|
Moodi
| |
| Wednesday, January 04, 2006 - 3:26 pm: |
| 
|
साहित्य : २ वाटी मैदा, १ कप लोणी / बटर, १ चमचा बे. पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, अर्धा डबा कन्डेन्स्ड मिल्क, थोडे दुध, १ चमचा vanila इसेन्स, २ अंडी, अर्धा कप पिठीसाखर, पाकवलेली संत्रा साल, ड्रायफ्रुट्स. कृती : मैदा बे.पावडर अन खायचा सोडा एकत्र करुन २ चाळणे. कंडेन्स्ड मिल्कमध्ये साधे दुध घालुन ते फेटावे. नंतर स्टीलच्या परातीत किंवा एखाद्या मोठ्या ट्रेमध्ये आधी लोणी फेसुन मग त्यात अंडी फेसावीत. नंतर त्यात हळु हळु मैदा घालुन फेसत रहावे. नंतर पिठीसाखर अन आधी फेटलेले दुध घालुन परत फेटावे. इसेन्स घालावा. संत्रा साल घालावी अन ड्रायफ्रुटस चमच्याभर सुक्या मैद्यात घोळवुन त्या मिश्रणात घालावे. मग आधी तापवलेल्या ओव्हनमध्ये १६० ते १८० 0 c वर साधारण अर्धा तास ते पाऊण तास बेक करावे.
|
Moodi
| |
| Thursday, January 05, 2006 - 9:53 am: |
| 
|
संत्र्याची पाकवलेली साल घरी करायची असल्यास अशी करतात. संत्र्याच्या साली रात्रभर पाण्यात भिजवुन ठेवाव्या. सकाळी चमच्याने सालीचा आतला भाग खरवडुन काढावा, म्हणजे त्यातील रेषा निघुन जातील. नंतर त्यात पाणी घालुन त्या मऊ शिजवाव्यात. नंतर त्यात अंदाजाने साखर घालुन त्याचा पक्का पाक होईपर्यंत शिजवाव्यात. मग ताटात काढुन त्या उन्हात ५ ते ६ दिवस सुकवाव्यात अन मग बरणीत भराव्यात. अन मग केक अन पुडिंग्ज मध्ये वपरताना बारीक तुकडे करुन वापराव्यात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|