलो धने १/१६ किलो.... अंदाजे ६० gms जिरे १/१६ किलो थोड्क्यात काय तर ... कोणतंही माप घेतलंस तरी चालेल फ़क्त एवढंच लक्षात ठेव की तांदुळाच्या निम्मी हरभरा डाळ , त्याच्या निम्मी उडीद डाळ, त्याच्या निम्मी मुग डाळ,त्याच्या निम्मे धने, जिरे. हे सर्व मंदाग्नी वर भाजायचं. आणि एकत्र करुन द्ळून आणायच.
|
Sai
| |
| Wednesday, September 27, 2006 - 3:52 pm: |
| 
|
Thanks a LOT!!!dev2{mee nakki ashee bhaajaNi karun baghen aaNi saangen kashyaa jhaalyaa chakalyaa te!!}
|
Mekhla
| |
| Wednesday, September 27, 2006 - 9:04 pm: |
| 
|
आर्च, तुमच्या sour cream recipe नी कडबोळी करता येतील का? भोंडल्याला खिरापत म्हणून न्ययचा विचार आहे.
|
Deemdu
| |
| Thursday, October 05, 2006 - 5:27 am: |
| 
|
हाय रे दैवा कालच जरा चकली करुन पाहीली पण तळताना ज्या चकल्या छान खुसखुशीत वाटत होत्या त्या आज सकाळी सगळ्या मऊ पडल्या. काय चुकलं असेल? मी उकड काढुन चकल्या केल्या होत्या
|
Sami
| |
| Thursday, October 05, 2006 - 2:01 pm: |
| 
|
deemdu भाजणीच्या केल्यास का? असो, पण चकल्या तळताना नेहमी low te medium वर आच ठेवायची. मोठ्या गॅस वर तळल्या की बाहेरून तळल्या गेल्या सारख्या वाटतात पण आतून कच्च्या रहातात. आणि मऊ पडतात. आच कमी ठेवून एका वेळी दोन ते तीन चकल्याच तळणीत टाकायच्या. जास्त टाकल्या तर तेलाचं तापमान कमी होऊन चकली तळायला खूप वेळ लागतो. चकली तळणीत टाकलीस की एकदम बुडबुडे येतात आणि काही वेळाने बुड्बुडे येणे कमी होत जाते आणि चकली तळाशी जाऊ लागते. तेव्हा ती व्यवस्थित तळली गेलेली असते. बघ मी बरोबर explain केलं का? इथले जाणकार अधिक माहिती देतीलच.
|
Anilbhai
| |
| Thursday, October 05, 2006 - 3:13 pm: |
| 
|
Deemdu oven जरा गरम करुन त्या चकल्या ठेवुन दे त्यात.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 05, 2006 - 4:13 pm: |
| 
|
तळण्याच्या आणि भाईंच्या सुचना बरोबरच आहेत. पण असे झाले असल्याचे कारण चकल्या गरम असतानाच डब्यात भरल्या गेल्या किंवा डबा हवाबंद नव्हता, असेहि असु शकेल. चकल्या तळल्यावर तेल पुर्णपणे निथळणे आवश्यक आहे.
|
Hi everybode here ,mi chicago madhe rahate.mala ethe chakalichi bhajani milat nahiye,koni sangoo shakel ka ki ethe chicagot kuthe milel te.
|
Vin
| |
| Friday, October 06, 2006 - 10:13 pm: |
| 
|
केतकी, इथे खास चकलीची भाजणी मिळेल कि नाही ते माहीत नाहि पण तुला डेव्हाॅन वर रेडीमेड चकल्या मिळतील (सग्ळ्या दुकानात!) तुझ्या झिपकोड वरुन तर वाटते कि तु फार लांब नाहिस डेव्हाॅन पासुन.
|
Bhavana
| |
| Wednesday, October 11, 2006 - 2:29 am: |
| 
|
माझ्या आईने शोधून काढलेली मायक्रोवेवमधे करायची चकल्याची भाजणी. साहित्य: अडीच वाट्या तांदूळाचे पीठ, १ वाटी डाळीचे पीठ, पाव वाटी उडीद डाळ, जिरे. कृती: तांदूळाचे पीठ आणि डाळीचे पीठ, दोन्ही वेगवेगळी आणि लालसर रंग येईपर्यंत मायक्रोवेवमधे भाजावीत. मायक्रोवेचा टायमर पहिल्याने १ मिनिटापेक्षा जास्त लावू नये. नंतर वेळ अंदाजाने वाढवत न्यावी. उडीदाचे पीठ सहसा मिळ्त नाही म्हणुन उडीद डाळ आणि जिरे लालसर भाजून घ्यावेत आणि ग्रायंडरमधे जास्तीतजास्त बारीक करावी. चारीही पिठे एकत्र करावी. चकलीची भाजणी तयार. चकल्या करताना पिठात गरम तेलाचे मोहन घालावे. तिख़ट, मीठ, हिंग, थोडे तीळ घालावे. पीठ चांगले मिसळून गरम पाण्यात भिजवावे. मळुन घेऊन चकल्या कराव्या. याची १ / २ किलो भाजणी होईल.
|
Vin
| |
| Wednesday, October 11, 2006 - 4:19 pm: |
| 
|
मी पण अश्याच करते पण उडिदाचे पिठ नाही घालतं आणी डाळ्याची पावडर करुन घालते..... BTW, hi bhavana
|
{हाय भावना, छान आहे रेसिपी. यात साधारन किती चकल्या होतील? }
|
Milindaa
| |
| Thursday, October 12, 2006 - 1:25 pm: |
| 
|
यात साधारन किती चकल्या होतील? } <<<< या कंसात? फारशा होतील असं वाटत नाही
|
Prady
| |
| Friday, October 13, 2006 - 12:34 pm: |
| 
|
आर्च चा विजय असो. काल प्रायोगीक तत्वावर चकल्या करून पाहिल्या sour cream घालून. अप्रतीम!! छान खुसखुशीत झाल्या आहेत. पण मी भाजणी च्या केल्या. भावना तुझी सांगितलेली भाजणी केली मी. फक्त माझ्या कडून फेरफार म्हणजे थोडा साबुदाणा आणी पोहे पण घातले भाजून. भावना तुला पण धन्यवाद.
|
Manuswini
| |
| Friday, October 13, 2006 - 4:58 pm: |
| 
|
prady तु भाजणीच्य पिठात sour cream घातलेस का? कुरकुरीत झाल्या का?
|
Prady
| |
| Friday, October 13, 2006 - 5:14 pm: |
| 
|
अगं हो. भाजणी मधेच sour cream घातलं. छान कुरकुरीत झाल्या आहेत.
|
Manuswini
| |
| Friday, October 13, 2006 - 6:21 pm: |
| 
|
prady तु भावनाने सांगितलेली भाजणी केलीस मग त्यात कीती वाटी साबुदणा नी कीती पोहे घालायचे? चकल्या विघळल्या वगैरे झाल्या नाहीत ना? मला भाजणीच्या चकल्या ज्यास्त आवडतात. गेल्या महिन्यात मी आर्च ने सागितल्याप्रमाणे एक batch फक्त तांदूळ पिठी टाकून दुसरी तादूळ नी बेसन mix करून पण न भाजता. तू sour cream मध्ये जितके मावेल तितकी भाजणी टाकलेस्स का ग? please मला नीट कृती सांगशील तर ह्या weekend ला बेसन लाडू नी चकल्या आटपेन.
|
Prady
| |
| Friday, October 13, 2006 - 7:16 pm: |
| 
|
मनु मी दोन वाट्या तयार तांदूळ पिठी गॅसवर गुलाबीसर भाजून घेतली. माझ्या कडे बरंचसं डाळं पडलं होतं. एक वाटी डाळं घेऊन त्याची पिठी करून घेतली. उडदाची डाळ, साबुदाणा, पोहे सगळं मिळून पाव वाटी सगळं वेगवेगळं भाजून घेतलं आणी मिक्सर मधून बारीक फिरवून घेतलं. चारही पिठं एकत्र केली. त्यात चवीला मीठ,तिखट,हिंग,तीळ,हळद,धणे जिरे पूड घातलं. आणी sour cream मधे मावेल इतकी भाजणी घालून पीठ मळलं. आणी मग मंद गॅसवर चकल्या तळल्या. अजीबात विरघळल्या नाहीत. आणी छान कुरकुरीत झाल्या आहेत.
|
Savani
| |
| Friday, October 13, 2006 - 8:17 pm: |
| 
|
प्रज्ञा, करून पाह्यला हव्या अश्या चकल्या. मी चकलीच्या पीठात कधीच हळद घालत नाही. चकलीचा रंग काळपट लाल येतो.
|
Swati
| |
| Tuesday, October 17, 2006 - 9:10 pm: |
| 
|
Arch jindabad...my god itki soppi ani itki utkrushta chakali aaj paryant khalli nahi. Mi ani ankhin eka maaybolikarine milun keli...Sour crem chakali. Jiyo arch tussi Gr8 ho...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|